बुधवार, १४ एप्रिल, २०२१

पत्रास कारण की विनवणी देवास \ पत्र लिहिण्यास कारण की

यारिया साहित्य कला समूह 
आयोजित  काव्य लेखन उपक्रमासाठी
विषय -- पत्रास कारण की
शीर्षक  - *विनवणी*



पत्रास  खास कारण की
कशी आणलीस रे वेळ
कुणा कडे जाऊ सांग ना
काय चालविलास रे खेळ


देवा करिते विनवाणी
करना कृपा जगावरी
किती भयावह  वेळ ही
उघड ना ,नयन क्षणभरी

सारे व्यवहार झाले ठप्प
घरीच बसावे लागे नित्य
रोज कमविणे व खाणे
त्या हातांना लागे ना चित्त

कुठून आणतील भाकर
कसा देतील लेकरामुखी घास
तूची तारण्यास देवा आता
सूचवना उपाय हमखास


जाण तू भाव अंतरीचे
दूर करण्या ही अवस्था
सारे जन करती तव धावा
विस्कळीत झाली सुव्यवस्था.

 ऐकना आता तारी देवा
आमची ही विनवणी
कर जग पूर्वीवत हसरे
हीच आमुची विनम्र मागणी


वैशाली वर्तक 
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच बुलढाणा आयोजित उपक्रम 
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

विषय..पत्र लिहिण्यास कारण की,
शीर्षक...*आठवणी मनीच्या*

दिन हरपले राहिल्या फक्त आठवणी
वाट पहात बसणे  वाटे भारी
कधी येईल पोस्टमन 
पत्र देण्या आपल्या दारी

विचार पूस होई एकमेकांना
आला का ग पोस्ट मन 
पत्र नाही मुलांचे कधीचे
काळजीत जातात एक एक क्षण

आता नाही मजा पत्राची
तेच तेच पत्र वाचण्याची
वाचून घडी करुन जपून 
ठेवलेल्या  अनेक पत्रांची

आता केले विज्ञानाने
जग अतिशय सुलभ
प्रत्यक्ष पहाणे होते क्षणात
काळजी , चिंतेचे नुरे मळभ






आशेचा किरण

मोहरली लेखणी
आजचा उपक्रम
विषय --- आशेचा किरण

सर्व  जग झाले दुःखी 
 आशेचे किरण शुन्य
काय करावे न सुचे
सा-या जनांचे मन सुन्न 

सारे व्यवहार ठप्प
रहा बंदिस्त  घरात
किती दिवस बसावे
भुक तर लागे पोटात

कशी मिळेल भाकर
कसा देऊ लेकरा घास
 दाखव आशेचा किरण
सुचव  देवा उपाय खास

जन झाले आत्म निर्भर
मिळविला आशेचा किरण
घेत काळजी  कटाक्षाने
दिले जीवनास  नवे वळण

वैशाली वर्तक

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

अभंग.अष्टाक्षरी. .माहेर. अष्टाक्षरी...अभंग

माहेर

शब्द उच्चारता माहेर
आठवांची साठवण
उभे राही डोळ्यासमोर
एका क्षणात बालपण

 आईचा तो प्रेमळ हात
भासे फिरला अंगावर 
 बाबांची सय येताची
वाटे जावे घरी क्षणभर

कसे विसर  पडतील
ओढ जीवाला सदाची
दिन ते बागडलेले
सय येता  माहेराची


दुधावरची  मऊ साय
 अशी आजीची  ती माया 
क्षणा क्षणा नजरेत आठवे
तिची मूर्तीमंत  प्रेमळ छाया

 संस्कृती ची परंपरा
लेक सोडुनिया *माहेर*
सावरते दोन कुळे
कुटुंबाला तो आहेर

वैशाली वर्तक



असा मी हा प ठाणे जिल्हा २
आयोजित
विषय - माहेर

अष्टाक्षरी

शब्द वदता माहेर
आठवांची साठवण
उभे ते डोळ्यासमोर
एका क्षणी बालपण

 हात  आईचा प्रेमळ 
भासे फिरे अंगावर 
  सय बाबांची येता
जावे घरी क्षणभर

कशी विसर  पडेल
ओढ जीवाला सदाची
दिन ते बागडलेले
सय येता  माहेराची


  मऊ साय  दुधावर 
 अशी आजीची  ती माया 
क्षणा क्षणाला  आठवे
तिची मूर्तीमंत   छाया

 संस्कृतीची परंपरा
लेक सोडुनी *माहेर*
सावरते दोन कुळे
सासरला तो आहेर

वैशाली वर्तक
अहमदाबाद

प्रेमाची अक्षरे समूह आयोजित 
उपक्रम 
अभंग लेखन
विषय - माहेर


शब्दच माहेर  ।  करी आठवण  । 
मनी बालपण  ।   आठवते    ।। 

प्रेमाचा तो हात ।  भासे अंगावर । 
  फिरे क्षणभर   ।  आईचा  तो   ।। 

क्षणोक्षणी  सय  । आजीची ती माया । 
 ममतेची छाया  ।  मनी सदा     ।। 

दिन ते मौजेचे  ।  ओढ सदैवाची । 
 आस माहेराची  ।  लागे सदा  ।। 

लेक सोडुनिया । स्वतःचे माहेर  । 
जणु तो आहेर । सासराला  ।। 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





V. रंगी रंगला श्रीरंग

पहा गोकुळात कान्हा
खेळ खेळे गोपी संग
आनंदात रंगलेला
रंग खेळण्यात दंग

विसरूनी मी तू पण
पहा कसा झाला दंग
देहभान विसरुनी
*रंगी रंगला श्रीरंग*

मुरलीचा येता सूर
होई राधिका बावरी 
रंगी रंगे मोहनाच्या
वेड लावे तो श्रीहरी

दावी धरा  रंगोत्सव
येता पहा हा वसंत 
सृष्टी पहा बहुरंगी
रंग  खेळूया हसत 

भेदभाव सारु दूर
जैसा खेळे तो श्रीरंग
 समतेचा भाव दिसे
आनंदात होऊ दंग

पहा मूर्तीमंत प्रेम
असे भक्तीचे प्रतीक
*रंगी रंगला श्रीरंग*
प्रेम तयांचे सात्विक 


वैशाली वर्तक

पहा गोकुळात कान्हा, खेळ खेळे गोपी संग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग

विसरूनी मी तू पण ,पहा कसा झाला दंग
 हरपूनी देहभान   नाच करी तो  मलंग
भेदभाव सारुनिया,     मनी एकची उमंग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग              १

मुरलीचा येता सूर होई राधिका बावरी 
रंगी रंगे मोहनाच्या , वेड लावे तो श्रीहरी
वृंदावनी  खेळे राधा मन मोहनाच्या संग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग              २   

                                             
मूर्ती मंत असे प्रेम  भक्तिचे ते प्रतिक
राधा रमण दोघांचे   प्रेम   ते सात्विक
  अव्दैताचा असे आत्मा रंगी रंगला श्रीरंग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग           ३
वैशाली वर्तक १३/७/२२

रविवार, ११ एप्रिल, २०२१

कविता माझी अभिलाषा /





    *माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते  मी शारदेचे वरदान

सहज घडते लिखाण 
जसा मिळता  विषय
करुनिया विचार  मंथन
घेते ध्यानी आधीच आशय

कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती 
तर कधी महत्त्व  आरोग्याचे
पण लिखाण  ही झालीय प्रवृत्ती 
  

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद




शीर्षक --**माझी आभिलाषा**

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

  कवितेत माझ्या भाव सकारात्मक
 असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
 पहा उज्वल आशेची उषा

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची

वैशाली वर्तक

निसर्गावर बोलू काही ...निसर्ग देवता

निसर्गावर  बोलू काही

  जीवन आवलबून निसर्गावर
  जतन करण्याचे हवे सदा वेड
  ऋण निसर्ग देवतेचे असे अपार 
   शिकुया करण्या परत फेड

   लावुया  लतावृक्ष  अंगणात
    देतील छाया माया आपणास 
     सत् पुरुषासम असती तेची
     देती प्राणवायु  हवा जगण्यास
       
     नका करु नाश  राना वनांचा
     तयातच साठा वनौषधांचा
     जलचर  सृष्टी वसे तयातच
      -हास होतो  नकळत निसर्गाचा 

       जरी जल असे  निसर्ग दत्त 
        टाळा अपव्यय जाणूनी  मोल
         मुरवा जलास सदा  मातीत
         राखण्या निसर्गाचा  समतोल

        प्रगतीच्या    पहा नावाखाली
         मानवाचा वाढलाय अती लोभ
         म्हणू नका निसर्ग देवतेचा कोप
            थांबवूया  तो आता क्षोभ

           निसर्ग   कृपेने सजे सारी सृष्टी 
            देवतेचे किती वर्णावे गुण गान
            तिच देते आनंदमय दृष्टी 
             असे     निसर्ग    देवता महान

    वैशाली वर्तक 

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...