बुधवार, २३ मार्च, २०२२

सहाक्षरी बलिदान/चैतन्याचे वारे / सुंदरशर्वरी/राधेचा श्रीहरी

सावली प्रकाशन समूह 
उपक्रमासाठी
षडाक्षरी काव्य रचना
विषय - बलिदान
*वीर जवान*

भारत मातेचे 
ते वीर महान
स्वातंत्र्य लढ्याचे
शहीद जवान

न करता पर्वा
अर्पियले प्राण
 ध्येय प्राप्ती साठी
केले *बलिदान*

इतिहास सांगे
तयांची महती
स्वातंत्र्य  वीरांची
किर्ती ती जगती

जाहले अनेक
वीर अगणिक
अमर कहाणी
ती ऐतिहासिक

नकोची नुसते   
करणे  स्मरण
जाणु बलिदान
करीता वंदन


उपकार फेड
नसेची सहज
स्वातंत्र्याचा मान
आजची गरज


वैशाली वर्तक







कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित  उपक्रम
विषय - चैतन्याचे वारे
सहाक्षरी रचना
    
   *येता वर्षाधारा*

सजली वसुधा
होता वर्षाधारा
सुंदर  फुलली 
सांगे कानी  वारा

बहरली  सृष्टी  
पाचू चहुकडे
चैतन्याचे वारे
पाहू कुणीकडे

नसे मरगळ
आले सणवार 
आप्त भेटण्याने
 मोद दिसे फार

लेक येता घरी
प्रेम भाव खरा
दिसे मुखावरी
चैतन्याचा झरा

श्रावण मासात
दिसे हमखास
चैतन्य वाहते
सर्वत्र  उल्हास 


आगमन श्रींचे
चैतन्याचे वारे
येता गणराया
उत्सव ते न्यारे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




साहित्य सेवा  स्पर्धा  समूह
आयोजित 
उपक्रम
षडाक्षरी लेखन
विषय - सुंदर  शर्वरी


मोहक शर्वरी
सजली सुंदर 
पहात रहावे
रूप मनोहर

टिपूर तारका
आल्या ठुमकत
एका हून एक
होत्या चमकत

शशी चांदण्यांचा
रंगलेला खेळ 
शर्वरीने तिचा
जमविला मेळ

रात्रभर  वाहे 
शीतल पवन
भरले सारेच
ता-यांनी गगन

खेळ पाहताना
 डुले रातराणी
 गंध उधळीत
गात होती गाणी

अलवार आली
रवीची चाहुल
आवरला खेळ
काढते पाऊल

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विश्व शारदा सा मी( मुख्य)

*राधेचा श्रीहरी*

ध्यानी मनी तिच्या l 
देवकी नंदन l
मुखी हरीनाम
करिता मंथन l 

अविरत करी l 
हरिचे चिंतन l
बोली कृष्ण कृष्ण 
तियेचे कंकण l

नको जाऊ कृष्णा l 
कैसे कंठु दिन l
जीव तुजवीण ll 
माझा होतो क्षीण l

मुरलीचे वेड l
 लावीतो श्रीहरी
 आहे राधाभोळी 
भाळीली बावरी l 

राधा रमणचे l
 प्रेमच आगळे l
आहे सर्वाहून l
जगी या वेगळे l 

श्रीहरी राधेचा l 
आत्मा एकरुप l
पहा अव्दैताचा l
प्रगटला दीप l


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आई . कविता जिव्हाळा.. जिद्द .. पत्र लेखन ...संवाद ...चारोळ्या आई कथा शतशब्द

शब्दसेतू साहित्य  मंच  
कथा
जिद्द 
 "मला इतक्यात लग्न नाही करायच .मला पण ssc व्हायचय." पण कोण ऐकणार. ? आई  व तिच्या दोन बहिणी  मामांकडे 
रहात होत्या. व स्वतःच्या  गावात शिक्षिणाची सोय नव्हती. 
मामाकडे रहाणे गरजे होते. 
    कधी या मामा कडे तर कधी दुस- या मामाकडे. 
एक मामा त्याकाळी जमखींडी संस्थानात  नोकरीस होता. त्यामुळे आर्थिक  परिस्थिती  छान होती. दुसरे मामा ..पेशाने शिक्षक .. त्यांची मुले शिकत होती. त्यांच्या बरोबर रहात असल्याने आईला शिकण्यात गोडी झाली होती. 
    दुस-या दोन बहिणींना तेवढी शिक्षणाची आवड नव्हती.. कल पण नव्हता. पण तसे हिचे नव्हते. पण मामी मंडळींना पण 3/3 भाच्या घरात तसेच स्वतःची पण 3/4 मुले त्या मुळे जशी स्थळे येता बहिणींची लग्ने उरकलीत. आणि स्वातंत्र्या पूर्वी चा काळ 
तेव्हा मुलींचे शिक्षण गौण मानले जायचे. वयाच्या 17/18 व्या वर्षी  लग्न होत. 
तसेच आई चे झाले .लग्न झाले ..सासरी आली. सासरी पण आर्थिक  परिस्थिती  बेताची ..मील गिरणीत वडिलांची नोकरी.
घरात आई बायको बहिण   व एकच कमविणारे. 
     पण काळाची गरज  तसेच आईची शिक्षण आवड जिद्द  बाबांना समजली .त्यांनी तिला शिक्षणाची सुरूवात  करण्यास त्यावेळी  व फा. म्हणजे व्हर्नीक्युलरा फायनल  परीक्षा  असे .तिला बसविले. आणि ती परीक्षा  देता शाळेतून त्या वेळी नोकरी  मिळत असे. ती परीक्षा  तिने यशस्वीपणे  पार केली. नुसती तिनेच नाही तर नणंदेस पण द्यायला लावली. ती म्हणायची", तू शीक बाई .माझे नाही झाले पण तू शीक .शिक्षण संसारात कामास येईल. स्वतःच्या  पायावर आपणास उभे रहाता आले पाहिजे. "
   एवढेच नव्हे आजु बाजुच्या समवयस्क  बायकांना पण ती सांगायची. शिक्षण  महत्त्व समजवायची. 
    तिने कुटुंबास हातभार लावण्यासाठी शिवण पण शिकली जेणे करुन चार पैसे कमवता येतील . व शिवण शिक्षका म्हणून पण शाळेत  नोकरी मिळेल .आणि तेच झाले. शिवण शिक्षिका म्हणून प्रायव्हेट शाळेत लागली. एका  बाजूस म्युनिसीपालटी शाळेत अर्ज करत होतीच. व तिच्या जिद्यीस यश आले. शाळेत  नोकरीस लागली. पण शिकवत असता  शालेय शिक्षणासाठीचा
पुण्यास दोन वर्षाचा कोर्स चालायचा. जेथे रहात होती ...त्या संसारच्या शहरात मराठी  माध्यम नसल्याने तिला पुण्यास जाणे भाग होते. व त्या कोर्सने नोकरीत पुढे प्रगतीची संधी मिळवण्याच्या कामाची होती. 
    शेवटी आई बाबांनी एकमते आईला पाठविण्याचे ठरविले. 
अर्थात आजुबाजुचे लोक म्हणत काय बाई आहे मुलांना सोडून शिकायला जात आहे. अहो बाहेरचे काय नातलग पण बाबांना म्हणाले की कशाला  पाठवतोय.पुढे  डोक्यावर चढेल. हो लोक तर बोलणार च ...पण ते दोघे  विचाराने  खंबीर होते. ती पूण्यास जाऊन कोर्स पूर्ण  करुन आली.  
  पुढे मुले मोठी झाली.   मुलगा ssc झाला . तिची मनातील इच्छा  आजून बळकावली . तिने बाहेरून s s c चा फाॕर्म भरुन 
मुलाच्या सिलेबलचा वापर करुन ती s s c झाली. जिद्द  काय ती तिने दाखविली. पुढे  सिनियर पि टी सी होऊन म्युनिसीपालटी तील शाळेत प्रिन्सीपल  म्हणून नोकरी करत 
निवृत्त  झाली.  मी शिकणार ही मनीची जिद्द .
     तिने गरीब विद्यार्थ्यांना  शिकवून  विद्या  दान केले .जणु
शिक्षणाचा  वसाच घेतला होता.  
  आयुष्याच्या शेवटा पर्यंत  तीचे व पुस्तकाचे नाते अतुट 
होते.  जिद्द  म्हणजे काय आम्ही  तिच्यात पाहिली व तिच्या  कडून शिकलो. 
आज माझी जी लेखणी आहे ती ..तिचेच वरदान आहे. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  
उपक्रम  3/22
विषय पत्र  लेखन

                                          ।   श्री  । 
प्रेषक
  सौ वैशाली वर्तक 
    अहमदाबाद 

   प्रिय ती. आईस
   सानविवि
            खरच ग आई  . आज समूहावर आईस *पत्र  लेखन* विषय दिल्याने तुझ्या शी संवाद साधण्याची छानच  संधी मिळाली . खरच तुझ्या शी खूप  सारे बोलायचे सांगायचे आहे. किती काळ लोटला. खूप  सा-या घडामोडी घडल्या . कुठून सुरुवात करु .
मलाच समजत नाहीआहे. 
         मोठ्या नातवाच्या लग्नात तर तू  होतीस . किती 7 दिवस लग्न चालले होते.   आमच्या कडच्या सर्व  नातेवाईकांना फारच आवडले होते. पुढे   पणतु दर्शन पण तू केलेस .तुझ्या  पहिल्या
लाडक्या नातवाच्या   मुलाचे (पणतुचे)मुख दर्शन होते.  
   आणि कौतुकाचा भाग  की,  तेव्हा चार ही पणज्या तुम्ही  रांगेत बसल्या होत्या . चौघींचे औक्षण करुन मी बकूळ फूले तुमच्या शिरावर उधळली होती. काय अपूर्व  सोहळा होता ना. 
     पण पुढे  दुस-या नातवाचे लग्न ठरले त्या सूनेला पण तू पाहिलेस ...पण माझे दुर्भाग्य तुझी तब्बेत खालावत गेली.
व त्याच्या पुण्यातील लग्नाला तू नव्हती. मोठ्या नातवाच्या लग्ना  प्रमाणे त्याचे पण लग्न थाटात केले . पुढे मुलीचे पण लग्न झाले 
       अग तुला खास सांगायचे तू हाडाची शिक्षीका.. दोन्हीही  नातू  तुझ्या च कडे शिकायची. त्यात पहिल्या नातवावर  तुझा जास्त लळा... काय कौतुक सांगू त्याचे ! तू असतांनाच तो नोकरीस तर लागला होताच. BE तर होताच पुढे mtech झाला  आता काय सांगू phd करत आहे. एवढेच नव्हे तर नाटकातून काम करतो. आपल्या महाराष्ट्र  समाजाचा नाट्य सेक्रेटरी आहे .बृहन महाराष्ट्रातून नाटकातून बरीच पारितोषिक  मिळवतो. स्वतः नाटक लिहून नाटक बसवतो.  आधी तुझी नातंवड म्हणून लोक त्याला ओळखायची आता सारे शहर आम्हाला  त्याचे आईवडील म्हणून ओळखतात.. किती छान वाटत ना! 
असो दुसरा नातु पण कमी नाही हं  ..तो पण परदेशात छान काॕम्पुटर eng असून मोठ्या कंपनीत सर्वीसला आहे. छान तेथे बस्तान मांडलय. 
    आणि मुलीचे कौतुक  काय सांगु? ती पण आपल्याच शहरात असल्याने  सतत भेटते. विशेष म्हणजे नणदा भावजया अगदी दृष्ट लागेल अशा मैत्रीणी आहेत. रहायला पण जवळच आहे .
ती पण मोठ्या कंपनीत सर्वीसला आहे. मुलीचे पण सुख उपभोगत आहे .ती म्हणजे तिसरा मुलगाच आहे. 
आणि हो तिन्हीही मुलांनी संगीत आवड छान जोपासली आहे एक तबला विषारद तर दुसरा हार्मोनियम निषण्णात आहे. सतत परदेशात कोणाला  साथ संगत करत असतो. मुलगी पण विशारद झाली. तिघांनी तू असतांना गायनाचे कार्यक्रम 7/8 झाले होतेच .
आणि तुझी लेक पण कमी नाही हं. मुलगी कोणाची? पूर्वी  मी पोहत होतेच. म्हणजे शाळा काॕलेज मधे असताना च्यपियन होतेच.  पण विशेष म्हणजे मी ६५ नंतर पुन्हा  पोहण्यात वरिष्ठ  नागरिकात भाग घेउ लागले  आहे. व आता पण मी राज्य स्तरीय पारितोषिक  मिळवलीत. .ऐवढेच नव्हेतर  कॕनडाला fina   ला पण भाग घेण्यास जाउन आले .तेथे काही नंबर आला नाही पण utub वर नाव झळकले .  असो 
हे सगळे प्रसंग जात असता मला तुझी बाबांची फार आठवण होई .तुम्ही  हवा होता.  बाबा तर गावभर माझे कौतुक  करत फिरले असते .
असो .फार वर्षांच्या गप्पा केल्या .आणि खरतर समूहाचे आभार मानते . हे सर्व  एका दमात मला   तुला सांगायला मिळाले. 

पत्र तुझ्या  फोटो फ्रेम मधे ठेवत आहे . पुन्हा  अशीच लेखणीतून तुला भेटीन. आता लेखणी माझी सखी झालीय.
तुला त्याबद्दल  पुढच्या भेटीत सांगेन.
 तुझी 
विनौदिनी (बेबी)

प्रति
शोकेस मधील  फोटोप्रेम मधे


शब्दसेतू  साहित्य  मंच
उपक्रम क्रमांक ४/२२

संवाद 
आई ---मुलगी

आई -    "अग मुग्धा  आम्ही २ महिने सचिन कडे जात आहोत. "
मुग्धा -  "हो ग आई  .तू नाही तर घर सुन सुन होईल. पण काय    
             तुला सचिनकडे पण जावयास  हवेच ना. त्याला तसेच                           
            तेथील नातवंडाना पण तुझी माया मिळाली पाहिजेना". 
आई -  " हो ग  ! तो एकटाच  दूर आहे.. तरी बर ४/५ तासाच्या 
             अंतरावर  आहे  त्या   अमेरिका वगैरे पेक्षा बर."
           आणि तेथील समाजात  जाऊन मस्त  मराठी
              वातावरणात वावरत आहे." 
मुग्धा -- "आणि तुझे केलेले संस्कार .अगदी गुढी बांधण्यापासून 
              दिवाळीत रांगोळी  पर्यंत..  जराही भारता बाहेर आहेत     
              असे त्यांना जाणवत नाही
              " तसे  ssही आपण महाराष्ट्रा च्या बाहेर च राहिलो.       
             गुजरात मधे तू आणि  आम्ही    तिघेही जन्मलो. पण 
             तुझ्या  केलेल्या संस्काराने मराठी पण   छानच
             जोपासले गेले आहे."
आई --     "हो ! गुजरात  मधे राहून आपण नुसती  संस्कृती  नव्हे 
               तर मराठी  भाषा पण जोपासली.. थोडे खाद्य पदार्थ  
               गुजराथी  आपण स्विकारलेत.
                तुम्हा मुलांनी पण तशीच मला साथ दिली.
               वेळोवेळी रामदास नवमी, वकृत्व स्पर्धेत  भाग घेऊन 
              श्लोक पाठांतर स्पर्धेत  भाग घेऊन ,   तसेच मराठी    
               माध्यम  शाळा  असल्याने आपण मराठी भाषा
              वाचविण्यात पण हातभार लागला आहे."
मुग्धा ---  "हो  आणि तू पण निवृत्त  काळात मराठी  लिखाण 
               करत आहेस . व  माझे दोन्हीही भाऊ तुझ्या गीतांना
              स्वर बध्द करुन पेटी- तबल्याची साथ करत आहेत व
              माझ्या भावजयांनी ती गाऊन त्याची सुंदर  गीत utub 
              वर प्रस्तुत  केली आहेत.    किती ग गीत, अभंग  केली
               प्रस्तुत  केली आहेत. ?  मला वाटते  6/7 झाली     
               असावीत ना?"
आई ---  "हो ग बाई . पण त्यात तुझ्या  बाबांचा हातभार मोठा हे
               खर .मुलांच्या मागेलागून .ते काम करुन घेतात."
              
मुग्धा  -- "अग  आई ती आठरा श्लोकी गीता ठेवली की नाही 
             बॕगेत..यंदा तनु अनुला   ती शिकविणार आहेस ना? "
             
आई -   "बर केलेस बाई आठवण केलीस .,हो टाकते आधी. "
मुग्धा - " चल इथली काळजी करु नकोस  तुझी बाळे ( रोपे  
            फूल झाडे याची आम्ही  काळजी घेऊ . झोप आता ."


वैशाली वर्तक 
अहमदाबाद


शब्दसेतू साहित्य मंच
आयोजित 
 स्पर्धेसाठी
आई विषयावर  जोड शब्द व जोडाक्षरसहित चारोळी

सण -वार येता  आई
व्यस्त रहाते कामात
संस्कृतीला   जपूनिया
घर-काम संपविते क्षणात

शब्द येता ओठी आई
डोळा येते सोज्वळ मूर्ती 
काम धामाचा विचार  सर्वदा
देते कुटुंबाला सदैव स्फूर्ती 


हाती देऊनी पाटी-पुस्तक 
आईने केले मज साक्षर
तिच्या कष्टाने झाले कर्तृत्ववान
मजला तिचा सदैव आदर

दिन-रात मनी चिंतन
साधण्या  मुलांचा उत्कर्ष
आई असते अहो रात्र जागृत
   यश  मिळता  तिच्या मनी हर्ष

सकाळीचे केर  वारे संपता
    क्षणभराची उसंत नाही
  अस्ताव्यस्त  आवरता घर
तिची लगबग चालूच राही
  
  

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





शब्दसेतू साहित्य  मंच
शत शब्द कथा लेखन
अनुभवाचे बोल

शेजारच्या काकू  चिंतीत  घरातआल्या .आजीस म्हणाल्या,"माझ्या मुलास बरे नाही काही .काही औषध द्या."
 आईने  लगेच घरगुती औषध दिले. गंमत अशी की त्या काकू सारख्या ब-याच जणी नेहमी आजी कडे येत .  तीऔषध देई .
हे पाहून लहान निखील तिचा नातू म्हणाला.
, "आई तू आधी डाॕक्टर आहेस का?"
सारे कसे तुझ्या कडे औषध घ्यायला येतात व बरे पण होतात. 
तर आई उत्तरली, " नाही बेटा. हे माझे, तुझ्या  पणजी पासून चे चालत आलेले अनुभवाचे बोल .अनुभवाची औषध  आहेत..तुझे बाबा... काका ..आत्या यांना पण त्यांच्या आजीने हेच डोस देऊन ठणठणीत केले .तेच मी आठवणीत ठेवून यांना अनुभवाचे बोल ..डोस देते. आहे ना अनुभवी डाॕक्टर.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
100 शब्द

आई

उच्चारता आई
वात्सल्याचा झरा 
डोळ्यासमोर तो
दिसतोच खरा
                                            
 प्रेमाचा सागर
 असेच केवळ 
 मायेचाआगर
आई ती प्रेमळ 

 कुटुंब जनांचा
 करिते विचार 
कष्ट साहुनिया 
जीवनी अपार


देतसे संस्कार  
टाकण्या पाऊल  
सुखी जीवनाची
घेतसे चाहूल 

होई जीव कष्टी
आई शब्द मुखी
जरी तो संपन्न 
आई विण दु:खी


घडविण्या घडा
मातीला आकार
घडविते  आई
खरी शिल्पकार 
  
 

 वर्णावी   सदाची
  आईची महती
  कमी माझी मती
  महान जगती    

.......,..वैशाली वर्तक
अहमदाबाद






"विषय -- आई माझा शिक्षक *
आई आद्य गुरु* 
 जीवनात जन्मता आई 
प्रत्येकाचा पहिला गुरु 
बोट धरुनी जग दावीते 
गुरु पदाची सुरुवात सुरु 

 धरुनी तिने माझे बोट 
 शिकविले टाकण्या पाऊल
 तिच्या शिकवणीने मला 
मिळाली जीवनी यशाची चाहुल 

 जरी पडता, येता निराशा
 दिली भरारी करण्या कर्तृत्व 
 जीवनी माझ्या महत्त्वाचे 
  आहे  तिच्या योगदानाचे प्रभुत्व 

 दिले आईने धडे संस्काराचे
 महत्त्वाची तिची ठेव 
लावली जीवनी शिस्तता 
मला सदा भासते ती देव

 होता चुका मायबाप 
घेतात पदरात पाडसाला 
कधी रागावून समजावून 
घडवीले आपुल्या बालकाला 

 कितीही मोठे झालो तरी 
आईला वाटे लहान 
अनुभवाचे बोल आईचे 
जीवनी असती महान 


 वैशाली वर्तक अहमदाबाद "



अ भा ठाणे जिल्हा समूह १
 आयोजित 
उपक्रम
बालगीत
     *आई माझी च फक्त*

माझी आई  फक्त माझी 
आवडे मजला ती भारी
एकच आहे जगी अशी
आई माझी  मला प्यारी

येता जाता करते लाड
घेते मजला कुशीत
कुरवाळून प्रेमे उठविते 
तेव्हाच मी येते खुशीत

फिरायला नेते  बागेत मज
घेते नवीन  नवीन खेळणी  
करता हट्ट   रागावते मला
तरी  मज   भासे तीच देखणी

सांगते गोष्टी झोपताना
गाते गोड गोड गाणी
नीजताना हवी तीचम्
ऐकत रहावी तिची वाणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

आई

अ भा म भा प  समूह 2
आयोजित उपक्रम 
विषय -जिव्हाळा
        *प्रेमभाव*
आई देते जन्म बाळा
स्वतः कडे  करून दुर्लक्षित 
 मनी एकच विचार
कसा राहिल  तो सुरक्षित

जरा होता  दुखापत
उद्गार निघे मुखातून
*तूच माझे काळीज
अश्रू  निघे डोळ्यातून

 बालक होता जरी मोठा 
जीव  जडे  काळजात
काळजाचा माझ्या  तुकडा
म्हणत प्रेम करे अतोनात

माता असे प्रेमाचा सागर
सदा मनी असे *जिव्हाळा*
प्रेम देई  घागर भरुनी
 हृदयी भरला उमाळा

आई असो कोणाचीही
मग असो पशु प्राण्यांची
तूच माझे काळीज
हीच भावना सर्वांची

ऋतू असती तीन
उन्हाळा पावसाळा हिवाळा
पण आईच्या प्रेमाला 
असे  सदैव जिव्हाळा 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काव्य प्रकार अष्टाक्षरी 
शीर्षक- **तव महिमा**

उच्चारता शब्द आई
फुटे मायेचा पाझर
भरलेला सदा साठी
दया कृपेचा सागर


धरुनीया तीचे बोट
टाकी  पाऊल  जगती 
तिच्या संस्कार पुंजीने
आज साधली प्रगती


होता जीव कष्टी कदा
आई शब्द येई ओठी मुखी
स्वामी तिन्हीही जगाचा
 नाही आई  नाही सुखी


जसे घडविण्या घडा
देती मातीला आकार
करी संस्कारी बाळांना
घेउनीया कष्ट फार

किती वर्णू आई गुण
तव मायेची ती गाथा
तुझी थोरवी महान
नमवितो माझा माथा

वैशाली वर्तक
अहमदाबाद


कथा जिद्द

शब्दसेतू साहित्य  मंच  
कथा
जिद्द 
 "मला इतक्यात लग्न नाही करायच .मला पण ssc व्हायचय." पण कोण ऐकणार. ? आई  व तिच्या दोन बहिणी  मामांकडे 
रहात होत्या. व स्वतःच्या  गावात शिक्षिणाची सोय नव्हती. 
मामाकडे रहाणे गरजे होते. 
    कधी या मामा कडे तर कधी दुस- या मामाकडे. 
एक मामा त्याकाळी जमखींडी संस्थानात  नोकरीस होता. त्यामुळे आर्थिक  परिस्थिती  छान होती. दुसरे मामा ..पेशाने शिक्षक .. त्यांची मुले शिकत होती. त्यांच्या बरोबर रहात असल्याने आईला शिकण्यात गोडी झाली होती. 
    दुस-या दोन बहिणींना तेवढी शिक्षणाची आवड नव्हती.. कल पण नव्हता. पण तसे हिचे नव्हते. पण मामी मंडळींना पण 3/3 भाच्या घरात तसेच स्वतःची पण 3/4 मुले त्या मुळे जशी स्थळे येता बहिणींची लग्ने उरकलीत. आणि स्वातंत्र्या पूर्वी चा काळ 
तेव्हा मुलींचे शिक्षण गौण मानले जायचे. वयाच्या 17/18 व्या वर्षी  लग्न होत. 
तसेच आई चे झाले .लग्न झाले ..सासरी आली. सासरी पण आर्थिक  परिस्थिती  बेताची ..मील गिरणीत वडिलांची नोकरी.
घरात आई बायको बहिण   व एकच कमविणारे. 
     पण काळाची गरज  तसेच आईची शिक्षण आवड जिद्द  बाबांना समजली .त्यांनी तिला शिक्षणाची सुरूवात  करण्यास त्यावेळी  व फा. म्हणजे व्हर्नीक्युलरा फायनल  परीक्षा  असे .तिला बसविले. आणि ती परीक्षा  देता शाळेतून त्या वेळी नोकरी  मिळत असे. ती परीक्षा  तिने यशस्वीपणे  पार केली. नुसती तिनेच नाही तर नणंदेस पण द्यायला लावली. ती म्हणायची", तू शीक बाई .माझे नाही झाले पण तू शीक .शिक्षण संसारात कामास येईल. स्वतःच्या  पायावर आपणास उभे रहाता आले पाहिजे. "
   एवढेच नव्हे आजु बाजुच्या समवयस्क  बायकांना पण ती सांगायची. शिक्षण  महत्त्व समजवायची. 
    तिने कुटुंबास हातभार लावण्यासाठी शिवण पण शिकली जेणे करुन चार पैसे कमवता येतील . व शिवण शिक्षका म्हणून पण शाळेत  नोकरी मिळेल .आणि तेच झाले. शिवण शिक्षिका म्हणून प्रायव्हेट शाळेत लागली. एकि बाजूस म्युनिसीपालटी शाळेत अर्ज करत होतीच. व तिच्या जिद्यीस यश आले. शाळेत  नोकरीस लागली. पण शिकवत असता  शालेय शिक्षणासाठी
पुण्यास दोन वर्षाचा कोर्स चालायचा. जेथे रहात होती ...त्या संसारच्या शहरात मराठी  माध्यम नसल्याने तिला पुण्यास जाणे भाग होते. व त्या कोर्सने नोकरीत पुढेप्रगतीची संधी मिळवण्याच्या कामाची होती. 
    शेवटी आई बाबांनी एकमते आईला पाठविण्याचे ठरविले. 
अर्थात आजुबाजुचे लोक म्हणत काय बाई आहे मुलांना सोडून शिकायला जात आहे. अहो बाहेरचे काय नातलग पण बाबांना म्हणाले की कशाला  पाठवतोय.पुढे  डोक्यावर चढेल. हो लोक
तर बोलणार च पण ते दोघे  विचाराने  खंबीर होते. ती पूण्यास जाऊन कोर्स पूर्ण  करुन आली.  
  पुढे मुले मोठी झाली.   मुलगा ssc झाला . तिची मनातील इच्छा  आजून बळकावली . तिने बाहेरून s s c चा फाॕर्म भरुन 
मुलाच्या सिलेबलचा वापर करुन ती s s c झाली. जिद्द  काय ती तिने दाखविली. पुढे  सिनियर पि टी सी होऊन म्युनिसीपालटी तील शाळेत प्रिन्सीपल  म्हणून नोकरी करत 
निवृत्त  झाली.  मी शिकणार ही मनीची जिद्द .
     तिने गरीब विद्यार्थ्यांना  शिकवून  विद्या  दान केले .जणु
शिक्षणाचा  वसाच घेतला होता.  
  आयुष्याच्या शेवटा पर्यंत  तीचे व पुस्तकाचे नाते अतुट 
होते.  जिद्द  म्हणजे काय आम्ही  तिच्यात पाहिली व तिच्या  कडून शिकलो. 
आज माझी जी लेखणी आहे ती ..तिचेच वरदान आहे. 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, २२ मार्च, २०२२

झाडे शोधी सावलीला\ निसर्गाची साद


साहित्य सेवा प्रज्ञा मंच साहित्य  आयोजित 
22/3/22
अष्टाक्षरी काव्यलेखन  
*स्पर्धेसाठी*
विषय -   झाड शोधे सावलीला
    
     झाडे लावा

आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला     
 दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*       

प्रगतीच्या नावाखाली
नको करु वृक्षतोड
मानवाचा वाढे लोभ
वृक्षासवे नाते जोड

मुळे शोषती  जलाला  
 देती मेघ  नभाकडे
 बरसता जलधारा
  वृक्ष दिसे चोहीकडे

    
   वृक्ष  वल्लरी  हवीच
  पथिकाला देण्या छाया
   थकलेल्या जना  हवी
थंड सावलीची  माया
   
  होता नाशची वृक्षाचा
  कोण कोणा देई छाया
  *झाडे शोधी सावलीला*
    दिसे न प्रेमळ माया

वैशाली वर्तक 
अहमदाबाद








*स्पर्धेसाठी*
साकव्य स्पर्धा क्रमांक ४४
सौ प्रज्ञा मिरासदार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा 
वाढदिवसाच्या शुभेच्छा 
विषय.  ... निसर्गाची साद
काव्य प्रकार 
शीर्षक...झाड शोधे सावलीला


आली आता तीच स्थिती
नका तोडू वनश्रीला     
 दिसेनाशी झाली छाया
*झाडे शोधे सावलीला*       

फार प्रगत होताना
नको करु वृक्षतोड
ध्यानी घे पर्यावरण 
वृक्षासवे नाते जोड


मुळे शोषती  जलाला  
देती मेघ  नभाकडे
बरसता जलधारा
 वृक्ष दिसे चोहीकडे

  वृक्ष  वल्लरी  हवीच
  पथिकाला देण्या छाया
  थकलेल्या जना  हवी
  थंड सावलीची  माया

माझा नसे कदा कोप 
मानवाचा अती लोभ
प्रगतीच्या नावाखाली
थांबवना आता क्षोभ  .

  होता नाशची वृक्षाचा
  कोण? कोणा? देई छाया
  *झाडे शोधी सावलीला*
    दिसे न प्रेमळ माया
   
  
   वैशाली वर्तक 
   अहमदाबाद





दडपण

शब्दांकुर  साहित्य  मंच
आयोजित 
उपक्रम 
विषय -दडपण

     जीवनभराचे
जीवन भराचे रहाते  
होता सुरुवात बालपण
कधीच नाही संपत
असते सदैव दडपण

 बालपणी अभ्यासाचे
मोठे होता नोकरीचे
असे नित्य चालतसे
पुढे वाढते कुटुंबाचे

होतात कामे दडपणाने
काम नियमित करण्याची
शिकतो न घेण्या दडपण
सवयच लागते दडपणाची

भाव मनी असावे सकारात्मक
बाळगावा दृढ आत्मविश्वास
जाते दूर पळूनी दडपण
मग निवांतात घ्यावा श्वास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २१ मार्च, २०२२

स्वतःच्या फोटोवर काव्य

सावली प्रकाशन समूह  आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या  फोटोवर काव्य
    प्रसन्न व्यक्तीमत्व

आहे माझी साधी रहाणी
  पण व्यक्तीमत्व आकर्षक 
   रंग संगतीची आवड
रूप दिसते चित्त वेधक

रंग साडीचा केशरी
सोनेरी काठ  पदर
चेहरा असे सदा हसरा
हास्य  दावीती ते अधर

गळा शोभतो हार
उजळलेले दिसे रूप
कानी चमकी कर्ण फूले
मोहक भासे सौंदर्य  खूप 


मुखावर भाव हसरे
शांत निर्मळ व्यक्तीमत्व
   भासे  सोज्वळ सौंदर्य
 चार लोकात दावी प्रभुत्व 

 बांधेसुद  असे शरीर 
 सौंदर्यात करी भर
आनंदी समाधानी वृत्ती 
दिसुन येते खरोखर

वैशाली वर्तक 
अहमदाबाद









सावली प्रकाशन समूह  आयोजित 
उपक्रमासाठी
विषय - स्वतःच्या  फोटोवर काव्य रचना
           माझे व्यक्तीमत्व


उठूनी सकाळी लवकर 
उभारण्या मांगल्याची गुढी
घडवितेय दर्शन संस्कृती चे
चालविण्या  परंपरेची रुढी
 
नथ  नाकी, गळा तन्मणी
शोभे साधे रुप मनोहर
व्यक्तिमत्व खुलते मराठी
शोभून दिसतेय खरोखर 

 महाराष्ट्रा बाहेर  राहूनी
केलय संस्कृती चे जतन
मराठ मोळी नारी मी
भाषेसह वाचवितेय , मराठीपण

घेऊनी संगत नातवाला
देते सहज ज्ञान सणवाराचे
पहा कशी रुबाबात ऊभी
दर्शन घडते गुढी पाडव्याचे

वृषभ रास असता माझी 
सदा  आनंद मुखावरी
साधे पण टापटीप रहाणे
आहे भाग्यवान मी खरी



सावली प्रकाशन समूह आयोजित उपक्रमासाठी विषय - स्वतःच्या फोटोवर काव्य रचना माझे व्यक्तीमत्व 
 उठूनी सकाळी लवकर
 उभारण्या मांगल्याची गुढी 
घडवितेय दर्शन संस्कृती
 चालविण्या परंपरेची रुढी
नथ नाकी, गळा तन्मणी
 शोभे साधे रुप मनोहर 
व्यक्तिमत्व खुलते मराठी 
शोभून दिसतेय खरोखर 

 महाराष्ट्रा बाहेर राहूनी
 केलय संस्कृती चे जतन 
मराठ मोळी नारी मी
 भाषेसह वाचवितेय , मराठीपण

 घेऊनी संगत नातवाला
 देते सहज ज्ञान सणवाराचे
 पहा कशी रुबाबात 
ऊभी दर्शन घडते गुढी पाडव्याचे 

 वृषभ रास असता माझी 
 सदा आनंद मुखावरी 
साधे पण टापटीप रहाणे आहे 
भाग्यवान मी खरी 
 वैशाली वर्तक

रविवार, २० मार्च, २०२२

सण रंगाचा होळीचा/ सहाक्षरी होळी/आला सण शिमग्याचा / पंचाक्षरी

अभामसाप कोप्र महाड समूह
उपक्रम १५८
विषय - *रंगून जाऊ रंगात*

आला   हो सण रंगाचा
*रंगून जाऊ रंगात*
फुलली विविध फुले
आनंद  होतो मनात

 सण हा येता रंगाचा
  रंगोत्सव   खेळे सृष्टी 
 विसरून सारे जाती भेद
समतेची ठेवुया दृष्टी 

करुया संवर्धन  वनश्रीचे
लोभ मत्सराचे करु दहन
नको तोडणे जाळणे वृक्षाचे
करु पर्यावरण जतन

येता  ऋतुंचा राजा
 वसंत फुलला मनोमनी
ऐका कोकीळ कुजन
मोहर दिसे वनोवनी

पळस बहावांचे सुंदर
  रंग आकर्षती मनाला
रंगून जाऊ रंगात
नको  निराशा  जीवाला

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
विषय - होळी
   
*पर्यावरण जागृती*


फाल्गुन मासात
येतो सण होळी
चला खाउ सारे
पुरणाची पोळी

पहा बहरला
गंधित  मोगरा
 बहावा  पळस
 शोभतो  हासरा


करु संवर्धन 
नकोची दहन
वृक्षाचे रोपण
वनश्री जतन

जाळून टाकूया
मत्सर द्वेषाला
विलसे आनंद
सदैव  मनाला

 सण तो रंगाचा
  रंग उधळण
 सारू भेदभाव 
स्मरु आठवण

सप्तरंगी फुले 
 निसर्ग तो सारा
 पळस बहवा 
उधळीत  न्यारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद











अ भा म सा पण समूह २
आयोजित उपक्रम६३६
विषय.. आला शिमग्याचा सण


आला सण शिमग्याचा
करू आनंदात साजरा
रंगून जाऊ या रंगात
निसर्ग पहा किती हासरा

 झाली वृक्षांची पानगळ
 पसरला पाला पाचोळा 
 फांद्या सा-या सुकलेल्या
 पसारा तयाचा करा गोळा.

स्वच्छ होईल परिसर
सुंदर राखण्या पर्यावरण
दहन करा पसारा होळीत
करू  नवे वृक्षारोपण

वाईट विचारांचे दहन
समतेची ठेवू दृष्टी
नाना रंगात फुलूनी
पहा रंगोत्सव खेळे सृष्टी

 जाऊ होलिका दर्शना
 अर्पूया  गोड पुरणपोळी
दुष्ट प्रवृत्तींना जाळूया
मी तू पणाची करू होळी

वैशाली वर्तक
 अहमदाबाद


काव्य निनाद साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक २६४
विषय.. होळी पौर्णिमा
शीर्षक. ..सण रंगाचा
पंचाक्षरी 


फाल्गुन मासी
सण तो होळी
चला खाऊया
पुरण पोळी

 बहरलेला
 पहा  मोगरा
 अन  पळस
 शोभे हासरा

वृक्ष वर्धन
नको दहन
वृक्षारोपण 
वन जतन

जाळून टाकू
हेवे दाव्याला
 मिळे आनंद
सदा मनाला

 आज रंगाचा. 
आला तो सण
 मनेआनंदी
 झालेत जन
  

 फुले फुलली 
 निसर्ग  सारा
 पीत बहवा
फुलला  न्यारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...