शनिवार, २८ मार्च, २०२०

गुढी पाडवा

प्रेमाची क्र.34
   विषय- गुढी पाडवा

  आला सण पाडव्याचा
  येते मनी गीतरामायण
  ओठी येतात मराठी गाणी
   करु चला त्यांचे पारायण

   गुढ्या उभारल्या घरोघरी
   करती प्रार्थना  मनोमनी
   नव वर्षाच्या जन देती शुभेच्छा
   परि भय कोरोनाचे क्षणोक्षणी

    वसंत ऋतुने नटली सृष्टी
    निहाळुया तियेचे सौंदर्य
    सकारात्मक भाव ठेवू मनी
     स्मरुया देवाचे औदार्य

   स्वागत करु नव वर्षाचे
    बांधूनी गुढी चैतन्याची
    महामारी मुक्त कर देवा
    हीच मागणी संस्कारी  देशाची


    सारे आपण बांधव देशाचे
     जपू विश्व बंधुत्व भाव मनी
      मंत्र  समतेचा देऊनी जना
     मानवता धर्म  पाळू या क्षणी

        वैशाली वर्तक

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

गुढी प्रेमाची

काव्यपुष्प साहित्य  मंच राज्यस्तरिय
     काव्य लेखन स्पर्धेसाठी
     विषय - गुढी उभारु प्रेमाची


   **गुढी प्रेमाची**
  आला सण पाडव्याचा
  लावू गुढी समतेची
  दूर सारु जाती भेद
  **गुढी उभारु प्रेमाची**

   विसरुनी राग द्वेष
  मनी भरु प्रेम भाव
  जसे होते रामराज्यी
   नसे सुखाचा अभाव

   स्वच्छ ठेवण्या भारत
   करु निर्धार मनाचा
  पळवून कोरोनाला
   क्षण आणू आनंदाचा

  बांधू  तोरण आंब्याचे
  दारी रेखुया रांगोळी
  सौख्य नांदो घरोघरी
  काढू शुभेच्छांच्या ओळी.

  जग सुखी सारे होवो
  हेच मागणे देवास
 पूर्ण  होवोत कामना
  दूर कर कोरोनास

  ध्येय ठेवू सदा उंच
  मुखी ठेवूनी गोडवा
  जपू संस्कार संस्कृती 
  आला सण हा पाडवा

 ......वैशाली वर्तक.....23/3/2020
       अहमदाबाद
  8141427430

चहा


उपक्रम
विषय -चहा

सकाळी उठताच येते
आठवण ती चहाची
वाफाळलेला कप दिसता
सुस्ती उडले तनाची

काळ वेळ नाही लागत
केव्हाही आवडे पिण्यास
सुचत नाही वाटले तरी
हवा तो  विचार सुचण्यास

येते आठवण चहाची
 जमता ढग आकाशी
चहा आल्याचा आठवे
 वाटे मिळावा चुटकी सरशी

हाती असता चहा
गप्पा येतात रंगात
आठवणीं येतात जुळून
जुन्या काळच्या मनात

उगाच नाही  म्हणत
चहास पृथ्वीवरील  अमृत
येता जाता प्यावा चहा
प्राशन करावे जठरामृत

वैशाली वर्तक

रविवार, २२ मार्च, २०२०

सुगी

सुगी

सोनियाचे आले दिन
दिसे सुख शिवारात
धान्य  आले बहरुन
बळी हसतो गालात

 येता पीक  भरघोस
मोल जाहले कष्टाचे
दिसे दारी धान्य  रास
दिन दाविले सुगीचे

कणसात दाणे भार
जणु भासे  मोती-मोती     
पाखरांची झुंड फार
हवी  गोफणच  हाती

आली कणसे खळ्यात
बैल फिरती जोमाने
सुरु मळणी झोडणी
गाणी गाती आनंदाने

 झाली चंगळ चा-याची
  बळी खुश  मनोमनी
  हंबरती गाई गुरे 
 मोद दिसे  क्षणो क्षणी                       

देवाजीने केली कृपा
स्वप्न पहा साकारले
राजा राणी पोर बाळे
घर सारे आनंदले

वैशाली  वर्तक



सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...