प्रजित साहित्यिक समूह
षडाक्षरी काव्य रचना
उपक्रमासाठी
विषय -- माती
*मातीचीच माया*
माती असे माय
जन्मतो कुशीत
देते अन्न वस्त्र
ठेवते खुशीत 1
मातीत रुजता
बीज अंकुरते
हिरवे शिवार
मना संतोषते 2
बळी करी प्रेम
काळ्या मातीवर
कुरवाळे प्रेम
जीव तिच्यावर 3
मातीच्या गोळ्याला
देऊन आकार
घट बनवून
कलेला साकार 4
मातीत जन्मतो
मातीतच अंत
मातीच संभाळी
नको मनी खंत 5
पडता पाऊस
मातीचा सुगंध
तेव्हा अत्तराचा
फिका वाटे गंध 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद