गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

मी तिरंगा बोलतोय/ गीत तिरंगा


                मी तिरंगा बोलतोय                        28/1/2019
यावर्षी आमच्या सोसायटीच्या ध्वज वंदनासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते. सोसायटी ची सेक्रेटरी नात्याने मी राष्ट्रध्वज नीट स्वच्छ आहे का नाही ? व्यवस्थित इस्त्री आहे की नाही ? या सर्व गोष्टींची जातीने तपासणी केली.तसेच त्याची दोरी नीट आहेना वगैरे गोष्टी ची काळजी पूर्वक पहाणी करून खात्री करून घेतली. तसेच ध्वज वंदनाची जागा स्वच्छ आहे ना , याची पण खबरदारी घेउन मगच रात्री झोपण्यास गेले. आज दिवसा , चार रस्त्यावर बरीच लहान मुले पैसे कमविण्यासाठी तिरंगे विकत होती . बरेच जण त्यांना मदत, या हेतूने पण तिरंगा विकत घेत होते. दिवस भरात ध्वजाची केलेली तयारी व रस्त्यावर ध्वज विकणारी बालके माझ्या डोळ्यासमोर आलीत व त्याच विचार तंद्रीत मी झोपी गेले . म्हणतात ना मनीं वसे ते स्वन्पनी दिसे . मला नीट घडी केलेला, ध्वज स्वन्पनात आला. व सांगू लागला . व माझ्याशी बोलू लागला .," वा छान हं .! माझी छान काळजी घेतलीस. आता सकाळी राष्ट्र प्रेम जागृती ने सकाळी वेळेत ध्वज वंदन तुम्ही सारे कराल. प्रेमाने तयात फूले ,फूलांच्या पाकळ्या ठेवून मला मानाने वर चढवाल व मला हवेत फडकवाल .एक साथ सलामी द्याल व नंतर शिस्तबद्ध राष्ट्र गीत म्हणून एका सुरात "जयहिंद " चा जयघोष करून मला वंदन, सलामी द्याल .खर सांगू मला पण नभात फडकतांना खूप अभिमान , आनंद वाटतो. संध्याकाळी सूर्यास्ताला मला मानाने राष्ट्र प्रेमाने उतरवितात छान वाटते. पण या सा-या बरोबर मला काही विचार आले ते सांगतो. रस्त्यावर विकले जाणारे झेंडे 2/3 दिवसांनी रस्त्याच्या कडेला , इव्हन घरात मुलांकडून कच-यात पडलेले दिसतात .तसे होऊ देवू नका. एक तर plastic चे वा कागदाचे ध्वज बनवू नका. त्यास पायदळी येणार नाही याची काळजी घ्या. मी पायदळी येणे यात आपल्या देशाचा अपमान आहे. तसेच ध्वज वंदनाचे काही नियम आहेत. त्याचे पालन करा. केव्हा ,कुठे -कुठे रोजच फडकवायचा याचे ही नियम आहेत ते जाणून घ्या. तसेच ध्वजात जे तीन रंग आहेत ते प्रत्येक रंग काय दर्शवितात .ते सर्वांना माहित च आहे . वरचा रंग केसरी / भगवा .हा रंग त्यागाचा. पण खंत वाटते सध्या त्याग राहिला बाजुला .जो तो आपल्या पोळीवर तूप कसे पडेल यातच मशगूल आहे. जरा विचार करा. कुठे गेले ते शहीद लोक .? ज्यांच्यात देशासाठी त्यागाची भावना होती. ज्यांनी प्राणांचे बलिदान करुन स्वातंत्र्य प्राप्ती साठी स्वतःच्या घरादाराची रांगोळी करून प्राण अर्पीले ..प्राण वेचले. आज त्या त्यागाची भावना दिसत च नाही. नुसते आपला स्वार्थ पहात आहेत. ज्यांनी बलिदान केले त्या व्यक्तींना आठवा. त्यांचा त्याग मनीं स्मरा. देशासाठी माझ्या तील केसरी रंगाचे स्मरण करा व तो काय सांगतो दर्शवितो याचा विचार करा. दुसरा रंग पांढरा / सफेद . शांतीचा. जो शांतिचे प्रतिक दाखवितो. पण सध्या तर जो तो उठतो दंगे , जातिवरून दंगे. आपण सारे पाढरा रंग शांतीचे प्रतिक विसरलाच आहात .सरकार विरूद्ध दंगे करुन, जाळपोळ करणे .सरकारी मालमत्तेचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान हे न समजता दंगे आतंकवाद वाढतच आहेत. तिसारा रंग हिरवा ..हिरवा रंग समृद्धी चा. भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्याची समृध्दी जतन करणे आपले कर्तव्य आहे. भारतात ६ऋतु दिसतात पण निसर्ग पण कधी कधी कोपतो. सध्या निसर्गाचा कोप वाढत चालला आहे. कारण विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानव निसर्गाच्या विरूद्ध जात आहे. जंगले उद्ध्वस्त करून वनश्रीचा नाश करुन, सिमेंट ची जंगले तयार करीत आहे .झाडे मातीतून पाणी शोषून पानांच्या द्वारे बाष्प रुपाने ढगात रुपांतर करतात. जे ढग पाऊस पाडण्यास मदत रुप होतात .पण झाडे कापल्याने ही क्रिया मंदावत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिधडत आहे. व कमी पावसाने पाण्याची कमतरता भासतेय व हिरवी डौलणारी शेते नीट पीक देत नाही व तेव्हा या "हिरव्या" समृद्धी च्या रंगाची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे. पाण्याचा पण दुरुपयोग टाळला पाहिजे. पर्यावरण ची खंत बाळगली पाहिजे. माझ्या वर मधोमध अशोकचक्र आहे.त्यास २४ दाते आहेत. ते चक्र दर्शवते अविरत काम करा . पण सध्यातर जरा महागाई वाढली वा सवलत हवी असेल तर व सरकारने मान्य केली नाही. की, लगेच "संप" पुकारला जात आहे ."बंद"ची घोषणा ,ऐलान देऊन प्रोडकशन मधे व्यत्यय आणणे, सहजतेने अनुसरले जाते . देशाच्या उत्पादनाची जवाबदारी लक्षातच घेत नाहीत तेव्हा नुसते १५ आॕगस्ट व २६ जानेवारीला मला उत्सहाने लहरविण्यात फडकविण्यात आनंद न मानता .माझ्या या सर्व तीन रंगाचा विचार करा. या ध्वजाची मान, शान ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नुसत्या प्रतिज्ञांचे वाचन न करता त्या आंमलात पण आणा. " तेवढ्यात गजर झाला .मी लगबगीने उठले .जागी झाले .मला कळलेच नाही .स्वन्पातून जागे झाले. खरच स्वप्नात तिरंगा केवढे सांगून गेला. मी पण त्याच्या बोलण्याने भारावून गेले.! ..........वैशाली वर्तक ( अहमदाबाद)



सावली प्रकाशन समूह 

गीत तिरंगा

विषय -- तिरंगा



...तिरंगा


पहा   फडकतो तिरंगा नील गगनी 

 वाटे अभिमान तो मजला क्षणो क्षणी 

        

  तीन रंगात पहा ,भाव दावितो शुध्द

  हिरवा दावी देश ,आहे सदा समृध्द

  भगव्यात त्यागाची, भावना सांगे मनी

 वाटे अभिमान तो, मजला  क्षणोक्षणी      1


पाहून तिरंग्यास ,उर  येतो भरुनी

क्रांती वीर लढले, तया कवटाळूनी

हुत्म्यास पांघरता  , दुःख दाटते मनी

वाटेअभिमान तो, मजला  क्षणोक्षणी           2


शान तिरंग्याची ती , मोद देई मनाला

श्वेत रंग संदेश  , शांतीचा जगाला

कार्यरत रहाण्या, सांगे  तो चक्रातूनी

वाटे अभिमान तो , मजला क्षणो क्षणी           3


सदा राखूया मान, आपुल्या तिरंग्याचा 

नाही होऊ देणार अवमान कधी त्याचा

राहिल फडकत ,अखंडित गगनी

वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी             4


वैशाली वर्तक






मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

शेतकरी राजा

काव्यांजली   स्पर्धेसाठी
- शेतकरी राजा                                         5/2/2019

   बळीराजा माझा
पडता  मृगाचे  पाणी
   बीजांकुर पाहूनी
       आनंदितो.

  अन्नदाता म्हणोनि
नमन  करितो  तुजला
     पोषितो मजला
        तवकृपे

         मातीचा मित्र
  रमतो  काळ्या  मातीत
       पिकवण्या शेत
           जनासाठी.

          शेतकरी राजा
  तुजला  पोशिंद्याचा  मान
        देशाची   शान
          राखतोसी

         करुनी काबाडकष्ट
    काळ्या  मातीला   सजवितो
           मोती पिकवितो
                 शिवारी

         सदा कर्जदार
   आणितो बीज बियाण
         लागते  ग्रहण
            सुगीदिनी

         वैशाली वर्तक
        
          
   

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

मन तुझ्यात गुंतले

विषय- मन तुझ्यात गुंतले            2/2/2019

सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली  तिने  लाडिक बट   
भावली तिची अदा क्षणात

लागले   जीवास वेड     
सतत तिजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे 

योगायोगे आली सामोरी
भेट घडली अवचित
निरुत्तर उभी ठाकली
न उमजे बोलणे कदाचित

साधिला मुक संवाद
नजर  कटाक्षांनी क्षणिक     
 कळले  न ,  माझेच मला
कधी?कसा? झालो भावनिक

होता देवाण - घेवाण
शब्दांची अमुच्यात चार
ठरले भेटण्याचे ठिकाण
मन झाले आगतिक फार

सहज घडलेली भेट                         
अजुनी ही स्मरते  मनीं   
 "मन तुझ्यात गुंतले   "                         
कळले मज त्याच क्षणी .


          वैशाली वर्तक (अहमदाबाद )
तिच कविता थोडे बदल करुन
यारिया साहित्य  समुह

**भेट तुझी माझी**


सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली    लाडिक बट 
भावली तुझी अदा क्षणात

लागले   जीवास वेड   
सतत तुजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे

योगायोगे आलीस सामोरी
भेट घडली अवचित
निरुत्तर  तू उभी ठाकली
न उमजे बोलणे कदाचित

साधिला मुक संवाद
नजर  कटाक्षांनी क्षणिक   
 कळले  न ,  माझेच मला
कधी?कसे? झालो भावनिक

होता देवाण - घेवाण
शब्दांची अपुल्यात चार
ठरले भेटण्याचे ठिकाण
मन झाले आगतिक फार

भेट तुझी अन् माझी                 
अजुनी ही स्मरते  मनीं 
मन  आपुले  गुंतले                         
कळले दोघां त्याच क्षणी .

          वैशाली वर्तक (अहमदाबाद )


कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...