शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

पोपट.... बालगीत शीर्षक..चिंता उद्याची





बालगीत

पक्षावर

             पोपट

         **चिंता उद्याची**
होता किलबिलाट  चालू  पक्ष्यात   
पोपट म्हणे मी हुशार   सा -यात   

पहा माझे रुप अनेक रंगात    
शोभतो काळ्या रंगी पट्टा गळ्यात   
 जात भाऊ  वसती परदेशात 
 होता किलबिलाट चालू  पक्ष्यात    ...    1


करतो नक्कल  अगदी सहज      
 सरावाची न लागे फार गरज  
"या ,"बसा नमस्ते" बोलतो झोकात  
होता किलबिलाट  चालू  पक्ष्यात     ...  2


सांगू एकमात्र मानव जातीला   
थांबव तोडणे  हे राना वनाला  
कुठे रहाणार सारे  भविष्यात
 होता किलबिलाट चालू  पक्ष्यात      ....3

होता किलबिलाट  चालू  पक्ष्यात   
पोपट म्हणे मी हुशार   सा -यात   



मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

शोध सुखाचा 14/9/2020


शब्दरजनी साहित्य  समुह

शोध सुखाचा


सारे जीवन संपेल
सुख मात्र शोधण्यात
पण कधी उमजेल 
सुख आहे संतोषात


नका करु वणवण
सुख आहे मृगजळ
 जाते  पळून दूरवर
दुःख राहते जवळ


पहा लोभस निसर्ग 
ऊषा झाली ती सुंदर 
रवी राजा आला नभी
दृश्य पहा मनोहर

सुख आहे निसर्गात 
नभीतील चंद्र ता-यात
पक्षांच्या किलबिलाटात
सुरेल मधुर संगीतात

हाती  असलेले सुख
उपभोगा दिन रात
नका संपवू जीवन
सुख सुख शोधण्यात

ऐका सदा संत वाणी
सांगताती कानोकानी
नसे  कुणी जगती सुखी
रहा सदा समाधानी

वैशाली वर्तक

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

तुझ्या हसण्याने बहरला ऋतू

तुझ्या  हसाण्याने  बहरला ऋतू 

होते हास्य सदन भरुन
पण तुझ्या  आगमनाने
आले घराला नवे चैतन्य 
 रोमात भरले  ते आनंदाने

वेलीवरच्या जणु उमलल्या
कळ्या तव हसण्याने
सुगंध तयात भरला वाटे
तुझ्या बोबड्या बोलाने

तुझे दुडू दुडू चालणे
नेहमीच देते संजीवनी
जगण्यातला खरा अर्थ  
लाभला मम जीवनी

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...