माझी लेखणी साहित्यमंच शहापूर जि ठाणे
आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त महास्पर्धा
काव्य प्रकार ..सुनित काव्य
विषय... बेरोजगारी
*कशाला चाकरी*
रंगवली होती साहेबी स्वप्ने मनात
मनाजोगती नक्की मिळेल नोकरी
झालो आहोत ना उत्तम पदवीधर ?
आता कसलाच नाही खेद अंतरी . 1
केले अर्ज अनेक जागी कचेरीत
असूनही कुशाग्र बुध्दी हुशार
कसे सरसावले वशीलेवाले पुढे?
सर्वत्र दिसला माजलेला भ्रष्टाचार..2
काय करावे काही कळेना
शिकून सावरुन पण मी बेकार
काय कामाची हातातली प्रमाणपत्रे?
हासत म्हणाली तू शिक्षीत *बेरोजगार. ३
न होता विचलित,धावत आलो शिवारी
माझीमाय काळी माती,कशाला करु चाकरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद