गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

शतदा प्रेम करावे

कल्याण डोंबिवली  महानगर 2
आयोजित  उपक्रम
विषय - शतदा प्रेम  करावे

      प्रेमात ईश्वर

वसे प्रेमातच ईश
सदा रहावे प्रेमळ
प्रेमभाव प्राणीमात्र
 रहा  ईश्वरा  जवळ

 
 फळ  संचित कर्माचे 
जन्म दिधला देवाने
लावू  तयाला सार्थकी
जगुया  प्रेम भावाने


द्यावे प्रेम दीन पतितांना
तेची असे देवाचे कर्म
देव हसे तया मुखातून
हेची जाणा जीवनाचे मर्म

देव वसे निसर्गात
वसे जलचर सृष्टी  तयात
वाढवा प्रेमे  तरु लता
प्रेम मिळते  मोदात

 प्रेम  करावे शतदा
जसे माता करी पाल्यावर
तसे असावे निस्वार्थी प्रेम
शतदा प्रेम अमुल्य जीवनावर

 वैशाली वर्तक 
अहमदाबाद

समाजाचे ऋण


अभामसाप कोप्र महाड समूह
आयोजित  उपक्रम 
९/२/२२
विषय - फेडिता 
समाजाचे ऋण




येता मनुष्य जन्मास
  समाजात  ज्या वाढतो
ऋण असती समाजाचे
  त्याचे देणे तो  लागतो.

सदा  दावा माणुसकी 
तोची असे खरा धर्म
ठेवा सम भाव सर्वांशी
तेची  जाणा जीवनाचे मर्म

उठवा पतित जनांना
ते ही आपुलेच बांधव
द्यावा हात मदतीचा
हेची सांगती राघव

पहा बाबा आमटेजी
केले अर्पण  जीवन
 सेवा  केली कुष्टी रोग्यांची
  ऋण त्यांचे माना मनोमन

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

वय चालल वाढत

वय चालल वाढत

दिन ,महीने , वर्षाचा 
वेळ चालला सरत
कळे वळूनी पहाता
वय चाललं वाढत      1

कसा भुर्कन उडाला
रम्य होता बाल्यकाळ  
मनी आठव येताच
वाटे तो सुवर्ण  काळ    2
 
स्वप्ने रंगविली मनी
असताना तारूण्यात
वेळ सरली ती पण
आनंदात उत्साहात         3

बहरली साहित्यात               बहरली साहित्यात 
तव सुंदर लेखणी                 मम सुंदर  लेखणी
रमतेस तू सदैव                   रममाण मी सदैव
फुलवण्या ती देखणी    4     फुलवण्या ती देखणी


लाभो निरोगी आयुष्य            देवा तूची कृपावंत
घडो वृद्धी  साहित्यात           घडो  साहित्याची  सेवा
मिळो सुख समाधान              मिळो सुख समाधान
वाढणा-या आयुष्यात        5     हाच जीवनाचा ठेवा


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
गुजरात

लता दिदी गान कोकीळा/ जादु मधुर शब्दांची



अष्टपैलू  काव्यमंच ( महिला)
साप्ताहिक उपक्रम ६४
विषय  -गान कोकीळा
दि ९/२/२२
      *दुजी न होणे लता*
        
साधी  सोज्वळ रहाणी
लता दिदींचे जीवन
दिली प्रेरणा जनांना
स्वरातून  आजीवन

रोज ऐकतो भुपाळी
सात स्वरांची तू राणी
 भारतभूची होई सकाळ
 भाव पूर्ण  ऐकत गाणी

तव  स्वरातला गोडवा
भावगीत, भक्तीगीत
ओतप्रत   आळवलेली
देशभक्तीची  आगळीच रीत.

तुझ्या  स्वरांनी दिधले
भाव  विविध  मनाला
करुणा, दया ,तर प्रेरणा
चेतना जगण्या मानवाला

 तुझी गीते अजरामर
 ओठावर रुळलेली गाणी
 जणु  गोड अमृताची वाणी
ऐकता येईल डोळा पाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




अ भा म सा प समूह 1
काव्य प्रकार ओळ काव्य
विषय - जादू मधुर  शब्दांचीजादु  मधुर शब्दांची
  शीर्षक - गान कोकीळा

 सूर   ते  येती कानी
गोड स्वरांची भूपाळी
*जादु मधुर  स्वरांची*
जाग देई सकाळी


साधे शब्द अधरीचे 
किती गोडवा सुरात
मृदुलता विनम्रता
भरलेले हृदयात


दैवी देणगी दिधली
  आहे दिदी खरोखर
परी साधना तुझी ही
आहे तया बरोबर

 भारत रत्नचा   किताब
भारताची तूची शान
स्वर  साम्राज्ञी जगाची
तुम्ही भारताचा मान

आहे परी मनीच्छा
भेट घडावी जीवनी
कधी होईल ती पूर्ण  
हीच आस मनोमनी



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...