रोज एक कविता फेस बुक पेज तर्फे आयोजित
विषय - पाऊस 26/6/2020
**पावसा कधी रे कळेल तुला**
तुजवरी च पावसा
आधारित सारी सृष्टी
तरी का तू न ठेविशी
तीजवरी कृपादृष्टी
सुधा भ्रमण करिते
नित्य नियमीत नेमाने
म्हणूनच येती जगी
ऋतू चक्र हे क्रमाने
पण पावसा तुझाच
दिसे तो चुकारपणा
राही अडूनी वेळेला
दावी सदाची मी पणा
येता कधी न वेळेत
करितोस कधी उशीर
पाण्या विना भुकेलेली
पहा दिसती शिवार
विना पाणी जीव सृष्टी
कशी सांग बहरेल
प्राणी मात्र तुजविण
कसे काय वाचतील
कधी येशी अवचित
कष्टी होई बळी मनी
जाते सुकूनिया पीक
दुःखी होई क्षणोक्षणी
अती वृष्टी करुनीया
नेतो वाहूनी शिवार
बळी होतसे हताश
सर्व परीने बेजार
उभे पीक मोत्यासम
पाहुनिया सुख वाटे
नको तेव्हा बरसणे
मनातूनी दुःख दाटे.
------------------------------------
उपक्रम
अभंग रचना
विषय - नवखा पाऊस
नवखा पाऊस
बरसती धारा
सोसाट्याचा वारा
अवचित 1
ओली चिंब झाली
सृष्टी न्हाली सारी
वसुंधरा न्यारी
दिसतसे 2(
वृक्ष लता वेली
तरारल्या झणी
आनंदित क्षणी
वाटतसे 3
नवखा पाऊस
आवडे जनास
सुखवी मनास
पाऊसतो 4
पाऊस सदाची
असुनी जुनाच
वाटे नवखाच
सदाकाळ 5
नवखा पाऊस
वाटे सदा हवा
रोज रोज नवा
वाटतसे 6
वैशाली वर्तक
विषय - पाऊस 26/6/2020
**पावसा कधी रे कळेल तुला**
तुजवरी च पावसा
आधारित सारी सृष्टी
तरी का तू न ठेविशी
तीजवरी कृपादृष्टी
सुधा भ्रमण करिते
नित्य नियमीत नेमाने
म्हणूनच येती जगी
ऋतू चक्र हे क्रमाने
पण पावसा तुझाच
दिसे तो चुकारपणा
राही अडूनी वेळेला
दावी सदाची मी पणा
येता कधी न वेळेत
करितोस कधी उशीर
पाण्या विना भुकेलेली
पहा दिसती शिवार
विना पाणी जीव सृष्टी
कशी सांग बहरेल
प्राणी मात्र तुजविण
कसे काय वाचतील
कधी येशी अवचित
कष्टी होई बळी मनी
जाते सुकूनिया पीक
दुःखी होई क्षणोक्षणी
अती वृष्टी करुनीया
नेतो वाहूनी शिवार
बळी होतसे हताश
सर्व परीने बेजार
उभे पीक मोत्यासम
पाहुनिया सुख वाटे
नको तेव्हा बरसणे
मनातूनी दुःख दाटे.
------------------------------------
उपक्रम
अभंग रचना
विषय - नवखा पाऊस
नवखा पाऊस
बरसती धारा
सोसाट्याचा वारा
अवचित 1
ओली चिंब झाली
सृष्टी न्हाली सारी
वसुंधरा न्यारी
दिसतसे 2(
वृक्ष लता वेली
तरारल्या झणी
आनंदित क्षणी
वाटतसे 3
नवखा पाऊस
आवडे जनास
सुखवी मनास
पाऊसतो 4
पाऊस सदाची
असुनी जुनाच
वाटे नवखाच
सदाकाळ 5
नवखा पाऊस
वाटे सदा हवा
रोज रोज नवा
वाटतसे 6
वैशाली वर्तक