साहित्य
साहित्याच्या विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
भाव अंतरीचे मना - मनातले
सहज उमटती लिखाणा ' ते
साहित्याच्या दोन धारा
गद्य अन पद्य अमाप पसारा
नाटक ,कादंबरी ,लघुकथा
कविता, वा विनोदी वात्रटिका
तयात भर करिती व्यंगचित्रे
साहित्याचे च दर्शन घडते .
कोणी रचिती काव्यखंडे
तर रेखाटती आत्म चरित्रे
विविध वाङमय येती सामोरे
योजित करिता साहित्य संमेलने
मासिक , पाक्षिक , दैनंदिने
असती सर्वची ज्ञाना-र्जने.
ं
प्राकृत भाषेतील मायबोली
सुधा-रसापरि अभंग वाणी
ओतप्रत भक्ति -रसांची
सदा विराजमान ओठावरती .
दास रामाचे मनाचे श्लोक
सोप्या भाषेत गीतेचाच बोध
संस्काराची होतसे पूर्तता
साहित्याला लाभे समृघ्दता .
छंद , वृत्त , कोट्या ,समास
शृंगाराचा चढवी साज
वीर , करूणा , भय अन हास्य
असते सुंदर ललित वाङमय
असे नवरसांचे संपन्न साहित्य
भाषेला करिते सदा समृध्द
साहित्याच्या असती विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
वैशाली वर्तक
साहित्याच्या विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
भाव अंतरीचे मना - मनातले
सहज उमटती लिखाणा ' ते
साहित्याच्या दोन धारा
गद्य अन पद्य अमाप पसारा
नाटक ,कादंबरी ,लघुकथा
कविता, वा विनोदी वात्रटिका
तयात भर करिती व्यंगचित्रे
साहित्याचे च दर्शन घडते .
कोणी रचिती काव्यखंडे
तर रेखाटती आत्म चरित्रे
विविध वाङमय येती सामोरे
योजित करिता साहित्य संमेलने
मासिक , पाक्षिक , दैनंदिने
असती सर्वची ज्ञाना-र्जने.
ं
प्राकृत भाषेतील मायबोली
सुधा-रसापरि अभंग वाणी
ओतप्रत भक्ति -रसांची
सदा विराजमान ओठावरती .
दास रामाचे मनाचे श्लोक
सोप्या भाषेत गीतेचाच बोध
संस्काराची होतसे पूर्तता
साहित्याला लाभे समृघ्दता .
छंद , वृत्त , कोट्या ,समास
शृंगाराचा चढवी साज
वीर , करूणा , भय अन हास्य
असते सुंदर ललित वाङमय
असे नवरसांचे संपन्न साहित्य
भाषेला करिते सदा समृध्द
साहित्याच्या असती विविध त-हा
साज चढविती त्या भाषेला
वैशाली वर्तक
साहित्याची गोडी
वाचन आवड ।
करीते मनन ।
देतसे स्फुरण ।
विचारास ।। 1
असता मनात ।
वाचनाची गोडी ।
लिखाणास जोडी ।
मिळतसे ।। 2
ओढ साहित्याची ।
मनी संकल्पना ।
मिळते कल्पना ।
लिखाणास ।। 3
किती पहा त-हा ।
मोठाच पसारा ।
गद्य पद्य धारा ।
साहित्याच्या ।। 4
मराठी साहित्य ।
आहेच सखोल ।
जाणा त्याचे मोल ।
वाचुनिया ।। 5
संताचे वाङमय ।
देते मना शांती ।
नुरतेच भ्रांती ।
जीवनाची ।। 6
विनोदी रहस्य ।
मार्मिक सात्विक ।
प्रतिभा प्रतिक ।
प्रकार ते ।। 7
म्हणूनच ऐका ।
साहित्याची गोडी।
मना मना जोडी ।
सांगे वैशू ।। 8
वैशाली वर्तक
साहित्याचे वारकरी
साहित्याची करु सेवा
करु नित्याने चिंतन
होउनिया वारकरी
सदा करावे लेखन
आहे मराठी साहित्य
करु तयाचे जतन
वृध्दी करण्या हवेच
सदा करावे वाचन
किती त-हा साहित्याच्या
गद्य पद्य अन् काव्य खंड
सदा वाढविण्या शान
करु वाचन अखंड
कथा कादंबरी नाट्य
वाङमयात संतवाणी
दिसे संमेलनात ते
जणु गंगेचे च पाणी
करी साहित्यिक सदा
होऊनिया नवोदित
होते भर लिखाणात
मन होते आनंदित
वैशाली वर्तक
साहित्य सेवक
सावली प्रकाशन समूह
विषय -- साहित्य सेवक
*सेवा शारदेची*
आहोत आपण । साहित्य सेवक ।
काम ते पावक । लिखाणाचे ।। 1
नित्य नेमे करु । शारदेची सेवा ।
मानू तोच मेवा । आनंदाने ।। 2
वाचना करिता । वाढे ज्ञान गंगा ।
मन राही चंगा । सदासाठी ।। 3
वाढवू लिखाण । करुया चिंतन ।
विचार मंथन । नित्यनेमे ।। 4
विविध प्रकार । असे साहित्याचे ।
जाणू वाङमयाचे । मनोभावे ।। 5
नाट्य कथा काव्य । असती प्रकार ।
करती विचार । सेवक तो ।। 6
साहित्य मेळावा । दावी प्रदर्शन ।
साहित्य दर्शन । साहित्याचे ।। 7
खरा तो सेवक । नेमाने लिखाण ।
देउनिया मान । शारदेला ।। 8
वैशाली वर्तक
।