शनिवार, २ मे, २०२०

बालगीत पोलीस मामा

पोलीस मामा पोलीस मामा

दिवस नाही रात्र ही नाही      
काम हे तुम्हाला सदा प्यारे  
पोलीस मामा पोलीस मामा  
देशभर तुमचेच न्यारे  

दूरुनच पाहता तुम्हाला  
किती रुबाबदार आगळे    
भिऊनी सारे चोर पळती
दिसता तुम्ही जगा वेगळे
     

आला आला रे पोलीस मामा
लहान बालके पळतात
तुमचा पोशाख बंदुकीला
पाहून मुले बिचकतात

पहा तुमचे काम मोलाचे
नाही विश्राम वा आरामाचे
किती करता सेवा जनांची
 तेव्हा चालते सा-या देशाचे


तुम्हा पाहून खरच वाटे
तुम्ही आहात देवा समान
देश सारा राहे सुरक्षित
तुमचे कार्य सदा महान

वैशाली वर्तक
अहमदाबाद




कोरोना विषयक(कविता)


**बंदिस्त  चार भिंतीत**

बंदीस्त चार भिंतीत
रहाण्याची आली वेळ
वाढता मरण आंकडा ऐकून
जनता वदली हा तर मरणाचा खेळ

आपलेच नैतिक कर्तव्य
पाळावे प्रत्येकाने समजुती ने
सुखी निरोगी जीवना साठी              
का आणावी वेळ बळजबरीने

बसा रहा बंदिस्त सारे
करा वाचन विवचन लिखाण
रहा परिवारा संगतीने
नको बाहेरचे ठिकाण

देऊया लढा कोरोनाला
पाळता नियम सरकारचे  
आपले स्वास्थ्य जपता
दुस-यांचे आरोग्य जपायचे..

रहा बंदिस्त घरातूनी
जिवाणुंचा होणार नाही प्रसार
 स्वास्थ्य केंद्रे होस्पिटल मधे
नको उगाच पेशंटचा भडिमार

स्वातंत्र्य वीर राहिले बंदिस्त
सोसूनी अपार कष्ट देशासाठी
रचिले महान ग्रंथ तयांनी
राहूया आपण आपल्या हितासाठी

वैशाली वर्तक.

विनवणी

देवा करिते विनवाणी
करना कृपा जगावरी
किती भयावह  वेळ ही
उघड ना ,नयन क्षणभरी

सारे व्यवहार झाले ठप्प
घरीच बसावे लागे नित्य
रोज कमविणे व खाणे
त्या हातांना लागे ना चित्त

कुठून आणतील भाकर
कसा देतील लेकरामुखी घास
तूची तारण्यास देवा आता
सूचवना उपाय हमखास


जाण तू भाव अंतरीचे
दूर करण्या ही अवस्था
सारे जन करती तव धावा
विस्कळीत झाली सुव्यवस्था.

करुया वंदन देश सेवकांना.

सारे विश्वची ग्रासले संकटात
  पसरता विषाणु जीवाणु ,कोरोना नामक.
देश सेवक करीती सेवा
जरी महामारी असता प्राण घातक

शहर गाव राखण्या स्वच्छ
सफाई कामगारांचे नित्य लक्ष
आपले आरोग्य तयांच्या हातात
कर्तव्यात ते राहती सदाची दक्ष

बंदिस्त रहाणे हेची उचीत
कठोरपणे सांगे शासन
खादी वर्दी उभी उन्हा तान्हात
आपणासाठी पोलीस प्रशासन

वाढतोय अंक महामारीचा
सुश्रुषा करती रात्रंदिन अभयाने
डॉक्टर परिचारिका , मदतनीस
राबती न डगमगता मृत्यू भयाने

किती ऋण या देश सेवकांचे
करिती सेवा निष्ठेने जनांची
वंदन असो या महा-विभुतींना
ठेवुया चाड त्यांच्या ऋणांची

दिनरात करिती काम
  नुरते तयांना वेळेचे बंधन
 घालून स्व- जीव धोक्यात
  या देश सेवकांना शतदा वंदन


वैशाली वर्तक

महाराष्ट्र गुणगान...चाराक्षरी सहाक्षरी गौरवशाली महाराष्ट्र माझा



महाराष्ट्र माझा

देशाच्या नकाशात चमके
  माझा महाराष्ट्र देश सदा
असे प्रिय मजला माझा देश
नावे ठेवलेली न गमे कदा

किती संस्कृती महान
 सदा दिसे विश्व बंधुभाव
मिळून मिसळून रहाती जन
उच नीच नसे कोणासी ठाव


सारेची सण उत्सव होती
असो गणपती वा रमजान
एक मेकाशी घेत भेटी
सारे मानती सर्व धर्म समान

 महाराष्ट्र संपन्न कला गुणांनी
असे तो संत वीरांची खाण
संगीत हा मातीतलाच गुण
नसे साहित्याची पण वाण

असा समृद्ध देश आमुचा
गाईन सदा तयाचे गुणगान
देशास दिधले खेळाडु अनेक
काय वर्णु कर्तृत्वाची शान

..............................,................................................


नृ क्र 4
   विषय-वाढवू शान महाराष्ट्राची

प्राणाहून प्रिय असे मजला
माझा महाराष्ट्र देश महान
वाढवू तयाची ख्याति जगता
उंचावेल जगी अपुलीच मान

करुया संस्कृतीची जपणूक
थारा न देता अंधश्रध्देला
मान ठेवूनी नारी जातीचा
स्मरुनी सदा जिजाऊ मातेला

दूर सारुया जाती धर्म
सावित्रींचा वाढवूया वसा
प्रगतीची विज्ञानाची धरुनी कास
देशात उमटवू महाराष्ट्राचा ठसा

बोलू, वाचू, लिहु मराठीत
माय मराठीचा वाढवू मान
एकच दिनी तिज न स्मरता
नीतदिन देउ तिला अधरी स्थान

आठवण करुनी इतिहासाची
 शोभिवंत करु गड किल्ल्यांची शान
दावु उज्वल इतिहास आपुला
जगती होता किती तो महान

भुमी आपली थोर संताची
गाउया तयांच्या सदाची गाथा
 शिकवण दिधली शांती समतेची
गर्जुया नमवून तयांना माथा

वैशली वर्तक
.........................................................................
यारिया साहित्य     समुह आयोजित महास्पर्धा
 महास्पर्धा फेरी क्र 4
स्फूर्ती गीत लेखन स्पर्धा
विषय - महाराष्ट्र देशा

शीर्षक - गाऊ तयाचे गुणगान
वर्ण- 16

माझा महाराष्ट्र देश , मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे  मज तो सर्वाहूनी महान

आहे नटलेला सह्याद्रीच्या ,कडे कपारीत
राज्य हिंदवी स्थापिले , राजेंनी याच भुमीत
संत, वीरांची, कला साहित्याची, असे ती खाण
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण

इंदायणी गोदा, कृष्णा भीमा, असती सरिता
भक्ती रसप्रदाची जिथे वाहे सदा कविता
वारकरी मन , येथेची विसरे देहभान
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण

स्वप्न मनीचे साकारण्या, जन येथेची येती
मिळवुन नाव , पैसा , नशीब ही घडविती
छाया माया प्रेम देण्यात, तया सारे समान
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण

माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे  मज तो सर्वाहूनी महान
वैशाली वर्तक.....






शब्दरजनी साहित्य समुह आयोजित
स्पर्धेसाठी
भव्य राज्य स्तरीय प्रणु चाराक्षरी
काव्य प्रकार प्रणु चाराक्षरी
विषय - महाराष्ट्र
**दिन सोनियाचा**

शब्द रजनी साहित्य समुह
  प्रणू चाराक्षरी
विषय - महाराष्ट्र

देश माझा
महाराष्ट्र

भासे मज
सर्वोकृष्ट

मायबोली
असे छान
मराठीची
सदा शान

महाराष्ट्र
संस्कृती ती
सर्व जगी
जाणीताती

संस्कृती ही
छान किती
जगभर
 तिची ख्याती

सदा पुढे
साहित्यात
महाराष्ट्र
संगीतात

या देशाचा
डंका वाजे
सर्व क्षेत्री
नाव गाजे

किती वर्णू
गुणगान
महाराष्ट्र
ते महान

दिन आसे
सोनियाचा
गुणगान
 गावयाचा


 वैशाली वर्तक                                                                                                                                                    






वैशाली वर्तक   



षडाक्षरी काव्यलेखन स्पर्धा 
1मे 2021
विषय - महाराष्ट्र माझा 
     *प्राणाहूनी प्रिय*



आवडे मजला
*माझा महाराष्ट्र* 
 आहे भारतात
तोची सर्वोकृष्ट        1

*महाराष्ट्र  माझा*
जणु माझा प्राण
सर्व जगतात
असे तो महान          2

वसे सह्याद्रीच्या 
कडे कपारीत
हिंदवी स्थापिले
राजांनी भुमीत       3

संस्कृतीत पहा
  संपन्नता किती
सा-या जगतात
तिची आहे ख्याती      4

 
कला, साहित्यात    
पुढे ची पाऊल
पहा  खेळाडूंची
दिसते चाहुल            5

शोभिवंत करु 
किल्ल्यांची ती शान
दावु इतिहास 
किती तो महान         6


वैशाली वर्तक
अहमदाबाद



आ भा म सा प .समूह 2
महाराष्ट्र दिन
विषय -- *आभिमान महाराष्ट्राचा*

प्रिय असे मला  ।  माझा  महाराष्ट्र । 
आहे सर्वोत्कृष्ट   । भारतात    ।।       1

मम देश मज ।  जणु माझा प्राण । 
वाटे तो महान ।  जगतात । ।              2

हिंदवी राज्याची  । स्थापना भूमीत  । 
वसे सह्याद्रीच्या   । तो कुशीत      ।।     3

 मराठी संस्कृती  ।  संपन्नता किती   । 
तिची पहा ख्याती  ।  जगताती    ।।     4

पाऊल ते पुढे ।  कला साहित्यात  । 
 गायक  निष्णात । लता एक ।।           5

किती वर्णू त्याचे ।  मीच गुणगान  । 
असा तो महान ।  महाराष्ट्र    ।।           6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद







स्पर्धेसाठी
अ भा म सा प , मंडणगड शाखा रत्नागिरी  विभागआयोजित
अष्टाक्षरी काव्य लेखन स्पर्धा 
विषय -- धन्य  महाराष्ट्र भूमी
      शीर्षक- 

माझा महाराष्ट्र देश 
मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे  मज 
तो सर्वाहूनी महान                1

नटलेला सह्याद्रीच्या
 कुशी कडे कपारीत
राज्य हिंदवी स्थापिले 
शिवबांनी याच भुमीत              2

संत वीर कलावंत
साहित्यिक यांची खाण
*धन्य महाराष्ट् भूमी*
काय वर्णू त्याची शान             3
 

इंदायणी गोदा, कृष्णा 
भीमा, असती सरिता
भक्ती रसाची सदैव
 जिथे वाहते कविता             4


करी वारकरी येथे
विठू नामाचा गजर
विसरुनी देहभान
विठू दर्शना हजर               5


 स्वप्ने मनी रंगवूनी
 जन सारे येथे येती   
मिळवुन नाव , पैसा , 
भाग्य  उजळुनी जाती        6


वैशाली वर्तक 

अहमदाबाद 



वरची कविता नाव बदलून 


माझा महाराष्ट्र महान

गौरवशाली महाराष्ट्र माझा



*गौरवशाली महाराष्ट्र माझा*
भारताच्या नकाशात चमके सदा
असे प्रिय मजला माझा देश
नावे ठेवलेली न आवडे कदा

किती संस्कृती  असे महान
 सदा दिसे विश्व बंधुभाव
मिळून मिसळून रहाती जन
उच नीच नसे कोणासी ठाव


सारेची सण उत्सव होती
असो गणपती वा रमजान
एक मेकाशी घेत भेटी
सारे मानती सर्व धर्म समान

 महाराष्ट्र संपन्न कला गुणांनी
असे तो संत वीरांची खाण
संगीत हा मातीतलाच गुण
नसे साहित्याची पण वाण

गौरवशाली महाराष्ट्र माझा
गाईन सदा तयाचे गुणगान
देशास दिधले खेळाडु अनेक
काय वर्णु कर्तृत्वाची शान

..............................,............









 

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

सारे आकाश माझे

स्पर्धेसाठी
    *सारे आकाश माझे**

कुटुंबाच्या इच्छापूर्तीसाठी
संसारात कष्ट झेलते
देऊनी स्वतःला झोकून
आकाश पण सहज पेलते

मायेचा  सागर हृदयी
ममतेची असे सदा छाया
कठीण प्रसंग  जराही  येता
तत्पर असे झिजवण्या काया

घरदार मुले कुटुंबियांना
सुखी करणे विचार  ध्यानी
 घडविणे संस्काराने शिल्प
हीच कल्पना  सदा मनीं

सीतारमण संरक्षण मंत्री
भुषविले स्त्रीनेच मंत्री पद
अशा असता एकएक  नारी
शोभत नाही अबला पालुपद

घेईन उंच भरारी जीवनी
सारे   माझे  आकाश
घालीन गवसणी नभास
पाडीन नारी शक्तीचा प्रकाश

वैशाली वर्तक

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

सौंदर्य ( कथा)

स्पर्धेसाठी
सौंदर्य कथा

                    **आंतरिक सौंदर्य**

 **सौंदर्य**

          नुकतेच लग्न झालेले रोहीणी व शेखर ..... नवरा बायकोनी... नवा नवा संसार सुरु केला होता.
लग्न जरी आताच झालेले तरी त्यांची मैत्री जूनी होती...एकमेकांना नुसतेच ओळखत नव्हते तर खरच
एकमेकांवर प्रेम होते. कॉलेज पासून त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून पंसंद केले होते.
            असेच एकदा बाहेर गेले असता... त्यांचा मोठा अपघात झाला. त्या मोठ्या अपघातातून दोधे जेमतेम वाचले.पण रोहिणीला बराच मार लागल्याने... 2/3 दिवसांनी ती भानावर आली ..शुध्दीत आली. डाँ .नी शुध्दित आल्यावर भेटण्यास परवानगी दिली ....फार बोलु नका .पण भेटू शकता.
     तिच्या नव-यास शेखरला आत पाठविले .तिचा नवरा शेखर आत गेला . तो देवाची मनोमन प्रार्थना करत.,तिच्या जवळ आला व हात प्रेमाने हळुवार उचलत म्हणाला ,
" माझी लाडकी रोही, व त्याने स्मित हास्य दिले.
तो आनंदाने खुश होत म्हणाला .कशी आहेस माझी रोही.. ती खिन्न हसली.
तिच्या चेह-यास बँडेज होते. तिला तिच्या चेह-याची कल्पना नव्हती. अपघात नंतर शुध्दित नसल्याने
चेह-यास कितपत दुखापत झालीय ...बँडेज च्या आत लपलेला चेहरा कसा आहे याची तिला जाणीव च नव्हती.
   सर्व ट्रीटमेंट संपल्यावर . तिला घरी जाण्यास परवानगी मिळाली. दोघे घरी आले.
शेखरला पण इजा झाली .त्याच्या डोळ्याला थोडी दुखापत झाली आहे असे तिला माहित झाले होते. , दृष्टीत बरीच अंधुकता आली आहे असेही कळले होते.
        घरी दोघेजण आलेत.. हळु हळु रोहिणी च्या प्रकृतीत फरक पडला . घरात हिंडू फिरु लागली.तबियतीत सुधारणा होत गेली. पण एका वेळची रोहीणी ..नावा प्रमाणे नक्षत्रा सारखी सुंदर रुपवती असलेली ....अपघातात. तिचा चेहरा पार कुरुप म्हणजे विद्रुप झाला होता. अनेक टांके चेह-यावर. त्यामुळे तिचे चेह-याचे बाह्य सौंदर्य पार लयास गेले होते.त्याची तिला मनोमनी खंत वाटायची. . तिचे बाकी शरीर ठीक असल्याने ती शेखरला वेळोवेळी मदत रुप होत होती.
    हळुहळु पूर्ववत त्यांचा संसार सुरु झाला ... पण....ती स्वतःला आरशात पाहू शकत नव्हती. तिच्या मनात खंत होती ...रोहिणी पण शेखरला त्याची दृष्टी कमी झाल्याने शेखरला आपल्या कुरुपतेची कितपत कल्पना आहे.. याची तिला जाण नव्हती .त्याच्या कामात ती मदत करायची व तो पण तिची मदत घेत होता. असेच काही दिवस जाता. ......ती एकदा घरात जागेवरुन उठत असता काहीतरी पायात आल्याने ,ती अडखळली ....आणि... पडणार तर शेखरने तिला दूरुन येऊन पटकन सावरले.
      ती अवाक् झाली. रोहिणी म्हणाली,
 अरे," तुला दिसत नाही मग तू कसे मला धावत येऊन सावरलेस?"
तो थोडावेळ निरुत्तर राहिला. पण रोहिणी काही पिच्छा सोडला नाही. शेवटी तो उत्तर ला ,
"खरय, रोही ..मला सारे दिसतय . मी नाटक केले .कारण, तुझ्या मनात .....तुझ्या गेलेल्या रुपाची वा तुला नशिबाने ...दैवाने तुला जी कुरुपता वा विद्रुपता आली, त्याची सतत होणारी तुझ्या हृदयीची खंत मी जाणली . व हे नाटक केले.
   कारण तू 2/3 दा बोलून पण दाखविलेस की , "तुलाच तुझेच रुप आरशात पाहवत नाहीस व तू उदास होते .ही तुझ्या मनाची चलबिचल ..खंत पाहिली .जाणवली...व तेव्हा मी नाटक चालू ठेवले
 त्यावर शेखरला म्हणाली ," अरे ,माझे हे रुप मलाच कसेसे वाटते ...तू माझी सेवा केलीस प्रेमाने .व.. अजून लग्न होऊन जेमतेम 3/4 महिने पण झाले नाहीत .. तर .,..
तर ...मीच तुला स्वतःहून सांगते ,की तू दुसरी मुलगी शोध व नवा संसार कर
     त्यावर शेखर म्हणाला ,
 " काय वेडी आहेस का? मी काही फक्त तुझ्या रुपावर ......वा बुध्दीवर (हो तू जितकी रुपवान आहेस तेवढीच हुशार ...बुध्दी वान पण आहेस) तू जितकी दिसायला रुपवान होती...(माझ्यासाठी अजून आहेस).. आणि. त्याहून तू अंतरीतून ..मनाने स्वभावाने सुंदर आहेस .... तुझा लाघवी स्वभाव ... माणसांना जिंकणे.... .लोभस स्वभाव ..यानेच मी प्रभावित झालेलो होतो व अजूनही आहे. मी तुझ्या बाह्य रुपाने जराही विचलित झालो नाही. ....तर तुझे निर्मळ मन... तितकेच सुंदर आहे. त्यामुळे हा विचार पुन्हा मनात आणू नकोस .
    आणि पुढे शेखर म्हणाला ," अग वेडे सौदंर्य म्हणजे काय बाह्य रुपाचेच असते का?
निसर्गात पहा किती सौंदर्य भरलेले आहे ते आपल्यास शोधता आले पाहिजे.सौंदर्य कोणाच्या आवाजात असते ..गान कोकिळा असतात.... कोकीळेचे रुप नव्हे,तर आवाज पहातात. कधी सौंदर्य कलाकृतीत दडलेले असते. कलाकृती इतकी सौंदर्याने नटलेली असते की मनुष्य भारावून जातो तर सौंदर्य हे शोधायचे असते.
   हे सारे जग.... सृष्टी .. सौंदर्याने नटलेली आहे जसा आनंद शोधायचा असतो ना तसेच सौंदयाचे असते..शोधता ते सापडते ... त्या साठी सौंदर्य पहाण्याची दृष्टी हवी.
      साधे पहा , ताजमहल व आगाखा महल.... दोन्हीही महल. एक सुंदरतेने नटलेला आहे . व सुंदरतेची प्रतिमा आहे..., तर दुस-यात राजमाता कस्तुरबा यांचा निवासामुळे महलास आंतरिक सुंदर ता आहे.
          तर तुझे **आंतरिक सौंदर्यच** माझ्या मनी आहे व तेच खरे सौंदर्य .
रोहिणी च्या डोळ्यात पाणी तरारले.


वैशाली वर्तक



१५०० शब्द


आंतरिक सौंदर्य**
 

          नुकतेच लग्न झालेल्या रोहीणी व शेखर ..... नवरा बायकोनी... नवा नवा संसार सुरु केला होता.
नव्या संसारात काय हवे ..काय नको  पहाण्यात रोहिणी सदा गर्क असायची. हवे तसे घर लावणे.. सजविणे चालू होते . लग्न जरी आताच झालेले तरी त्यांची मैत्री जूनी होती.एकमेकांना नुसतेच ओळखत नव्हते तर खरच दोघांच्या आवडी निवडी पण सारख्याच होत्या. त्यात रोहिणी आधीच समजूतदार होती.आणि शेखर पण तिच्या सर्व मागण्या मंजूर करत होता. दोघे ही शिकलेले. छान पदावर नौकरी कर होते. पैशाची कुठे उणीव नव्हती. आणि दोघां च्या घरून लग्नास पसंदगी होती. म्हणजे कुठेच चिंतेचे कारण नव्हते.
दोघांचे एकमेकांवर  अती प्रेम होते. कॉलेज पासून त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून पसंद केले होते. रोहिणी नावा प्रमाणेच दिसण्यात पण नक्षत्र च होती, शेखर पण चुणचुणीत स्मार्ट मुलगा... किती तरी मुली त्याच्या वर भाळायच्या. लट्टू व्हायच्या. खरच त्यांची जोडी  कॉलेज मधे असल्यापासून अव्दितीय म्हणून ओळखली जायची.  आणि नुसतेच  त्यांच्यात आकर्षण नव्हते हं !.  हो ..नाही तर , सध्याच्या काळात तर... काही विचारु नका. पटणे... पटून घेणे असला समजूत दार पणा तर नसतोच... हल्ली  मुलींच्या अटी पण काहीही असतात.  लग्न टिकणे तर कठीणच झाले आहे. लग्ना आधीच 2/3  ब्रेक अप सहज झालेलेअसतात. एक तर  त्या वयात समज नसते. कधी कधी नुसते आकर्षण  असते. कारण  जीवनात प्रेम करणे,  तर प्रत्यक्षात संसार सुरू झाल्यावर समजते. खरे रंग  तेव्हाच उघडकीस येतात म्हणा..  वा तडजोड, संयम,  विनयता, सहनशीलता वगैरे पाऊले.. जी  लग्न मंडपात .. सप्तपदीत चाललेली असतात.. त्या सप्तपदी चां खरा अर्थ समजलाच नसतो.  पण , या जोडीने जीवनात... संसारात    अग्नी ब्राह्मणा समवेत चाललेली सप्तपदी अनुसरली  होती म्हणायची. कारण अशा निस्सीम प्रेमाची उदाहरणे कमीच दिसतात. 
  प्रत्यक्षात म्हणजे  संसारात प्रेमाची खरी कसोटी लागते.हल्ली दिखावा फार झालाय  व सहनशीलता व चालवून घेणे वाट तडजोड राहिलच नाहीय. जरा मतभेद होता काडीमोड  होत आहेत. संस्कार संस्कृती कुठे लयास  जात आहे.काही कळत नाही.
       लग्ना आधीचे जीवन  तर नुसते हिरवळीवर चालणे असते.  ना स्वयंपाकाची जवाबदारी वा काय आणणे -करणे.. का  घर साफ करून घेणे वा करणे .. बाजारात जाऊन वा येता जाता खरेदी करून दोघांनी लागणा-या वस्तूंची जमवा जमवी करणे ..एक ना दोन अनेक कामे ...घर लावतांना
पहावी लागतात. पण रोहिणीची  कधी कटकट वा चिडचिड केली नव्हती . सदा हसत मुखाने शेखरला खूश ठेवत  ...., घरची कामे नीट संभाळत होती. ..एक तर मिया बीबींचा संसार होता. त्यामुळे कुठलीच रोक टोक नव्हती. तसे पण आज काल मुलींना इतर कोणाची लुडबुड नकोच असते. यांच्या कडे तो पण त्रास नव्हता. रोहिणीला आई वडील नव्हतेच.   आई पण अशीच सुंदर मन मिळावू होती. फार शिकलेली नव्हती पण प्रेमळ कुटुंबाचा सदैव विचार करणारी. तिचे वडील पण तितकेच चांगले.पण नशीब  वा दैव म्हणा एका अपघातात  ते वारले व आई पण  पतीच्या निधनानंतर, असाध्य आजाराने लवकरच देवा घरी गेली . मामाने मोठं केले शिकविले व स्वतः च्या पायावर ऊभी केली. आणि रोहिणी चे लग्न तिच्या आवडीनुसार शेखरशी करून दिले. शेखर पण त्यांना पसंद होताच ..तिला अनुरूपच होता. काही महिन्या नंतर मामाची बदली झाली. पण त्याला काही बदली झाली त्या ठिकाणी मना सारखे  न जमल्याने तो पण परदेशात सर्वीसचा प्रयत्न करतच होता. व तेव्हा मीडल ईस्ट कंट्रीज मधे  खूप ओध होता . त्यात मामा पण सह कुटुंब तेथे  परदेशी गेला. त्यामुळे दोघांचे नातेवाईक  कोणी जवळ नव्हतेच . 
      शेखरचे आई वडील  तर  आधी पासूनच  भारताबाहेर रहात होते. त्यामुळे लग्ना नंतर दुसऱ्या  महिन्यात ते परदेशी परतले. आणि मियां बीबींचा संसार सुरू झाला.यांचा संसार रथ सुंदर चालला होता असाच सुखाचा आनंदाचा संसार ते अनुभवत होते.सुखी जीवन जगण्यात  दोघे रममाण होते.
 
     दोघं आपापल्या कामात व्यस्त होते.दोघे एकामेकांच्या आवडी निवडी जपत होते.तडजोड रोहिणीची तर दिसतच होती. शेखर पण नेहमी विनयशील होता. .कधी उगाच पती-पणाचा रूबाब नाही. असाच वागत होता जणु काही एक  दुजेकेलिये असल्या प्रमाणे जोडी होती. काही जोड्या देवच स्वर्गात बांधतो असे म्हणतात तेच खरं.त्यातील रोहिणी शेखरची  होती म्हणायची.
           क्या रबने बनाई जोडी  असे गाणे या दोघांना पाहून खरे वाटायचे.
      पण नियतीला सुखी संसार पाहवला नाही म्हणा.  वा सुखी संसाराला दृष्ट लागली म्हणा.
असेच एकदा बाहेर गेले असता... परतीचा प्रवास  सुरू होता .दोन दिवसांच्या सुट्टी मुळे बाहेर गावी गेले होते. रस्त्यात  त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. त्या मोठ्या अपघातातून दोघे जेमतेम वाचले होते पण रोहिणीला बराच मार लागल्याने... 2/3 दिवसांनी ती भानावर आली .शेखर उदास मनाने बसला होता. मनात देवाचा धावा चालू होता.रोहिणी शुध्दीत आली. डाँ .नी शुध्दीत आल्यावर भेटण्यास परवानगी दिली ....फार बोलु नका .पण भेटू शकता. म्हणताच शेखरचा चेहरा थोडा खुलला.
 नव-यास  म्हणजे शेखरला आत पाठविले . शेखर आत गेला . तो देवाची मनोमन प्रार्थना करत.,तिच्या जवळ आला व हात प्रेमाने हळुवार उचलत म्हणाला ,
" माझी लाडकी रोही, व त्याने स्मित हास्य दिले.
तो आनंदाने खुश होत म्हणाला .कशी आहेस माझी रोही.. ती खिन्न हसली.
जखमा असंख्य त्यामुळे वेदना होत होत्या,
तिच्या चेह-यास बँडेज होते.  पण तिला तिच्या चेह-याची कल्पनाच नव्हती. अपघाता नंतर शुध्दित नसल्याने चेह-यास कितपत दुखापत झालीय ...बँडेज च्या आत लपलेला चेहरा कसा आहे याची तिला जाणीवच नव्हती.शेखरने पण दिली नव्हती.
   सर्व ट्रीटमेंट संपल्यावर . तिला घरी जाण्यास परवानगी मिळाली. दोघे घरी आले.
शेखरला पण इजा झाली .त्याच्या डोळ्याला थोडी दुखापत झाली आहे असे तिला माहित झाले होते. , दृष्टीत बरीच अंधुकता आली आहे असेही कळले होते.दोघेही हताश झालेले होते.काय करणार आली या भोगासी असावे सादर. अशी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती.
        घरी दोघेजण आलेत.. हळु हळु   रोहिणी च्या प्रकृतीत फरक पडला . घरात हिंडू फिरु लागली.तबियतीत सुधारणा होत गेली. पण एका वेळची रोहीणी नावा प्रमाणे नक्षत्रा सारखी सुंदर रुपवती असलेली ....अपघातात तिचा चेहरा पार कुरुप म्हणजे विद्रुप झाला होता. अनेक टांके चेह-यावर. त्यामुळे तिचे चेह-याचे बाह्य सौंदर्य पार लयास गेले होते.त्याची तिला मनोमनी खंत वाटायची. 
आरशात पहाण्याची बायकांना हौस असते. येता जाता दर्पणात आपले रूप पहाणे .याचा यौवनात चाळाच असतो. तिचे बाकी शरीर ठीक असल्याने ती  घरात हळूहळू काम करू लागली.शेखरला वेळोवेळी मदत रुप होत होती.
    हळुहळु पूर्ववत त्यांचा संसार सुरु झाला ... पण....ती स्वतःला आरशात पाहू शकत नव्हती. तिच्या मनात खंत होती ...रोहिणी पण शेखरला त्याची दृष्टी कमी झाल्याने शेखरला आपल्या कुरुपतेची कितपत कल्पना आहे.. याची तिला जाण नव्हती .त्याच्या कामात ती मदत करायची व तो पण तिची मदत घेत होता. असेच काही दिवस जात होते. रोहिणी सतत त्याला दृष्टी कमी झालीय या धारणेनेच मदत रुप होत होती. त्याच्या कामात आवर्जून मदतरूप असायची. असेच दिवस लोटत होते.
    आता रोहिणीत व्यंग म्हणजे विद्रुपता राहिली होती. बाकी सर्व कामे पूर्ववत करत होती. आधीच हुशार कुशाग्र बुध्दी त्यामुळे संसार पुन्हा सुरळीत सूरू होत होता.   शेखरला कमी दिसते या कल्पनेने
त्याला मदत रूप होत संसार चालला होता, डोळ्याच्या डॉ कडे जाताना मित्र शशांक येईल .तू येऊ नकोस  असे म्हणून तो तिला घेऊन जाण्यात टाळायचा. असेच दिवस जात असता...
....ती एकदा घरात जागेवरुन उठत असता काहीतरी पायात आल्याने ,ती अडखळली ....आणि... पडणार तर शेखरने तिला दूरुन येऊन पटकन सावरले.
 ती अवाक् झाली. रोहिणी म्हणाली,
 "अरे शेखर तुला दिसत नाही मग तू कसे मला धावत येऊन सावरलेस?"
आणि तितक्याच डोळस चपळतेने. कमी दिसते म्हणतोस आणि
मला तुझ्या डाॅ कडे पण जाताना नेहमी बरोबर नेण्याचे टाळतोस .
नेहमी काही ना काही  कारण सांगतो. व मित्र शशांकला घेऊन गेलो होतो म्हणतोस.
शेखर  थोडावेळ निरुत्तर राहिला. पण रोहिणी काही पिच्छा सोडला नाही. 
बरेच  विषय बदलत होता पण रोहिणी जास्त जास्तच तोच प्रश्न विचारत राहिली.
शेवटी शेखर उत्तरला ,
"खरय, रोही ..मला सारे दिसतय . थोडे दिवस  कमी म्हणजे अंधुक दिसत होते. पण औषधाने 
सर्व काही  ठीक झाले. पण मी दृष्टी गेल्याचे वाट अती कमी दिसण्याचे नाटक केले .कारण, तुझ्या मनात .....तुझ्या गेलेल्या रुपाची वा तुला नशिबाने ...दैवाने तुला जी कुरुपता वा विद्रुपता आली, त्याची सतत होणारी ....तुझ्या हृदयीची खंत मी जाणली .  तुझे दुःख मी जाणले.व हे नाटक केले.
तू तयार होऊन आरशासमोर उभे राहून आरशात पहाताना मी तुझ्या अंतरंगात डोकावून पाहिले
व तुझी खंत मनाने समजून घेतली.एवढेच नव्हे तर
   तू 2/3 दा बोलून पण दाखविलेस की , "मलाच माझेच रुप आरशात पाहवत नाही.
 व तू उदास व्हायची .ही तुझ्या मनाची चलबिचल ..खंत पाहिली .जाणवली...व तेव्हा मी नाटक चालू ठेवले.
 त्यावर रोहिणी म्हणाली ," अरे ,माझे हे रुप मलाच कसेसे वाटते ...तू माझी सेवा केलीस प्रेमाने .व.. अजून लग्न होऊन जेमतेम 3/4 महिने पण झाले नाहीत .. तर .,..तर मीच तुला स्वतःहून सांगते ,की तू दुसरी मुलगी शोध व नवा संसार कर. असेही आपल्याला मुलबाळ  अजून नाही आहे.पुर्ण आयुष्य असा माझा विद्रुप चेहरा पहात नको जगू. प्रेम प्रेमाच्या जागी आहे पण सौंदर्याला मनात जागा असतेच ना !
  त्यावर शेखर म्हणाला ,
 " काय वेडी आहेस का? मी काही फक्त तुझ्या रुपावर ......वा बुध्दीवर 
हो ! तू जितकी रुपवान आहेस तेवढीच हुशार ...बुध्दी वान पण आहेस.तू जितकी दिसायला रुपवान होती...(माझ्यासाठी अजून आहेस).. आणि.
 त्याहून तू अंतरीतून ..मनाने स्वभावाने सुंदर आहेस .... तुझा लाघवी स्वभाव ... माणसांना जिंकणे.... .लोभस स्वभाव ..यानेच मी प्रभावित झालेलो होतो व अजूनही आहे. मी तुझ्या बाह्य रुपाने जराही विचलित झालो नाही. ....तर तुझे निर्मळ मन... तितकेच सुंदर आहे. त्यामुळे हा विचार पुन्हा मनात आणू नकोस . असे म्हणत
पुढे येत तिला जवळ  ओढून घेत सोफ्यावर दोघे बसले . तिचा हात हाती घेतला
    आणि पुढे शेखर म्हणाला ," अग वेडे सौदंर्य म्हणजे काय बाह्य रुपाचेच असते का?
निसर्गात पहा किती सौंदर्य भरलेले आहे ते आपल्यास शोधता आले पाहिजे.सौंदर्य कोणाच्या आवाजात असते ..गान कोकिळा असतात.... कोकीळेचे रुप नव्हे,तर आवाज पहातात. कधी सौंदर्य कलाकृतीत दडलेले असते. कलाकृती इतकी सौंदर्याने नटलेली असते की मनुष्य भारावून जातो तर सौंदर्य हे शोधायचे असते. मन सुंदर असावे लागते. मनाची सुंदरता तनाच्या सुंदरतेत  नेहमीच कमी असते. 
   हे सारे जग.... सृष्टी .. सौंदर्याने नटलेली आहे. जसा आनंद शोधायचा असतो ना तसेच सौंदयाचे असते..शोधता ते सापडते ... त्या साठी सौंदर्य पहाण्याची दृष्टी हवी.
      साधे पहा , ताजमहल व आगाखा महल.... दोन्हीही महल. एक सुंदरतेने नटलेला आहे . व सुंदरतेची प्रतिमा आहे..., तर दुस-यात राजमाता कस्तुरबा यांचा निवासामुळे  आगाखा महलास आंतरिक सुंदर ता आहे.
          तर तुझे **आंतरिक सौंदर्यच** माझ्या मनी आहे व तेच खरे सौंदर्य .
रोहिणी च्या डोळ्यात पाणी तरारले. 
मनापासून प्रेम करणाऱ्या शेखरच्या कुशीत अलवार घुसली. मनात देवाला स्मरत लाख लाख 
वंदन करती झाली.


वैशाली अविनाश वर्तक
अहमदाबाद
८१४१४२७४३०








    



अक्षयतृतीया


यारिया साहित्य आयोजित
महास्पर्धा
प्रथम फेरी
सुधाकरी अभंग

शिर्षक- सुमुहुर्त दिन

विषय - अक्षय तृतीया

दिन असे शुभ
अक्षय तृतीया
साजरी करुया
आनंदाने.

याच दिनी करी
बसवेश्वराची
परशुरामाची
पूजा अर्चा

 सवाष्णींचा सण
डाळ, कैरी, पन्हे
गौरी पूजनाने
तृतीयेला

अक्षय तृतीया
पावन सोहळा
जमे गोतावळा
घरोघरी

याच दिनी म्हणे
जल कुंभ दान
म्हणती महान
सदा द्यावे

आहे शुभ दिन
कार्य आरंभास
राखुया उल्हास
मनोमनी

दिन तो भाग्याचा
 शुभ होणे आता
 नकोच ती चिंता
कोरोनाची

वैशाली वर्तक


उपक्रम
अष्टाक्षरी
अक्षय तृतीया

दिन आहे शुभची हा
साडेतीन मुहुर्ताचा
कार्यारंभ करण्यास
असे सदाची मानाचा

करु साजरा मिळूनी
सण अक्षय तृतीया
असे दिन हा चांगला
नवी खरेदी करुया

याच दिनी हो करिती
पितरांचे ते तर्पण
भाव ठेवुनिया शुध्द
करा या दिनी अर्पण

बायकांचा तो सोहळा
देती डाळ कैरी पन्हे
जमुनिया सा-याजणी
करी गौरी पुजनाने

दारी काढून रांगोळी
लावी आंब्याचे तोरण
परशुरामाची पुजा
करु गौरींचे पूजन


दिन आहे ची हा शुभ
नको चिंताची कशाची
शुभ होणार जगती
नाही भिती कोरोनाची

वैशाली वर्तक

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...