स्पर्धेसाठी
विषय- गाठोडे
गाठोडे
जीवनाच्या वाटेवर
कटु गोड प्रसंगाचे
बांधियले ते गाठोडे
कधी भासे ते कामाचे
आई बाबांचे संस्कार
ठेवोनिया गाठोड्यात
आले सदाची कामास
यश ते संपादण्यात
गाठोड्यात अनुभव
अतिशय महत्त्वाचे
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायचे
गाठोड्यात त्या दुःखाच्या
निरगाठ च बांधावी
नको उजळणी त्याची
विस्मृतीही सोपी व्हावी
भले मोठे गाठोडे ते
सुख मोती उधळावे
उधळीत जीवनात
सदा आनंदे रमावे
सत्कर्माचे मात्र सदा
नित्य बांधावे नेमाने
विषय- गाठोडे
गाठोडे
जीवनाच्या वाटेवर
कटु गोड प्रसंगाचे
बांधियले ते गाठोडे
कधी भासे ते कामाचे
आई बाबांचे संस्कार
ठेवोनिया गाठोड्यात
आले सदाची कामास
यश ते संपादण्यात
गाठोड्यात अनुभव
अतिशय महत्त्वाचे
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायचे
गाठोड्यात त्या दुःखाच्या
निरगाठ च बांधावी
नको उजळणी त्याची
विस्मृतीही सोपी व्हावी
भले मोठे गाठोडे ते
सुख मोती उधळावे
उधळीत जीवनात
सदा आनंदे रमावे
सत्कर्माचे मात्र सदा
नित्य बांधावे नेमाने
पुण्य संचित कर्माचे
गाठोड्यात हे प्रेमाने
वैशाली वर्तक .........29/2/2020
गाठोड्यात हे प्रेमाने
वैशाली वर्तक .........29/2/2020
सुधारित. वरची कविता
विषय- आठवांच्या सोबतीने
जीवनाच्या वाटेवर
सुख दुःख आठवाचे
बांधियले ते गाठोडे
कधी भासे ते कामाचे
आई बाबांचे संस्कार
आठवात
आले सदाची कामास
यश ते संपादण्यात
आठवात अनुभव
अतिशय महत्त्वाचे
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायचे
आठवांचे बांधियले
एक गाठोडे करून
सुख ,दुःख ,अनुभव
सोबतीस मिसळून
मात्र दुःखी गाठोड्याला
बांधियली निरगाठ
विस्मृतीला मिळे सदा
पहा सुलभची वाट
भले मोठे गाठोडे ते
सुख मोती उधळावे
उधळीत जीवनात
सदा आनंदे रमावे
सत्कर्माचे मात्र सदा
नित्य बांधावे नेमाने
पुण्य संचित कर्माचे
आठवांचा सोबतीने
वैशाली वर्तक ........२०/११/२२
विषय- गाठोडे
जीवनाच्या वाटेवर
कटु गोड प्रसंगाचे
बांधियले ते गाठोडे
कधी भासे ते कामाचे
आई बाबांचे संस्कार
जपलेत गाठोड्यात
आले सदाची कामास
यश ते संपादण्यात
गाठोड्यात अनुभव
अतिशय महत्त्वाचे
पुन्हा चुका न होण्यास
मनी ते रुजवायचे
दुःखाच्या त्या गाठोड्याल्या
निरगाठ च बांधावी
नको उजळणी त्याची
विस्मृतीही सोपी व्हावी
भले मोठे गाठोडे ते
सुख मोती उधळावे
उधळीत जीवनात
सदा आनंदे रमावे
सत्कर्माचे मात्र सदा
नित्य बांधावे नेमाने
पुण्य संचित कर्माचे
गाठोड्यात हे प्रेमाने
वैशाली वर्तक .........
कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित
उपक्रम
विषय - अनुभवाची ओवी
*सहज शिकवण*
अनुभवांची असे माळ
तीच शिकवे शहाणपण
गुंफली जाते काळ जाता
देते आपणास शिकवण
आधीच्या पिढीचे अनुभव
ऐकता मार्ग होतो सुलभ
कळती उणीवा आधीच
रहात नाही शंकेचे मळभ
हवी अनुभवाची शिदोरी
चुक होण्याचा नसे बहाणा
म्हणूनच तर म्हणती जन
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
लिहून ठेवले पूर्वजांनी
आलेले अनुभव तयांचे
साधे सरळ सोपे झाले
पथ जीवनात भवाचे
वरिष्ठ मंडळींची हजेरी
उगा का हवी वाटे घरात
अनुभवी बोल येती कामी
रोजच्याच व्यवहारात
वैशाली वर्तक
अहमदाबाद