शुक्रवार, २४ मार्च, २०२३

नवी प्रकाशाची वाट

भारतीय साहित्य मंच
आयोजित उपक्रम
दि २४\३\२३

 विषय..नवी प्रकाशाची वाट

  
रवी येताची नभांगणी 
पहा झाली रम्य पहाट 
रोजचा नवा उषा:काल 
दावी नवी प्रकाशाची वाट 

पहा कशी पसरली 
रवी किरणे दावीत आशा
नव पल्लवित झाली पाने
उठा दूर सारूनी निराशा

रोजचा सूर्य येतो गगनी
दूर सारून तिमीर निशेचा
 व्हावे सज्ज होण्या प्रगत
प्रारंभास  उज्वल दिशेचा


  नको आता उगा थांबणे
  खुणावते नवी प्रकाशाची वाट 
  चला जाऊया नव मार्गे
  करण्या जीवनी भरभराट


वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, २१ मार्च, २०२३

माणुसकीने वाग रे


अ भा म सा प स्वप्नगंध समूह 
विषय - माणुसकीने वाग रे

माना मानव हीच जात 
मानवता हाची धर्म 
नसे उच नीच कोणी
यातच जीवनाचे मर्म

पृथ्वी माता मानताच
आपण सारे बांधव रेकप
विश्व बंधुत्वाची भावना
*माणुसकीने वाग रे*

देवास नसती कोणी लहान
सूर्य  देतो प्रकाश एक समान
  तूही न करीता  दुजा भाव 
माणुसकीला दे सदा मान

जतन करू संस्काराची पुंजी
भुकेलेल्या अन्न देणे
उजवा हात दुखावता
डाव्या हाताने पुढे येणे

गंगा जळ पाजले मुक प्राण्यास
संताची हीच आहे  शिकवण
भुत दयेची तयांना जाणीव
 सदा मनी ठेवू तीच आठवण

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सारे मानव आहेत बांधव
माणुसकीची आहे शिकवण
मानवता हाची  धर्म हीच
  उदात्त भावना करते साठवण 


संस्कार केले बालपणी 
सारे मानव असती समान
सारे असता लेकरे देवाची 
 कोणी नसतो महान लहान 

सूर्य देतो प्रकाश  सर्वांना 
 ठायी नसे दुजा भाव
जशी सरिता देते जीवन 
 मातेच्या प्रेमात नसे अभाव

सोमवार, २० मार्च, २०२३

उतार वय एक बालपण

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित उपक्रम 
विषय..उतार वय एक बालपण


 उतारवयात एकंदर
स्मरणशक्ती होते कमी
हालचाली मंदावतात 
आत्मविश्वासाची नसते हमी

 पण विसर पडत नाही 
यौवनातील कर्तृत्वाचे दिन
हट्टीपणा बळावतो
पूर्वीचा मान सन्मान भासे क्षीण 


वाटे सदैव ऐकावे जनांनी 
 बोल  ओठीचे अनुभवाचे
 पांढरे केसांचे दावीती महत्त्व 
 नको तितके  उपदेश द्यावयाचे

   असते भरलेले आयुष्याचे 
    अनुभवाचे शहाणपण
   पण कधी वाटे कसे सांगू
    खरं पहाता. आता सुरु दुजे बालपण.

वैशाली वर्तक

चवदार तळ्याचे पाणी.

सर्वधर्मसमभाव साहित्य मंच आयोजित
 उपक्रम क्रमांक ११३
विषय.. चवदार तळ्याचे पाणी 

निसर्गाची असे देन
जाण समानतेची हवी ठाव
जल हे तत्व अनमोल
असे असता का भेदभाव 

तूची पुकारले बंड जलासाठी
गाजला जल सत्याग्रह महाडला
घेऊन लक्षात हक्क समतेचा
मुभा दिली स्पर्श करण्या सर्व जनतेला 

होती विषमता भरलेली समाजी 
चवदार झाले तळ्याच पाणी
तुझ्या क्रांतिकारी परिवर्तनाचे
 आज गुणगान गाती गाणी

आता  दिसते समानता
नाही उरले  स्पृश्य अस्पृश्य
समतेचा भाव नांदे
सर्वत्र दिसते ऐक्यतेचे दृश्य

वैशाली वर्तक
अहमदाबाद

DBA साहित्यिक गडचिरोली
आयोजित उपक्रम
सोमवार २०/३/२३
विषय .. स्पर्श चवदार पाण्याचा 

निसर्गाची असे देन
जाण समानतेची हवीच ठाव
जल हे तत्व अनमोल
असे असता का भेदभाव 

 पुकारले बंड जलासाठी
गाजला जल सत्याग्रह महाडला
घेऊन लक्षात हक्क समतेचा
मुभा दिली स्पर्श करण्या आम प्रजेला

होती विषमता भरलेली समाजात 
चवदार झाले तळ्याच पाणी
तुझ्या क्रांतिकारी परिवर्तनाचे
 आज गुणगान गाती गाणी

आता  दिसते समानता
नाही उरले  स्पृश्य अस्पृश्य
समतेचा भाव नांदे
सर्वत्र दिसते ऐक्यतेचे दृश्य

बाबांच्या दलाच्या संघर्षाने
 खुला करून दिला जलाशय
 सारे जन गुण्यागोविंदाने राहो
  समतेचा भाव नांदण्याचा आशय

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, १९ मार्च, २०२३

मुक्तछंद. वरील प्रवास

मुक्तछंद काव्य लिखाण स्पर्धा
४ वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा
स्पर्धेसाठी
विषय.. मुक्त छंदा वरील प्रवास
   *मुक्तछंद काव्यलेखन*     


साहित्याच्या  दोन धारा
गद्य अन पद्य अमाप पसारा
 नाटक ,कादंबरी ,लघुकथा
 कविता, वा  विनोदी वात्रटिका.
  काव्यात  आहेत  प्रकार अनेक
   मुक्तछंद हा प्रकार अभिनव एक
   जरी नसते यमक साधणे
   गेयते कडे मात्र लक्ष हवे.
    मना मनातले भाव सहजची
    उतरती लेखणीतून मुक्तछंदात
    छंद,वृत्त , कोट्या ,समास
     या शृंगाराचा  साज  दिसे काव्यात
     वीर , करूणा , भय अन हास्य
     असते सुंदर ललित काव्य
      या सा-या नव रसाने युक्त
      वाहताती  मुक्तछंदी काव्यातून 
       *मुक्तछंद वरील प्रवास*
       भासे जरी सरळ सोपा
       शब्दांचा  जुळवावा लागे मेळ
       तेव्हा उमजती  भाव योग्य स्वरूपात 
        मग देती दाद वाचक तयास
   

वैशाली वर्तक
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...