*स्पर्धेसाठी*
कमल विश्व राज्य स्तरीय साहित्य समूह आयोजित
डिसेंबर 2022 मासिक भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
31/12/2022
विषय ..हे वर्ष अमृताचे
खरच दोन वर्षे कोरोनात
किती लोक गेली जीवानिशी
धंदा पाणी बंद टाळेबंदीने
भेट-गाठ नाही आप्तेष्टांशी
पण *हे वर्ष ठरले अमृताचे*
पूर्ववत जन जीवन सारे
उद्योग धंद्यात आली गती
नव चैतन्याचे वाहिले वारे
कथन साने गुरुजींचे
ख-या अर्थाने ठरले उचित
जाहला बलसागर भारत
विश्वात शोभला खचित
स्वराज्य प्राप्तीचा अमृत काळ
देश जाहला आत्म निर्भर
साजरा करीती हर्ष उल्हासे
स्वावलंबनाचे झरे देशभर
विसरूनी जातीभेद सारे
समजून घेत नव्याने समतेला
संतानी ही पसायदानातून
दिलेला मंत्र देऊ जनतेला
वैशाली वर्तक
अहमदाबाद