शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

कृष्णलीला व त्याची नवीन नांवे

श्रीकृष्णाच्या लीला
व त्याची नवीन नांवे

सोड वाट
"नंदलाला"
जाऊ दे ना
बाजाराला.

सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी

"बंसीधर"
वृंदावनी
  वेणु वाजे
रानी वनी

नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा

यशोदेचा
"घननीळा"
वाटे तिला
लडिवाळा

वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा

खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी

"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.

रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात  दंग

विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"

वैशाली वर्तक

सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

तुम्हा वंदितो सैनिका

स्पर्धा क्र  39  शब्द अंतरीचे
स्पर्धे साठी ओळ काव्य
      विषय  -- तुम्हा वंदितो सैनिका
अती वृष्टी होता पावसाची
जमले पाणीच पाणी सारीकडे
पुरग्रस्तांचे जीव वाचविण्या
धाव घेतली लगेच सैनिका कडे

होता कुठे दंगाग्रस्त जीवन
येतात  मदतीस सैनिक तत्पर
सहूनी कष्ट ,शांत परिस्थिती राखण्या
हाक देता तुम्ही च  येता  सत्वर

येता कुठली नैसर्गिक  आपत्ती
मदतीला सर्वा आधी तुम्ही हो सैनिक
सहज   उदार  होता स्व-जीवावर
मदत  तुमची मागणे  , झाले दैनिक.

किती गावे  तव  कर्तृत्वाचे गोडवे
सर्व जाणिती तुमच्या त्यागाचे  मोल
तुजला मानाचा सलाम सैनिका
जीणे तुमचे राष्ट्रासाठी अनमोल

सीमेवर सदैव  देश रक्षणात दक्ष
बलिदान करुनी ,अमुचे  प्राण रक्षिता
  शतदा "तुम्हा वंदितो सैनिका"
तुमच्याच हाती आमुची  सुरक्षितता

वैशाली वर्तक 
वैशाली वर्तक


चारोळी श्रावण

स्पर्धेसाठी चारोळी
विषय --श्रावण

श्रावण सरी वर सरी बरसता
धरेचा अवघा झाला एकची रंग
खेळ रवीचा चाले ऊन पावसाचा
पहाण्यात मन आनंदाने  झाले दंग
वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...