रविवार, २१ डिसेंबर, २०२५

मोहपाश


लालित्य नक्षत्रवेल
आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी

विषय -  पाप मोहाचे सुटेना


मन असते चंचल
काम आहेची कठीण
क्षणा क्षणाला धावते
मनी विचार  नवीन

सहा पहा षडरिपू
 संस्काराची मनी  ठेव. 
 तरी  ग्रासताती मना
  भूल पाडी एकमेव

मन कसे आवरावे
मना कधी उमजेना
मन चंचल पाखरु
  मोह पाशाचे सुटेना

माझे माझे सुटेचना  
भव ताप होतो फार  
जीव अडके मोहात
होती  यातना अपार  

पाश मोहाचे सोडण्या
हवी अध्यात्माची जोड
संत वाणी ऐकू  सदा
जीवनाचा अंत गोड

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्वप्न नव भारताचे

स्वप्न नव भारताचे      काल पाहिले सुंदर स्वप्न   मन माझे  आनंदले केले वंदन देवाला  अन् काव्यातून रेखाटले.           स्वप्नी होता  सुंदर स्वच...