बुधवार, १० जुलै, २०१३

लेख .. काटा . कविता काटे

                                                                 काटा
       राधा स्वत:ने बनविलेल्या हलव्याच्या दाण्यांकडे  कौतुकाने  पहात त्यांना हळुवार पणे  बोटांनी  स्पर्शत
होती व  हळूच उचलून परातीत सोडत होती . त्या सुंदर पिवळ्या , पांढ-या , नारंगी रंगाच्या ,ज्यावर  बारीक
नाजूक काटा असलेल्या हलव्याच्या दाण्याकडे  पहात खुश होत म्हणत होती ," किती छान काटा धरला आहे ना हलव्यावर ! जणू  आकाशातील   चांदण्याच तबकात उतरल्या आहेत  असे भासत आहे ." खरच  कसे आहे  ना  हलव्यास काटा हा हवाच क़ाटा नाही तर ते साखर फुटाणे  दिसतील .
      तसेच चकलीचे . चकली  जर बारीक काटेदार नसेल तर शोभिवंत दिसत नाही . काटे नसलेली चकली कितीही चवदार ,रुचकर असेल तरी ती काटेदार नसेल तर पाहता   क्षणी आकर्षक दिसत नाही.एवढेच काय कृष्णा  काठची  वांगी , त्यांना पण देठाकडे काटे असतात आणि  क़ाय चवदार असतात ती वांगी . 
    तेव्हा नुसत्या  झाडा  झुडूपांना काटा असतो असे नव्हे तर खाद्य  पदार्थात पण "काटा" शब्दाचे अस्तित्व असते . पण, काटा जेव्हा पायात रुततो, वा बोचतो , तेव्हा मात्र " आई ग "म्हणत प्रत्येकास आईची आठवण
करून दिल्या शिवाय सोडत नाही . काटा बोचतो  वा शरीरास कोठे ही स्पर्शितो तेव्हा त्याच्या   तीक्ष्णतेचे स्वरूप दाखवितोच.  ग़ुलाब तोडतांना  कधी तरी गुलाबाचा काटा बोचतोच , त्यावरून आपण म्हणतो काट्या विना गुलाब नाही.तेथे आपण काटा ह्याचा दु:ख म्हणून शब्द प्रयोग करतो पण  काट्याचे तेथील अस्तित्व निसर्गाने वनस्पतीचे ,फुलांचे  रक्षण यासाठी  असते.
   तसेच काटा म्हणजे तीक्ष्णता , रुक्षता एवढेच नव्हे , काही काटेरी वनस्पतीत औषधी गुण आहेत. कोरफड तर त्वचे साठी , भाजले असता व  सौंदर्य प्रसाधनात फारच उपयोगी आहे तसेच  सर्दी कफ साठी पण उपयुक्त आहे.
   आजकाल तर काटेरी रोप छोट्या कुंड्यातून नर्सरी तून  घरात सुशोभित करण्यात दिसतात . तसेच  काट्याचा , तीक्ष्णता या गुणधर्माने शेताच्या  संरक्षणास, गुरे शेतात येऊ नये  तसेच जमिनीची धूप होऊ नये म्हणून पण काटेरी वनस्पती उपयोगी ठरतात  आणि त्यांना पण सुंदर रंगाची  फुले येतात .
    जल सृष्टीतील मासा जे बंगाली लोकांचे आवडीचे  खाद्य . त्यात तर काट्याचे साम्राज्य असते . सराईत फिश खाणारे त्या माशाच्या काट्यांना वगळून काटेरी मार्ग  दातांनी  आक्रमित करून वा कुशलते काटे सोडून  मासे आवडीने खातात . जसे काट्या विना गुलाब नाही तसेच काट्या विना सर्व साधरण  मासा नाही . पण जर काट्याचा तुकडा तोंडात बोचला तर मात्र ब्रह्मांड आठविते . फिश करी वा फिश खातांना   काटा  तिक्ष्णता हा गुण दाखवतोच .
   एवढेच काय सध्या सर्वत्र  विलायाती पद्धतिची  घर सजावट  रूढ  होत चालली आहे . जेवणासाठी  डायनींग
टेबल व त्यावर काटे , चमचे   आकर्षक  रित्या ठेवतात . तेथे पण'' काटा" ह्याचे उच्चारण  वा काट्याचे अस्तित्व असते . काट्याचा गुणधर्म "रुतणे " त्यामुळे त्या गुणाचा उपयोग करून खाद्य पदार्थ  सहजते उचलण्यात काटा तेथे कामास येतो. पण अवधानाने जर त्याचे टोक लागले तर मग त्याची तिक्ष्णता  दाखवतोच .
   एकूण काय मानवास काट्याची तिक्ष्णता  हवी , पण ती दु:खदायी , त्रास दायी होतो कामा नये  पण सर्वत्रच 
काटा तिक्ष्णता दाखवितो  असे नाही . जसे वजनाचा काटा .  तेथे मात्र काटेकोर पणे आपले वजन आकारमान दाखवितो .  योग्य अंकावर स्थिर होणारा, तेथे पण काटा च असतो.   आजकाल शरीर डौलदार सुदृढ ठेवण्या कडे  कल  वाढला आहे ,त्यामुळे आता  घरोघरी, जिम मध्ये वजन काटा हवा हवासा झाला आहे .
      त्याशिवाय घड्याल्यातील तीन काट्यांवर तर सांगावयासच नको सर्व जगाचे रहाटगाडगे चालते . त्या तीन काट्याच्या फिरण्यावर सर्व जग  नाचत असते .  वेळेची सूचकता दाखविण्यात काट्याचे फार मोठे योग दान आहे.
      रोमांच्याने, भयाने . वातावरणातील फेर बदलाने माणसाच्या शरीरावर काटा येतो . मग एवढा भावना प्रधान  लागणीशीर,  संवेदनशील काट्याला रुक्ष म्हणून  संबोधून  कसे चालेल . तेव्हा काटा म्हणजे  रुक्षता तिक्ष्णता,टोचणी, बोच एवढेच नसून सोय , उपयोगिता काही ठिकाणी सौदर्य ,वगैरे पण त्याचे गुण लक्षात घेतले पाहिजेत 






संत मुक्ताई जागतिक साहित्य मंच आयोजित उपक्रम 
विषय ..काटे

सदा नसे हिरवळ
कधी खडतर घाट
नियमच जीवनाचा
पहा सुखदही वाट

काटे रुपी संकटे  
येणारच मधूनी
म्हणून का चालणे
सोडणार खचूनी

दूर सारण्या काटे
सोसावे लागे संघर्ष 
प्रयत्न करीता पहा
होतो यशाचा हर्ष.

मान गुलाबास राजाचा
तोही उमलतो काटयात
देतो आनंद जन मनाला
फुलतो सदा तो-यात 

नदी आक्रमिते मार्ग 
उंच खडक काट्यातून
किती आली संकटे
थांबत नाही मार्गातून

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...