गुरुवार, २७ मे, २०२१

तिमीराकडून तेजाकडे (येईल रम्य पहाट)

अ भा म सा प समूह 02
विषय --तिमिराकडून तेजाकडे
      *येईल रम्य पहाट*

झालय खरच जीवन आता
मानवाचे अंधाराने भयभीत
आशा संपत चालली मनात
अंतची आला का पुढे कदाचित  ?

जरा नीट बसता घडी
नवनवी जगी  येते महामारी
बंद करुनी बसती घरोघरी 
कसे कमवावे हा प्रश्न भारी

कसे चालणार जग सारे
नाही उद्योग वा   व्यवसाय
प्रगती थांबली देशाची
नाही पगार तर खाणार काय

दावी निसर्ग  रुप विक्राळ
 येती अवचित वादळ खास
झाले नुकसान  घरदारांचे
 जणु दुष्काळात अधिक मास

पण नाही हरणार हिंमत
दाखवू एकात्मतेचे बळ
करण्या पाडाव आपत्ती चा
देऊ एकमेकास पाठबळ.
 
नव चैतन्याची फूलवू पालवी
दूर करु निराशेची काजळी
ठेवू दृढ विश्वास देवावरी
खचित देईल कृपेच्या ओंजळी

येईल पहा उद्याची सकाळ
सकारात्मकाचे वहातील वारे
तिमीर संपता येईल उषःकाल
 आनंदीमय होईल जग सारे.

वैशाली वर्तक
अहमदाबाद


 नक्षत्र वेल समूह आयोजित  स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी

विषय - महाराष्ट्राची गौरव गाथा 


शीर्षक - गाऊ तयाचे गुणगान

वर्ण- 16


माझा महाराष्ट्र देश , मजला जीव की प्राण

सर्व जगी भासे  मज तो सर्वाहूनी महान


आहे नटलेला सह्याद्रीच्या ,कडे कपारीत

राज्य हिंदवी स्थापिले , राजेंनी याच भुमीत

संत, वीरांची, कला साहित्याची, असे ती खाण

माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण              1


इंदायणी गोदा, कृष्णा भीमा, असती सरिता

भक्ती रसप्रदाची जिथे वाहे सदा कविता

वारकरी मन , येथेची विसरे देहभान

माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण               2


स्वप्न मनीचे साकारण्या, जन येथेची येती

मिळवुन नाव , पैसा , नशीब ही घडविती

छाया माया प्रेम देण्यात, तया सारे समान

माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण            3


माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण

सर्व जगी भासे  मज तो सर्वाहूनी महान


वैशाली वर्तक.....

अहमदाबाद










बुधवार, २६ मे, २०२१

गीत कल्पनेच्या झुल्यावर

आवडे मज झुलणे कल्पनेच्या झुल्यावरी
काय सांगू  विचारांनी मन  हिंदोळते तरी


वाटे मौज  मनी सदा जाता उंच नभाकडे    
माझ्या मनी बांधियले मनोरथ किती गडे   
 पूर्ण होण्याचा आनंद येत आहे पहा तरी
काय सांगू  विचारांनी मन हिंदोळते तरी


वर झोका जाता वाटे लावूया हात ता-याला
कल्पनेचा झोका माझा दावी उंच गगनाला
येता खाली निहाळती नजर जाई शिखरी
काय सांगू विचारांनी मन हिंदोळते  तरी



कल्पनेचा झुला नेतो आठवात माहेराच्या
सय करीतो ते दिन  रम्य  त्या बालपणाच्या
रमते  माझे मी पहा तासन् तास   किती तरी    
काय सांगू विचारांनी  मन हिंदोळते तरी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

मंगळवार, २५ मे, २०२१

*सुकाळाचे दिन

कला साहित्य समूह
उपक्रमासाठी
चित्र  काव्य 
     
     *सुकाळाचे दिन*
 चित्र पाहुनिया पहा
मन कसे आनंदले
समृद्धीने मन डोले
गाव सारे संतोषले

होता कृपा वरुणाची
कष्ट फळासी आले
जन मन उत्साहात
पहा भरुन पावले

गाड्या घावती बाजारी
शिवारात दिसे मोती
दारी धान्याच्याच राशी
भरुनिया   पोती पोती

 
टिपण्यास धान्य दाणे
झाली चंगळ पाखरांची
पिल्ले येती कोंबड्यांची 
घाई त्यांना टिपण्याची


धान्य  पडे उखणात
नारी सा-या व्यस्त कामी
प्रातःकाळी उठुनिया
नसे कोणीही निकामी

दूरवर   दिसे   शेते
पीत  हरित  रंगात 
देई आनंद दृष्टीस
कृपा राहू दे देशात


चित्रासम सारे गाव 
देवा बहरु दे सदा
 सदा रहाता सुकाळ
दुष्काळची नको कदा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




सोमवार, २४ मे, २०२१

जीवन एक संधर्ष

 - जीवन एक संघर्ष


कोणास  वाटे जीवन तर,
  असे तीन अंकांचा खेळ .
कसे जगावे त्यात आनंदाने
तयाचा जमवावा लागे मेळ.

येई  कधी दुःखाला भरती,
तर कधी आनंदाची लाट.
नसे निरंतर  सदा तिमीरच,
तिमीरा नंतर प्रकाश वाट.

निसर्ग पण सहतो संघर्ष
चंद्र सूर्यास पण लागते  ग्रहण
सरिता आक्रमिते विकट वाट
अवनी करे सतत भ्रमण.

यश मिळविण्या कष्ट अपार
जन्माला येताच ,सुरु संघर्ष
स्वप्न पूर्ती , करण्या साकार
महेनतच करी जीवनी उत्कर्ष

दगडला पण,  मिळवण्या देवत्व
 सहतो , टाकीच्या घावांचा  संघर्ष
जीवन तर , आहेच  संग्राम
ध्यानी ठेवा हाच एक,  निष्कर्ष .

पहा आपले पंतप्रधानजी
लढले झेलीत अनेक संघर्ष
प्रेरणा देती  सर्व  जगाला
कसे जगावे, निष्काम सहर्ष.


वैशाली वर्तक ( अहमदाबाद )

रविवार, २३ मे, २०२१

घंटानाद सिंगापूर शब्दगंध






घंटानाद                            23/5/21
नाही ऐकला घंटानाद
 शाळेतील  घंटेचा 
 किती दिवस जाहलेत
कानी पडून नाद विठुच्या आरतीचा


येऊ शकत नाही भक्त गण
 मंदीरी राऊळी देव दर्शनास
 कशी देतील  जाग घंटेने 
प्रवेशताना   परमेश्वरास


 मंदीरात  जशी शांतता
तीच शांतता शारदेच्या मंदीरी
नाही मुलांची शिक्षकांची वर्दळ
सारे आपापल्या घरोघरी


कोणासाठी करणार शिपाई
घंटानाद  नसता हसरी मुले
मंदिरात देखिल तेच  दिसे
 निस्तेज ती वाहीलेली फुले


असता टाळेबंदी शिपाई 
प्रेमाने कुरवाळी घंटेला
 करीत खेद , विचारी मनी
कधी  ऐकीन घंटानादाला

तीच स्थिती नगर जनांची
ऐकू येत नाही सकाळी
दूर वरची तान भजनाची वा
कधी ऐकणार सुरेल भुपाळी

वैशाली वर्तक

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...