गुरुवार, १६ जुलै, २०२६

म्हणी वरून. गरज सरो वैद्य मरो

माझी लेखणी
दिलेल्या मुद्यावर लेखन
 गरज सरो वैद्य  मरो

*स्वार्थी  स्वभाव*

मानवाच्या स्वभावात
ळ काही  असती स्वार्थी ळ
  स्वभावास नाही औषध
तर काहीअसती निस्वार्थी

रोज होणा-या वर्तनात
कळु लागतो स्वभाव
हळु  हळु टाळतो तया
वाटे नको त्याचा सहवास

काही जन बोलती गोड
काढून घेती आपले काम
काम होता जाती विसरून
कोण कुठले ,[कुठले धाम

अशा  जनांची वृत्ती असे 
गरज सरो वैद्य  मरो
काम आपले होता साध्य
तुमची किंमत  भले शुन्य  ठरो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १३ जुलै, २०२६

माया.

काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02
काव्यलेखन स्पर्धा 
प्रकार अष्टाक्षरी 
विषय माया

शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
 नसे शब्दात मांडणी


माता   पशू  वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी  भरारी
 लक्ष मायेचे पिलावर


गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास 
   शिष्य पार्थास.   कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.


माया अगाघ देवाची
किती वर्णावी  महती
    काळ संपे जीवनाचा
शब्द    तोकडे भासती.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

हायकू. तुझे हासणे

अभा म प सा धुळे जिल्हा चित्र  काव्य हायकु लेखन हायकु  तुझे हसणे  भासे चित्ता  मोहक   मना वेधक   १   लोभस हास्य  जणु चांदणे  फिदा मोहीत अदा २...