खिसा
आजचा विषय आईचा खिसा .
होता एक काळ जेव्हा स्त्रिया शिक्षित नव्हत्या.कमवत्या नव्हत्या. चुल मूल मधे च रमलेल्या होत्या. पुरुष जे पैसे देत त्यातच घरखर्च चालवित घर संभाळित. व त्या पैशातून थोडे फार पैसे वाचत.असायचे. ते कुठे तांदळाच्या डब्यात वा त्यांचे साम्राज्य असायचे त्या स्वयंपाक खोलीत.. कुठल्या कुठल्या डब्यात पैसै ठेवीत. शिक्षीत नव्हत्या..!. त्यामुळे बॅकेचा विचारच करणेच नाही. ..आणि ते वाचविलेले पैसे मुलांचे लाड करण्यात ,त्यांचे हट्ट पुरविण्यात तर कधी काही गरजा पुरवण्यासाठी वापरीत. .तेव्हा... तोच त्यांचा पैशाचा आर्थिक खिसा होता.
पण आता काळ बदलला शिक्षणाने स्त्रिया घरा बाहेर पडून नोकरी करून स्वतः साठी. व कुटुंबाला पण आर्थिक दृष्टया मदत रुप होत आहेत. बदललेल्या काळात,आर्थिक दृष्टया स्वत:पण सबळ झाल्या.आहेत. आता तर खिशांच्या पलीकडे डेबीट क्रेडिट कार्डाने त्यांचे खिसे पुरूषांच्या जोडीनै. ... तोडीचे झाले आहेत
पण मी म्हणते पूर्वीच्या वेळीस व आता पण स्त्रियांना खिसे आहेत व होते. जसा आईचा तसेच बाबाना , पण. होता , पण आज आपण इथे आईच्या खिशांचे बोलत आहोत म्हणून म्हणते.की. प्रत्येक आईचा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, ममतेचा आणि सर्वात महत्वाचा संस्काराचा खिसा. जो तेव्हाही होता आजही आहे . प्रेमाने दिलेले संस्कार, शिकवण ज्याच्या जोरावर ती आपणास घडविते व ती प्रत्येकाची आई पाल्यास घडविते. .
आणि खरच तिच्या त्या बळकट खिशाने ,मी पण आज स्वतः च्या पायावरच नव्हे तर कर्तबगार बनून जीवनात यशस्वी झाले.
आणि आता आईची आजी होऊन. माझ्या सारख्या अनेक आज्या.. त्यांचे त्या आज्यांचे खिसे पण चांगले मजबूत आहेत . मुलांना पण शिक्षीत करून त्यांचे पण खिसे तगडे केले आहेत.
एकूण काय काळ बदलला .. शिक्षणाने रहाणीमान बदलले . तरी बालपणीच्या तिच्या खिशाचे.. मनात स्वरूप बचतीचा खिसा तेच आहे .