शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

भ्रमर अभंग

कला साहित्य प्रेमी यात्री
साहित्य कला यात्री महाराष्ट्र राज्य स्तरीय
अभंग स्पर्धा
विषय -- भ्रमर             1/10/2019
भ्रमर
वेडा हा मिलींद । गुंजनात गुंग ।
सदा राही दंग । भ्रमरतो ।l 1
दिसता कमल । विसरतो भान।
सेवनात ध्यान । सदाचिया ll 2
झाली सांज वेळ । कमला समीप।
लागले ते दीप । चोहीकडे ll 3
मिटताच दल । होई बंदी भृंग।
राहिलाची दंग । सेवनात ll 4
खर पहाताच l नसे ते अशक्य. I
सहजची शक्य l छेदणे ते ll 5
छेद कमळास । परि न करितो l
प्रेमेची स्मरतो । पंकजास ll 6
जगतासी ज्ञान ! ! नकोच आसक्ती
मोहाची विरक्ती ! वदे वैशू ।l 7
वैशाली वर्तक 1/10/2019




हुरहूर ,गात्र,  तृप्त  ,रेशीम स्पर्श प्रीत

वाट पाही भृंग ! सदाची काहूर !
मनी हुरहूर ! मिलनाची

उमले कमल ! सदा राही दंग !
गुंजनात गुंग ! भ्रमर हा !!

तृप्त होई मन ! गात्र गात्र शांत !
रेशमी स्पर्शात ! भ्रमराचे !!

होता चांदरात ! विसरतो भान !
सेवनात ध्यान ! सदाचिया !!

खरे पहाताच ! नसे ते अशक्य !
सहजची शक्य ! छेदण्यास !!

न करिता छेद ! जाणितो तो प्रीत !
प्रीतीची ती रीत ! प्रेमीच तो !!

होता तृप्त ओठ ! मिलनाची आस ! 
संपवितो ध्यास ! तृप्त मने !!


वैशाली वर्तक 






सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

राधा मन

आठोळी काव्य
राधा मन
जळी स्थळी पहाते राधा
तीजसाठी हरि एकमात्र
कृष्णच सदा तीज साठी
तिजला तोचि दिसे सर्वत्र

मुरलीच्या नादाने राधा
होई ती सदा बावरी
वेड लावी तीज जीवा
देवकीचा तो मुरारी

झाली बाधा राधेला हरिची
हरि नाम बोलती कंकण
करि तयाचेच मनी चिंतन
राधे विण चाले मंथन

मूर्ती मंत  प्रेम असे तयांचे
ख-या भक्तिचे ते प्रतिक
अव्दैताचा  आत्मा  एकरुप
असे प्रेम तयांचे सात्त्विक

वैशाली वर्तक 27/9/2019







हुंदका तव विरहाचा

स्पर्धेसाठी
काव्य
हुंदका तुझ्या  विरहाचा
वर्णे  9

कशी मी साहू हा विरह
कैसे कंठू दिन एकेक
"  हुंदका तुझ्या  विरहाचा"
उदास दिन  हा प्रत्येक


नयनी दिसे तव मूर्ती
पहावे, तर कळे भास
वाटे तू आलास समीप
ध्यानी मनी तुझाच ध्यास


अनिल, शशी करवी - ही
कितीदा धाडिला सांगावा
धरिलास का रे अबोला
कर ना , तू दूर रुसवा


वैरीण भासे मज रात्र
जग हे निद्रेच्या खुशीत
रहाते मी तळमळत
तव आठवांच्या कुशीत


राहूनी सेवेत रामाच्या
कृतार्थ पणाने जगला
माझ्या मनीचा मुक भाव
कधी न तुला उमगला


असुनी मी राज मंदिरी
सोशिली दशोत्तरी चार
अंधारातील ज्योती सम
विरह सोशिला अपार. .


..... वैशाली वर्तक

निशु शब्दिका/राधाकृष्ण प्रेम सहाक्षरी राधेचा श्रीहरीनार गवळ्याची

राधा कृष्ण प्रेम
निशु शब्दिका काव्य

जिथे पहाते तिथे
तो एकमात्र
कृष्णच कृष्ण
दिसे तिला सर्वत्र     1

राधेचे मनी चाले
हरी चिंतन
कृष्ण कृष्ण ची
बोले तिचे कंकण     2

कृष्ण वाजवी पावा
बावरी राधा
वळूनी पाहे
प्रीती ची तीज बाधा   3

वृंदावनी ती खेळे
हरीचा संग
राधा मुरारी
खेळण्यात ची दंग     4

मुरलीचा तो नाद
पडता कानी
बावरी राधा
होई कृष्ण दिवानी     5

मूर्ती मंत हे प्रेम
भक्ती प्रतिक
ते अव्दैताचे
प्रेम त्यांचे सात्त्विक     6

वैशाली वर्तक  28/9/2019







साहित्य  प्रज्ञा समूह आयोजित 
षडाक्षरी काव्य लेखन
विषय -  राधेचा श्रीहरी


ध्यानी मनी तिच्या l 
देवकी नंदन l
मुखी हरीनाम
करिता मंथन l 


अविरत करी l 
हरिचे चिंतन l
बोली कृष्ण कृष्ण 
तियेचे कंकण l


नको जाऊ कृष्णा l 
कैसे कंठु दिन l
जीव तुजवीण ll 
माझा होतो क्षीण l


मुरलीचे वेड l
 लावीतो श्रीहरी
 आहे राधाभोळी 
भाळीली बावरी l 

राधा रमणचे l
 प्रेमच आगळे l
आहे सर्वाहून l
जगी या वेगळे l 

श्रीहरी राधेचा l 
आत्मा एकरुप l
पहा अव्दैताचा l
प्रगटला दीप l

वैशाली वर्तक 
अहमदाबाद









मनातली काव्य अक्षरे
विषय - नार गवळ्याची

नार गवळ्याची
वेडी ती राधिका
मग्न चिंतनात
संगती गोपिका          1

राधा गवळण
करिते चिंतन
अविरत मनी
करिता मंथन           2

तिचा तो मुरारी
वाजवी बासरी
ऐकता सुरांना
होते ती बावरी          3

दुध दही लोणी 
घेऊनी  बाजारी
गवळणी जाती
गोकुळच्या नारी     4

आक्रोश करीती
सा-याच गोपिका
नेता मोहनास
विनवी राधिका  5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



अष्टाक्षरी तव रुपाच चांदण

सिद्ध लेखिका
ओळ अष्टाक्षरी
"तव रुपाचे चांदण"

मोहरलो पहाताच
तव रुपाचे चांदण
मनी पडली भुरळ
दिले देवाने आंदण

भर वैशाखी उन्हात
मिळे शितल सिंचन
दिनभर करतोय
तुझ्या  रुपाचे चिंतन

 तव जुलमी नयन
 रोखु नको मजलागी
क्षणभर मी तुझ्याच
आतुरलो भेटी लागी

बट तुझी ती लाडिक
भर करिते रुपात
पुन्हा पुन्हा  पाहताच
छळे मज ती मनात

किती गोड तव हास्य
जणू ता-यांचे हसणे
वाटे पहात रहावे
तव रुपाचे चांदणे

वैशाली वर्तक 27/9/2019


कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...