शुक्रवार, ३० मार्च, २०१८
कृतार्थ
कृतार्थ
22/11/2017
देवाच्या कृपेने बनली अवनी
जी देते आपणास अन्न -वस्त्र -पाणी
तियेचेच आपण सदा कृतकृत्य
वंदन करोनी स्मरतो तुजला नित्य ll
जन्मतो, वाढतो आम्ही तव कुशीत
प्रेमाने भरवितेस, तू आम्हांस घास
तुझ्या कवेत ,सदा मिळे निवांत
वंदन करोनी स्मरतो तुजला नित्य
मिळे आम्हा जीवन तुझ्याच कृपेन्
तव हृदयी भरली ,खनीजे विविध
साहूनी घाव, तुझाच वरद हस्त
वंदन करोनी स्मरतो तुजला नित्य ll
असशी तू सा-या जगाचाच मित्र
जगत् जीव सृष्टी तुझ्यानेच सत्य
तुझ्या विण असे ,धरेला तिमीर
वंदन करोनी स्मरतो तुजला नित्य ll
पंचतत्वातीलवायु ,असे एक तत्व
जरी अस्तित्वात तू ,नसssशी दृश्य
तुझ्यावीण जीणे, जल-चरांचे अशक्य
वंदन करोनी स्मरतो तुजला नित्य ll
भूमीआपतेजवायु , निर्मीलेस तूच
चंद्र-सूर्य-ता-यांचे दिधले , आकाश
तुझ्या कृपा - दानाचे आंदण आम्हांस
वंदन करोनी स्मरतो तुजाला नित्य ll
कृतार्थ भावे स्मरतो तुजला नित्य ll
वैशाली वर्तक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मृदगंध
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
-
उषाताई. आठवणी येतात अलवार मृदु शब्द कानी दाटलेली मनी सख्यांची आस हं, बोल उषाताई काय म्हणतेस? उगाच होतात असे अजूनही भास. कारण आहेच त...
-
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प आयोजित दोन दिवसीय उपक्रम 9/2/26 (1) विषय ...पहिली वही पादाकुलक वृतांत सहज काढला ,आवरायला निवांतात खण ,फ...
-
मोहरली लेखणी साहित्य समूह आनंद कंद वृत्तात 1 विषय दु:ख सुखदुःख येत राही, दिन आठवा सुखाचे. नाही जगात कोणी,ज्याला न दिन पिडेचे संतोषिला मनान...
