गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
अष्टाक्षरी काव्यलेखन 
विषय    मृदगंध


किती  वसुने साहिल्या
तप्त  उन्हाच्या झळा 
 काया तिची भेगाळली
 भासे जणू अवकळा

झाली मृग बरसात
तृप्त अवनी जाहली
गंध मातीचा  पसरे  
काळी माती गंधाळली.

घेता शोषून जलाला
. वा-यासंगे वाहे गंध 
सारे आसमंती आता
 भरे एकच मृद्गंध 

  
अत्तराचा फिका वाटे
गंध आवडे जनाला
वारा  वाहे आसमंती
  देण्या आनंद क्षणाला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

राबत गेले \ गेलो

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

काव्यलेखन 

विषय. राबत  गेले


सध्याच्या जीवनशैलीशी

   तुलना  करिता मनात 

वाटते कधीतरी तेव्हा

 किती राबलो  बालपणात 


पायी चालणे  शाळेला

किती  जायचो सहज

कधी वाटली नाही तेव्हा

टोपी वा छत्रीची गरज


 तूप गुळ पोळी ,भाजी

 नाही केली हॉटेलची मौज 

जुनी पुस्तकं वापरून 

भागविली नवीनची हौस


उधळपटी केली नाही 

 जीवनात केली काटकसर

 आहे त्यात  गोड मानले

 म्हणून सुख मिळाले जीवनभर.


नोकर नव्हते  घरात

  घरकामात केली मदत

स्वतः चे काम केले स्वतः 

   आनंदे होतों राबत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

गीत. तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे


कधी येशील.     गगनी अधीरता मनी दाटे.   
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते         


 आशा रुपी  कळ्यांची फुले  फुलती सकाळी.  
किलबील  ती खगांची  गोड भासते भुपाळी         
होता तुझेची आगमन  आनंद मनास वाटे 
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   

तुझ्या येण्याने वहाती,नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,   मंदावती नभी तारे        
मंद झुळुक वा-याची  मनास सुखावते                            
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       


तुज अर्ध्य देण्या उभे  जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल  सारे  नैराश्य मनीचे         
फाकलेल्या शलाकात प्रसन्नता लाभते
 तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   


स्वर्ण रंगात  येताची मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन वदे "प्रभात "त्या क्षणांना      
झाली उष:काल नव आशांची मनी भासते
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       

वैशालीवर्तक

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणणे त्याचे न कोणी ऐकी
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

सकाळ विषयक. हसरी सकाळ स्वाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


*षडाक्षरी काव्य लेखन*
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 


वृत्तबद्ध उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक

गुरुवार, ३० जुलै, २०२६

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित 
पत्र लेखन स्वरुपात कविता 
विषय ...या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 



पत्राद्वारे तुजला पुसते
का मनात उगाच निराशा
बघ आला सूर्य नभात 
घेऊन सर्वांसाठी नव आशा

  शुक्र तारा घन घोर तिमीरी
तेजाळे पहा सदेव कसा
फुल कोमेजता फळ डोलते
मधुर स्वाद मिळतो असा

 सुंदर  आहेची  हे जीवन
देवे दिधलेल्या या जन्मावर 
सहर्ष करिता स्वागत
 लाव सार्थकी तू  जन्मभर 


आजचा सारा हा खटाटोप 
  मी केला.हेच सांगण्या
प्राप्त काळ असे मनोहर
कर मन आनंदी जगण्या

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, २७ जुलै, २०२६

झाले गेले विसरून जावे

जगाचा पोशिंदा साहित्य समूह आयोजित 
काव्यलेखन उपक्रम 
दि २७\७\२६
विषय ...झाले गेले विसरून जावे
शीर्षक..


झाले गेले होऊन गेले
नको मनी तयांच्या साठवणी
जगुया  दिन आजचा आनंदाने 
कालच्या दुःखाची नको उजळणी.

करा मनाची स्वच्छ पाटी
जाणा मोठ्या मनाची महती,
कोणी दिले  , कोणी नाही 
याची विसरा आता गणती.

नका करु मन संकुचित 
मिळता कधी चिमूटभर ,
मन हवे सदा समाधानी
मिळेल उद्याला मुठभर

कालची गोष्ट आज विसरा
नव्याने उजळली, ऊषा आता
दावील ती नव्या दिशा
कशास हव्या कालच्या बाता.

झाले गेले गंगेला मिळाले 
असे वदती वडील धारी 
आहे तेची खरे जीवनी
सुबोध त्यांचा असेची  भारी

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद 
८१४१४२७४३०


.

रविवार, २६ जुलै, २०२६

आठोळी रचना. लक्षवेधी

काही असतात लक्षवेधी 
स्वतःचे अस्तित्व दाखविण्या
दाखवितात चुणुक बुद्धीची
लक्ष आपल्या कडे वेधण्या

अर्जून होताच लक्षवेधी
परिक्षेत दिधले उत्तर 
दिसे मजला फक्त डोळाच
द्रोणाचार्य जाहले निरुत्तर

शुक्रवार, २४ जुलै, २०२६

जुगलबंदी

काव्य निनाद  राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
काव्यलेखन उपक्रम 
विषय .. जुगलबंदी 
शीर्षक.... सादरीकरण 

वदता शब्द जुगलबंदी 
येई विचार मनात 
चाले  ही क्षणा क्षणाला 
रोजच्या जीवनात 

दुजा अर्थ असे स्पर्धा 
दिसते ती ,हर क्षेत्रात 
 खेळ,गायन, वादन, वा 
 साहित्याच्या लेखनात 

संभाषण राही, सुसंवाद 
भासे  सुरळीत   सदा
स्वतःचा प्रस्ताव  पटविण्या. 
शाब्दिक जुगलबंदी होते कदा

  गायनात दिसे जुगलबंदी 
दोन वाद्य कलाकारांची
श्रोते गण होती खुश 
मिळे थाप कौतुकाची

  जुगलबंदी दावी चुळुक
  आत्मसात केलेल्या गुणांची 
  जीवनात हवी हवीशी वाटे
   स्फुर्तीने  लहर  येते आनंदाची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, २२ जुलै, २०२६

कसे जमते तुज सारे

काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम 
दि 22/7/26
विषय .. कसे जमते तुला
शीर्षक.. हिशोबनीश

कसे तुजला जमते रे
तु‌च आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
 संभाळीतो जगताचा भार


तुझ्या अस्तित्वाचा खेळ
आहे या जगी न्यारा
तूची घडविशी तोडीशी
जगातील पसारा सारा



तूची दिले सुंदर  आकाश
निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या विना कुठले आनंद वारे  


कसे राहे आठवणीत तव
संचित कर्म मानवाचे
घडविशी अमुचे  आयुष्य 
दावीत  दिन सुख दुःखाचे

घडविशी रोज सकाळ 
कालचक्र उषा अन् निशा
चाले खेळ सुख दुःखाचा
रोज नव्याने देतो दिशा


अंत समयी येती शब्द 
तुची खरा हिशोबनीश
जाणती तव अस्तित्व 
म्हणती तुजला जगदीश

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, २० जुलै, २०२६

रिकाम्या हाताची श्रीमंती

 रिकाम्या हाताची श्रीमंती 

20/7/26


आपण रिक्तची हस्ते
जाणार ही रिकाम्या हाती
कमवावी मनाची श्रीमंती
सुबोध  हा संतची. सांगताती

हात दिधले सत्कर्म कराया
नाही फक्त  शोभवाया आभुषणे
दान धर्मे दीन पतिता उठवावे
हेच बिंबवावे सदा मने

यातच दडलेली असे

रिकाम्या हाताची  श्रीमंती
हाच मंत्र ठेवा ध्यानी
हीच शिकवण  देते  आपली संस्कृती 

रविवार, १९ जुलै, २०२६

किंवा किंव्हा अथवा

किंवा \ किंव्हा

 किंवा शब्दच असा की
 देतो आपणा पर्याय
 आवडीचे ते घेण्यास
 सांगे सहज  उपाय.

सुरू काळ शिक्षणाचा
परीक्षेच्या पेपरात
देती विकल्प प्रश्नास
किंवा दिसे प्रामुख्यात

छंद असती अनेक 
निवडती आवडीने
तेथे पर्याय असती
 स्विकारण्या  ते स्वेच्छेने 

किंवा,  वा , अथवा , आहे
शब्द सारेची   आगळे
कोणताही उचलावा
नाही अर्थात  वेगळे .

जिंकू वा मरू पर्याय 
असे सदा सैनिकांना
स्वदेशाच्या रक्षणार्थ 
उभा रही बलिदाना

 घडविता भवितव्य
 तया  महत्व  जीवनाते
 पडे प्रश्नची मनास
 कठीण निवडण्याते.

वैशाली वर्तक

गुरुवार, १६ जुलै, २०२६

म्हणी वरून. गरज सरो वैद्य मरो

माझी लेखणी
दिलेल्या मुद्यावर लेखन
 गरज सरो वैद्य  मरो

*स्वार्थी  स्वभाव*

मानवाच्या स्वभावात
ळ काही  असती स्वार्थी ळ
  स्वभावास नाही औषध
तर काहीअसती निस्वार्थी

रोज होणा-या वर्तनात
कळु लागतो स्वभाव
हळु  हळु टाळतो तया
वाटे नको त्याचा सहवास

काही जन बोलती गोड
काढून घेती आपले काम
काम होता जाती विसरून
कोण कुठले ,[कुठले धाम

अशा  जनांची वृत्ती असे 
गरज सरो वैद्य  मरो
काम आपले होता साध्य
तुमची किंमत  भले शुन्य  ठरो

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १३ जुलै, २०२६

माया.

काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02
काव्यलेखन स्पर्धा 
प्रकार अष्टाक्षरी 
विषय माया

शीर्षक... मायेची पखरण


माया असते आईची
कधी न होता आबाळ
अहोरात्र तिज चिंता 
सुखी राहो तिचा बाळ.

आभाळाची विशालता
कशी करावी मोजणी
भाव मातेचे मायेचे
 नसे शब्दात मांडणी


माता   पशू  वा पक्ष्यांची
माया ती आभाळभर
जरी ,गगनी  भरारी
 लक्ष मायेचे पिलावर


गुरू शिष्याची माया ही
असतेच मनी खास 
   शिष्य पार्थास.   कृष्णाने
विश्वरूप दावी खास!.


माया अगाघ देवाची
किती वर्णावी  महती
    काळ संपे जीवनाचा
शब्द    तोकडे भासती.


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ जुलै, २०२६

पाटाचे पाणी

काव्य स्पंदन राज्यस्तरीय 2
आयोजित झटपट काव्य लेखन स्पर्धा 2

विषय   पाटाचे पाणी
शीर्षक  शिवारी स्थान निवांताचे


देश आपला कृषी प्रधान 
करावी लागते सोय  जलाची
कृषिवलाच्या जीवनात गरज
सदैव पाटाच्या पाण्याची .

शिवारातून वहात असते 
झुळूझुळू पाटाचे पाणी
त्याचा आवाज भासे
जणु गोड मंजुळ गाणी 


  वहात्या  पाण्याचा बांध 
जणु ठिकाण निवांताचे
घास भरवी  प्रेमभावे
घरच्या भाकर तुकड्याचे

 पाटावर विसावला बळी 
तृप्त मने खाता भाकर
होई मनी समाधानी 
 नाही आपण कुणाचे चाकर
 
 थंड मंद वाहे पाणी
 पक्षी पण घेती आनंद 
सकाळी  पाण्यासाठी येता
खेळ त्याचा पहाण्याचा लागे छंद.

पाटाच्या पाण्यावर पहा
किती मन रमते
पाणी देते मना ऊर्जा 
 वहाते  पाणी पहाणे गमते


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शनिवार, ४ जुलै, २०२६

हसरी सकाळ

विश्व लेखकां


विश्व लेखकांचे 
आयोजित काव्यलेखन 
दिलेल्या विषया वर 
विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

सोमवार, २९ जून, २०२६

उखडलेली मुळे

काय पण योगायोग पहा आजच हा विषय दिला आणि..
आजच माझ्या दातांची  implant treatment सुरू झाली. आधी माप घेणे झाले. आणि मग आजच्याच
दिवशीत treatment  दातांचे काम सुरू झाले.
जुने अर्धे तुटके ..काही खराब दात  उखडण्याची प्रकिया  इंजेक्शन देऊन  तेवढा भाग डॉक्टरांनी बधिर करण्याचे
काम सुरू केलं...
बधिर केल्याने. दुखत नव्हते पण कुठे तरी मधून कळ वा झिणझिण्या येत होत्या ."आलिया भोगासी असावे सादर" तसे मनात म्हणत. देवाचे मनात नामस्मरण करत.  दातांची प्रक्रिया सहन होते.
   अरे हो सांगायचे की मला गार्डनीगचा खूप छंद आहे रोज सकाळ चा १ तास त्यात जातो. .प्रेमाने रोपांना कुरवाळत
त्याची निगा घेते.    पण  त्याच बरोबर.  लाॅनवर उगवलेले फालतु गवत. तसेच. फालतु वा  अगांतुक
रोपे.. वाफ्यातील कित्येकदा उखडत असते .  त्या आजवर उखडलेल्या.     मुळापासून  वा मुळासकट उपटून काढलेल्या मुळांना पण झालेले खंत. मी  मनातल्या मनात  देवाला व्यक्त केले व मनात त्या रोपांना  sorry म्हटले. त्या मुळांना पण झालेली व्यथा ही मनोमन जाणली   . वाईट वाटले.
      असं आहे तर... आपल्याला त्रास झाला तर मला मुळांची खंत जाणवली.
    


शनिवार, २७ जून, २०२६

कधी येशील गगनी सूर्योदय

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित  राज्यस्तरीय
काव्य लेखन स्पर्धा
क्रमांक १९
विषय - सुर्योदय 
अष्टाक्षरी रचना








शीर्षक - तुझी वाट  पहाते रे

कधी येशील गगनी 
अधीरता मनी वाटे
तम निशेचा  सारण्या  
तुझी वाट  मी पहाते      1

 आशा रुपात कळ्यांची
  फुले फुलती सकाळी
किलबील   ती खगांची 
 गोड भासेल भुपाळी         2

तुझ्या येण्याने वहाती
नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,         
मंदावती नभी तारे        3

तुज अर्घ्य देण्या उभे
 जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल
  सारे  नैराश्य मनीचे         4

फाकलेल्या  शलाकांनी
 त्या सहस्त्रकिरणांनी
तुला पहाताच मनी
 प्रसन्नता   दर्शनानी             5


स्वर्ण रंगात  येताची
मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन 
वदे "प्रभात "त्या क्षणांना      6

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

शुक्रवार, २६ जून, २०२६

अभंग. पैसा

 सिद्ध साहित्यिक समूह 

मोठा अभंग 

विषय .. पैसा 



असताना पैसा | तुकविती मान |

करीती सन्मान.|  जनामधे ||


पैसा हवा तर   | महेनत हवी. |  

शोधा युक्ती नवी | मिळे पैसा ||


जीवनात आहे.| पैसा महत्त्वाचा  |

 दिसे  प्रभुत्वाचा | जगभरी.       ||


किंमत पैशाची. | असतेच भारी   |

दिसतेच न्यारी   |सर्व जगी.       ||


 जन्मभर धावे| पैशासाठी तरी  | 

येत नाही परी | शेवटाला.    ||. 


जाणावी  किंमत  |पैसा येतो कामी |

पूर्णत्वाची हमी   | देतो मनी.    


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, २५ जून, २०२६

किटी\ हळदीकुंकू


आज बकुळीची फुले 
विखुरली प्रीतीच्या सदनीं
काळ्या चंद्र कला  शोभिवंत 
घर झाले गंधित मनोमनी


 वाण लुटले आनंदाने 
सणानुसार गुळ पोळी 
रूचकर होते सर्व जेवण 
ताव मारण्या सज्ज टोळी.

 यथेच्छ जेवणा नंतर 
चवीने खाल्ला मुखवास 
मग विविध विषयांवर 
रंगला  गप्पांचा फड खास

चला आता.. जाऊया म्हणत 
 घेऊन च शेवटी चहा
केली सांगता समारंभाची
 किती मजा केली पहा

वैशाली वर्तक 
22/1/26

चित्र काव्य


 भासे हिमगिरी अचल

स्वरूप पाही जलाते 

पुन्हा पुन्हा निरखुनी

येता रवी राजे नभाते


नाना रंगी उधळण

केली रवीने  नभात 

भासे चित्ताला वेधक.

आशा देतसे मनात 


तरू जणु उभे रांगेत 

 पुष्पें पहा उमलली 

करी स्वागत रवीचे 

 भासे ऊषा हासली


केली तयाने तयार

कुठे अथांग सागर

 घनदाट ती वनराई 

तर उंच उत्तुंग शिखर

  


रूप  पाहून सृष्टीचे

 कर सहज जुळती

 किती सुंदर निसर्ग 

जाणा देवाची महती


वैशाली वर्तक

गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे

 बॉडरलेस पॅन्थर्स साहित्य परिवार आयोजित 

स्पर्धा, उपक्रम क्रमांक १७

दि ९\५\२६

विषय ...बॉरडरलेस पॅन्थर्स सामाजिक साहित्य चळवळ

शीर्षक. *गाऊ गुणगान बॉरडरलेस पॅन्थर्सचे*


 बॉरडरलेस पॅन्थर्स समूहच असा की 

साहित्या संगे करे,सामाजिक कार्य हमखास.

त्यात माणुसकी रूजविणे वाढविणे 

हेची असे ध्येय समूहाचे खास.


चौथ्यावर्षात  केले पदार्पण 

स्नेह संमेलनासाठी सहभागी झाले गोळा

शेतकीय, वैद्यकीय, शैक्षणिक मदत करत

समूहाने केला साजरा  सोहळा.


समूहात आहेत दाते पण अनेक 

करीती अन्न वैद्यकीयदान तसेच वृक्षाचेरोपण 

असा बहुगुणी बॉर्डरलेस  पॅन्थर्स समूह हो!

ज्ञान ,सणवार,व्यायाम सह, जपतो पर्यावरण .


समूही पूजा ताई रांगोळी कलावंत 

सजविते वारीत पथ कलाकृतीने सुंदर 

साहित्या संगे रोज  द्या, बुध्दीस चालना 

अन् खाद्य पदार्थांची चव घ्यावी पळभर


रात्रीस चारोळी समूह मजेचा

सारस्वतांना मिळे लेखणीचा  मान

देत प्रतिक्रिया एकमेकांना 

करी लेखन राखून  वेळेचे भान


असा हा बॉर्डरलेस पॅन्थर्स समूह 

किती करावे त्याचे गुणगान 

झाला आहे जग विख्यात 

आहे मी सदस्य याचा मज अभिमान 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, २४ जून, २०२६

म्हणी वरून ... प्रयत्नाती. परमेश्वर

 अभा म सा प समूह महाड तालुका

26/5/21

विषय - प्रयत्ननांती परमेश्वर


 काहीच प्रयत्न  न करिता  

नशीबात असेल तर मिळणार 

म्हणून बसता आरामात

हाती काही नाही येणार


जसे  प्रयत्न कराल कामात

यश देव देत  असतो

प्रयत्नांची करा पराकाष्ठा

हसतमुखे देव दिसतो 


 न हलवता हातपाय पाण्यात

 कसे तरुन जाणार किनारा

करिता प्रयत्न   अखंड मग

, मिळेल देवाचा सहारा


शिक्षक सांगती करा यत्न

मिळवाल सारे सुंदर  यश

राहू नका देवावर विसंबून 

येईल मग  खचितच अपयश



कितीदा पडतो खाली

साधा किटक  कोळी 

तरी प्रयत्न  न सोडी

बांधतांना त्याची जाळी


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

सोमवार, २२ जून, २०२६

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
काव्य लेखन 
विषय .. मौन 
२२\६\२६

मौन पाळणे उत्तम 
वाद होतात स्थगित
पण सर्वच ठिकाणी 
  नसे योग्य सदोदित 

जेथे निषेध दाखविणे
असते अगदी उचित 
 विनयाने बोलून पहा
काम  होते ची खचित

 
 गांधीजीनी बनविले
 होते ना एक खेळणे
 मौन धरावे सदैव 
 हेच तयांचे सांगणे

मौनात असते शक्ती 
नको सदा दुराग्रह 
रहा जरा वेळ शांत 
साध्य कामास आग्रह 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

शनिवार, २० जून, २०२६

ओळखीचा

ओळखीचे तर असतातच आधार देण्यासाठी.तयात नवल नाही. पण जो जाणतो नाही. अपरिचित आहे असा आधारास उभा रहातो तेव्हां त्यांचे जास्त कौतुक वाटते.
पण सध्याचे जीवन वा सर्व चे वातावरण जरा कलुषित झालेले आहे. त्या मुळे अनोळखी जरा मदतीस उभा राहिला तरी मन आपले साशंक होते आपण लगेच त्याचा अधार घेऊ इच्छित नाही.
कारण काळच बदलला आहे. त्यामुळे पटकन त्याच्या आधार आपण  नकोम्हणतो वा  टाळतो.
       आपल्या बालपणी शेजार पातजारांवर, आपले पालक मुले ,घर सोपवून जात. अजून ही ती संस्कृती flat मधे आहे. नाही असे नाही.  पण तेव्हाही आपल्याला अनोळखी माणसाने काही दिले वा. काही माहिती विचारली तर देऊ नको ही शिकवण तेव्हाही होती आज ही आहे.
    कारण लबाडी. फसवणूक हे दिवसैदिवस वाढत आहे. त्यामुळे जागरूक. सावलीची ही बाळगावीच लागते.
अनोळखीशी जरा दोन हात लांबच रहावे लागते.
        पण आता विज्ञानाने फारच प्रगत केले आहे जगताला. हे face book, insta , Whatsapp वगैरे तून सर्व माहिती सहज मिळू शकते. व अनेक fraud वाट फसवा फसवी चाली आहे. त्यामुळे अनोळखी पण उतराई ने आपणास फसवू शकत आहे. तेव्हा आपला ओळखीचा आपल्या सतत हाताय   आपला श्वास बनून रहाणा-या मोबाईल ला जपा संत statu टाकून आपली माहिती इतंबुत कळणार नाही ची काळजी घ्या 
ओळखीचा. नाही तर आधार तोडणारा होईल

शुक्रवार, १९ जून, २०२६

गझल..... वृत्त अनलज्वाला.

 गझल.....................

गझल
अनलज्वाला  ८-८-८

कष्ट करूनी यश मिळवाया झगडत गेलो
भौतिक सुखात नकळतची मी हरवत गेलो.

मान मिळविला  हजारो गुन्हे  करूनी जगी.  
  लोकांना मी सत्याचे पाठ शिकवत गेलो
                                            
 क्षणभर येता  दिन दु:खाचे  कष्टी जीवा
हास्य किस्से सांगूनी मी हसवत गेलो.

केला प्रयत्न सदा उजळण्या  जीवन सारे.        
कुसंगतीने  व्यसनात  पहा अडकत गेलो.

वृक्ष तोडून  सिमेंट राने किती बांधली
पर्यावरणा जपता धान्ये उगवत गेलो.

सोमवार, १५ जून, २०२६

सुरकुत्यांची कहाणी

सुरकुत्यांची कहाणी
सहज गुगल फोटो निहाळत होते.त्यात दोन वर्षा पूर्वी चे फोटो आले. पाहून मन  हरकले, .मी मनात म्हटले," अरे वा
दोन वर्षांपूर्वी आपण छान दिसत होतो की !  खरच या मोबाईल ने फेसबुक ने आपल्या ला दोन.. तीन.. काय 8/10वर्षापूर्वी आपण कसे दिसत होतो  ह्याच रूप क्षणात दाखवितो.
     मी जस जसे जून्या काळात गेले, तर मनी हर्ष वाढतच गेला,  मग मनाशी म्हटले,
"म्हणजे आता आता म्हणजे दोन वर्षा पूर्वी या सुरूकुत्या कमी होत्या .आता मी प्रत्यक्ष हाता कडे नजर टाकली व मनाला. समजावले , "बाई साहेब आता वृध्दत्वाकडे झुकत चाललात  बरं का  ! शरीरावरच्या  झुर्या झुर्या पहा ..सांगत आहेत .कितीही  केस काळे करा    सुरुकुत्या कुठे लपवणार ? त्या तर त्यांचे अस्तित्व तीव्रतेने दाखविताच आहेत.
     खरय या सुरूकुत्याच  जीवनात. घेतलेले  ,सुख दुःखाचे क्षण . किती आनंद  अनुभवले   किती कष्ट साहिले , यांची कथा आहे. 
आपल्या जीवन काळाचा भुतकाळ सामावला आहे.  त्यांना प्रेमाने मी गोंजांरले . जरा तेलाचा हात प्रेमाने फिरविला . स्नानाला जायचेच होते. तर नीट कांतिला तेल लावले. स्नायूंना पण व्यायाम झाल्याने स्नायू पण जरा ताठरले . .
        अंघोळी नंतर अंगणात आले तूळशीला पाणी घातले व सहज लक्ष इतर लता -वेली ,वृक्षांकडे गेले तर काही झाडांची पाने सुरकतून क्षीण भासली. तर काही निखळली होती. सहज संदेश ल्या वेलीलतांनी , निसर्गाने दिला, 
ऋतूचक्र चालत रहाते. वाढ वृद्धी. झीज हे चालत रहाणार.  मग या सुरकुत्या पण त्यातील एक भाग आहे .
काळ किती लोटला याची त्या पावत्या देताहेत.   क्षण न् क्षण  आनंदाने जगून घे. लेखणीला धार देत रहा. अनुभवाचे गाठोडे जपत  रहा. 


-

गुरुवार, ११ जून, २०२६

लेख. माझा आनंद

माझा आनंद 

आनंद  ही मनाला प्रफुल्लित प्रसन्न वा खूश करणारी मानसिक भावना.संवेदना
 माझा आनंद मला अगदी साध्यासुध्या छोट्या कारणाने मिळतो. साध्या म्हणजे अगदी.... मनाजोगे काम होणे.... स्वतः रोपलेल्या रोपास. फुल येणे, छान झोप लागणे, सुंदर गाणे ऐकणे, ..मुलांचे , सुनांचे  तसेच आता नातवंडांचे यशाचे संदेश वा निरोप येणे  या सा-यातून  पण आनंद मिळतो.
      मला gardening चा छंद आहे. सकाळी गवताची हिरवी गार पाती  वा-याच्या झुळकीवर हलताना , रोपांची  पाने
जणु टाळ्या वाजवित आहे  असे भासते. वा-याच्या तालावर ची इवली इवली पाने  , ,बांबूच्या झाडांची लवलवती पाने ,खरच खूप आनंद देतात.त्याच बरोबर पक्ष्यांना पिण्यास ठेवलेल्या पाण्याच्या, मातीच्या भांड्यावर बसून
त्यात चोच बुडवून इकडे तिकडे पहात. कोणी  मांजर वगैरे झडप तर नाही घालणार यांची चाहुल घेणारी पक्ष्यांची नजर , तसेच मोठया पक्ष्यांची लहान पक्ष्यांवर ची दादागिरी, मधेच खारूताईचे चपळाईने पाणी पिऊन जाणे
हे सारे पण पहाण्यात आनंद मिळतो.
    तसेच सध्या माझी लेखणी पण जरा जास्त लेखणी झाली आहे. त्यामुळे. आपली कुठली  कविता वा साहित्य  कुठल्या दैनिकात प्रकाशित झाले आहे. हे पाहून आनंद होतो. सहज विषय सुचता कल्पना शक्तीला सहज स्फुरण चढता तयार झालेली कविता . यामुळे पण मन पुलकित होते,.
   तसेच उद्या शनि रविवार म्हटले तर मनाला आनंद वाटतो. मन आनंदाने हलके वा प्रफुल्लित होते.
खरं पहाता. सध्या निवृत्ती काळ , त्यामुळे रोजच रविवार  पण  दोन दिवस मुले -सुना पण घरी असणार... या
 विचाराचा पण मनास मोद होतो.    चला आज सारे कुटुंबीय जन एकत्र असणार. याचा पण मनाला हर्ष होतो. .
     तसेच हवी असलेली वस्तू पटकन मिळाली तरी देखिल आनंद मिळतो म्हणतात ना नोकर व वस्तू.. हवी तेव्हा मिळाली तर पृथ्वी वर स्वर्ग अवतरतो असे म्हणतात . अशा रीतीने माझा आनंद सर्वत्र विखूरलेला आहे. 
सर्वत्र पसरलेला आहे. 
  आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे!
  कवी बाल  ठोंबरे यांच्या बाल गीता सारखा  वरती खालती सर्वत्र आहे.
कदाचित आजीने दिलेल्या शिकवणीचा भाग असावा. वृत्ती समाधानी   तर आनंद मन भरुन असतो .तसेच काहीसे असावे. नाही का!
कारण समाधानातच आनंद दडलेला असतो.ना.


सोमवार, ८ जून, २०२६

शब्दांची बरसात

शब्द रजनी कथा \ललित लेख लेखन साहित्य समूह पुणे 
प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय स्पर्धा ललित लेख लेखन 
दि 16/4/26
विषय .... शब्दांची बरसात भावनांचा सागर

साहित्यात एकंदर 
खेळ असे तो शब्दांचा

 पूर येतो कल्पनेला
  पसाराचा विचारांचा 
        तर शब्द आहेत म्हणून आपले विचार ..मनातले गुज..आपल्या भावना..आपण 
एक दुसऱ्यास सांगू शकतो. आपण दुसऱ्या समोर आपल्या विचारांची मांडणी करून 
आपलं मंतव्य सांगू शकतो. तर ही आहे शब्दांची किंमत. वा जादू . 
           जुळवूनी शब्द शब्द
            होते तयार लिखाण 
            असो मग गद्य पद्य 
            शब्दांचीच असे खाण 
       
            मुल्य सर्वदा शब्दांचे 
             जाणे शब्द शिल्पकार 
             शब्द ओवितो उचित 
             करी तो शब्दाविष्कार 

    आपल्याला जे  विचार .भावना अंतरी येतात  , त्यांना शब्दच वाट करून देतात . शब्दांची बरसात होते व साहित्य घडते. मनातील भावनांचा सागर उचंबळतो.व शब्दांतून भाषा समृद्ध होते. साहित्याची  भरभराट होते.
     त्यासाठी शब्दांचा भंडार वाढविला पाहिजे. जेवढे वाचन जास्त तेवढा शब्द समूह वाढतो . एका शब्दास समान अर्थी शब्द मिळतात व भाषावर प्रभुत्व वाढते.  तसेच 
अलंकारिक शब्दाने पण लेखन प्रभावी होते. 
  या साऱ्या साठी शब्दांची बरसात व्हायला पाहिजे. म्हणजेच काय शब्द आहेत तर
भाषा आहे ,संवाद आहे. तरच साहित्य आहे.जसे मुर्तीकार शिल्प करतो तसे
शब्द शिल्पकार शब्द रचून रचनेतून शब्द शिल्पकार घडतो.
शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी

शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
 जन  ज्याचे  करितात
 सदासाठी पारायण.

आपला शब्द रजनी समूह पण विषय देताच सारस्वत नियमित लेखन करतात,
आपल्या लेखणीस धार देत लेखणी लेखणी करतात. 
कधी असे होते की लेखणी रुसून बसते काही केल्या शब्दच अधरी येत नाही, सतत
लेखन  गरजेचे असते. जेव्हा भाषा नव्हती तेव्हा चित्र काढून भावना वा विचार दाखविले जाई,वा अशिक्षित असता चित्राची मदत घेतली जाते. 
  तर असे महत्व आहे शब्दांचे,
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, ४ जून, २०२६

चित्र काव्य

बसलोय निवांतात
होते रोजची सकाळ 
आटपण्याची नसे घाई
एकांत जीव खाई सदाकाळ.

ओसरीत पहुडणे 
बाजेवर बसणे शांत
नाही बोलायला शेजारी 
 नाही उरली उद्या ची भ्रांत .

कसे असते एकाकी जीण
नाही सहन होत आता
पाखरे उडाली घेण्या भरारी
वेळ जात नाही जाताजाता.

खेळणी हाती घेऊन
पुन्हा पुन्हा हात फिरवितो
नातवंडांचा स्पर्श शोधता
जीव त्यात रमवितो.

एकटेच आलो एकटे जायचे 
माहित आहे जरी मना
पण मन मात्र नाही अजून 
समजत  आलेल्या या क्षणा

शुक्रवार, २२ मे, २०२६

को-या पाटीवरचे नशिबाचेअक्षर

*स्पर्धेसाठी*
विशेषकाव्य लेखन स्पर्धा 
दि 21/4/22
विषय - को-या पाटीवर नशिबाचे अक्षर

*शिकस्त केली प्रयत्नाची*

आस होती सुयशाची
शिकस्त केली प्रयत्नाची
झाली अक्षरे सुवर्णांची
साथ मिळता नशिबाची

 चाले  मधे विनाशाचा खेळ
न होता तरी कष्टी जीवनी
  उपसल्या कष्टाच्या  राशी
मोद, समाधान सदा मनी


  सदा उभा आहे पाठीशी
प्रयत्नांची कास धरी 
यश मिळणार सांगे कानी
दृढ विश्वास   तो देवावरी

करीता परिश्रम नेटाने
दैव घडते  मनगट बळावर
देव घडवितो नशीब प्रेमाने
*को-या पाटीवर नशिबाची अक्षर*

उघडले द्वार स्वर्गाचे
यश मिळाले पदरी
आनंदाला नसे पारावार
प्रसिद्धी ऐकून  जन अधरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २० मे, २०२६

विषम जाती प्रकारात. वृत पतितपावन व पादाकुलक. माझी शाळा

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रम 
बुधवार 20/5/26
विषय शाळा
पतितपावन +पादाकुलक विषमजाती. प्रकारात 

          माझी शाळा 

जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 
दृढ निश्चयी  उज्ज्वल भविष्य घडविण्या मान तिज.     धृवपद

 दैवत  समान , आहे मजला,
 नाही वदते शब्दे शाळा.   
  ज्ञान वाहिनी  ती आम्हाला 
  माझ्या मनात राहिली तीच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 

आत्मनिर्भर  सक्षम करुनी
 गोड शब्दात  समजावूनी 
केले आम्हा सकळा ज्ञानी
भाव जपियले अंतरी तेच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज

अजून स्मरते,  बोल स्तुतीचे
 मन मोदभरे , कला गुणांचे 
मान वाकते,  बहुमानानी
मधुर स्मृती आहेची निज 
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, १३ मे, २०२६

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा अनिल मनीषा

दोघे बैसले एकांती
घेत आनंद निसर्गाचा
आला विचार मनात 
आनंदी सहजीवनाचा.

नाव राखिले मनीषा
केली पूर्तता इच्छांची 
मोदे विचारात रंगली
मने दोन जिवितांची

वदती एक मेकांना
अजून मज कळेना
पाच दशके सरली
काहीच आकळेना 

कधी दिन भासले कष्टाचे
पण  होती जाणीव मनाला 
होणार चीज श्रमाचे
सुख मिळणार जीवाला.


उन पावसाळे पाहिले 
पण नव्हती कधीही भ्रांत
प्रेमाच्या गाडीत  खरतर
समाधानी मन सदा शांत


मागे वळून पाहता
ओठात शब्द आले
देवा  तुझीच कृपा
सहजीवनी धन्य झाले.

गुरुवार, ७ मे, २०२६

परिचारिका

जगाचा पोशिंदा समूह आयोजित उपक्रम 
दि ७\५\२६
विषय परिचारिका 

सेवा रूग्णांची करणे
गुणाने असे मायाळु
नसे ठाऊक आराम
स्वभावाने ती दयाळु

परिचारिका राही मग्न 
 निष्ठा कामावर फार
न आळस कधी करता
 सेवा करे रूग्णांची अपार 


दिवस असो वा रात्र
कधीच नाही थकत 
वेळीच देते औषध
मुखाने सदा हसत

 रूग्णांसाठी समभाव
 काम हेची देव कर्म
मनाशी ठेवते हे नित्य
हेची मानीते जीवन मर्म

कोरोनात केली सेवा
अजूनही दिन थ्यानी 
मरणातून वाचविले
उपकार ठेवा मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

बुधवार, ६ मे, २०२६

वृत्तबद्ध ... लवंगलता ... मात्रा ८-८-८--४. सय गावाची

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रमा साठी
वृत्त लवंगलता. (८-८-८-४)
*सय गावाची*

सहज पहाता चित्र गावाचे मन आनंदे  नाचे
 जाईन कधी  माझ्या गावी आठवण मनी  गाचे.      

 गावी येता  छोटी छोटी  टुमदार घरे दिसली      
 किती मजेचे दिन ते होते मनातून सय आली

भरून  गाड्या धावत होत्या.धान्ये विकण्या साठी.  
 खुशी खुशीने कृषक चाले  फेरीगाडया  पाठी 
 
गोरज समयी  पहा चरूनी  परतली गुरे गोठा
 चित्र रम्य किती पाहून मनी  मोद जाहला मोठा.
                                 .   
  नभ ता-यांचे जसे भासले सुपात लाह्या गावी
  होताच निशा यामिनी पहा शोभनीय रुप दावी

 किती मजेचे वाटे फिरणे  बैलगाडीत  बसता
वर्दळ नाही मौज आगळी  अनुभवानंद  मिळता

वाटे हेची  जीवन सुंदर आहे जगण्या साठी
 रोज बसावे. निवांत समयी शीतल सरिते काठी.

कशाला हवा  खोटा भपका  नकोच शहरी जीणे 
गावच माझा मला   विचारे   गावात काय ऊणे?


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ४ मे, २०२६

वृत्तबध्द. शार्दुलविक्रीडित

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रम 
29/4/26
वृत्त शादृलविक्रीडित
लगावली
गागागा ललगा लगाल ललगा  गागाल  गागाल गा!

बोह-या वरती  नटून बसली !  वरमाळ शोभे करा
लाजूनी हसली अधीर नयनी ! आनंद दाटे  खरा

ऐकूनी   शुभ कामना  वधु हसे !  झालीय हर्षे मनी. 
पाहूनी ्सकळांस ती सविनये !  संतोष पावे क्षणी


संसारी सुख संपदा हर पळा !  लाभो तुला कांंक्षिणी
सोनाली वरते नरेश सखया !  वदती तुला कामिनी 
                                        
 
वैशाली वर्तक 
                                       


वृत्तबध्द. जलौधवेगा. अजून सारे तसेच आहे

वृत्त - जलौघवेगा
लगालगागा  लगालगागा
-----------------------------
*'अजून सारे तसेच आहे'*

लगालगागा  लगालगागा

गुलाब राजा सुगंध देतो
 तसाच न्यारा.  रुपात भासे
कसे उमजते  फुलास ते ही  
सकाळ होता हळूच हासे

सुवास त्याचा कसा  मनाला
असे सदाची  मनास मोही
अनेक रंगे  दिसे सुशोभित 
फुलात शोभा  तयाची सोही

नभी अजूनी दिसे रवी तो
सकाळ होता नवीन आशा 
 पहा शलाका कशा चमकती
कशी पळाली पहा निराशा     


करीत नाही मनात खंत
नदी रहाते सदा प्रवाही
अखंड वाहे जशी तटिनी
न होत खंती  तशीच वाही

अजून सारे तसेच आहे
पहा न  झाला  कुठेच काही 
जुळेल सारे कधीच सारे
ऋतूत काही नवीन नाही 






########################### 

लगालगागा  लगालगागा
कसे करावे.  अजून सारे
तसेच आहे.  जरा पहावे
विचार केला घडून आणू
जरा तसूभर  नवे करावे

नवीन केव्हा  तरी बघावे
जुने पुराणे  नवीन आणू  
कसे कळावे  कुणीतरीते
मनास घ्यावे कसून 

कसा बरा हा नकार देतो
कधी जुने सोडण्या नसेची

शनिवार, २ मे, २०२६

सुहास्य

सुहास्य

होता मन प्रसन्न आनंदी
हास्य  लकीर उमटे मुखावर
हास्य  ही क्रियाच अशी
सहज न राही काबू मनावर

हास्य  वदन सर्वा आवडे
देती  आनंद जन मनास
निरागस  हास्य बालकाचे
पाहून वाटे चुंबावे तयास

स्मित हास्य  ठरे ओळख
राही व्यक्ती  स्मरणात
काम पण होई साध्य
 हास्यच  येई आठवात

सुहास्यावर भाळलो मी
हास्य तुझे  ते मोहक
असे येते ऐकण्यात
 ठरते हास्य चित्त वेधक

सुहास्य  असे सुगंध 
फुलाचा परिमल मंद
भासे फुललेले सुमन
देई मनास आनंद

वैशाली वर्तक

शुक्रवार, १ मे, २०२६

मी आणि ती ( झोप)

  मी आणि ती


कसे उठतात सारे लवकर

माझ्या मनी सदा खळबळ

केला  मीही निश्चय उठण्याचा

अंगी एकवटून मनोबळ


केली पूर्व तयारी  आधी मनाची

उठावे लागेल पहाटे सकाळी 

चालणे असे सर्वोत्तम व्यायाम

 पण, झोप प्रिय मज सदाकाळ


कठीण काम  होते मज साठी

साखर झोप सोडणे,येई जीवाशी

तरीही केला मनाचा हिय्या

लावून गजर ठेवला उशाशी


किती कर्म कठीण ते काम

पण केलाय ना संकल्प

सकाळी उठणे आले ओघात

आता नव्हता दुसरा विकल्प


  होता सकाळ वाजला गजर

 *प्रिय झोपेने*  ऐकले  न काही

होता रोजची वेळ उठले

  नजर माझी चोहीकडे  पाही 




ती व माझी प्रिय


कसे उठतात सारे लवकर

माझ्या मनी सदा खळबळ

केला  मीही निश्चय उठण्याचा

अंगी एकवटून मनोबळ


  केली होतीच मनाची तयारी

आजचा दिवस करीन खास

काही झाले तरी त्यजेन झोपेला

पूर्ण करीन संकल्प हमखास 


 पादत्राणे काढून ठेवली

व्यवस्थित केली, कपड्यांची तयारी

करुनच ठेवले सर्व यथायोग्य 

झोपताना मिळाली मनाला उभारी



निद्रा सुख आहेच भाग्यी

स्वप्नात केले  वेष परिधान 

मनी वसे तेच दिसे स्वप्नी

साखर झोपेत मिळवले  समाधान 


सकाळच्या झोपेचे सुख

तेच जाणिती या जगती

जयांची ती असे प्रियतमा 

साखर झोप का उगाचच वदती






||

कामगार दिन

कामगार दिवस.   वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये २\५\२६



कामगारांची  खंत
    
करितो काबाड कष्ट
दिवसभर नित्य राबून
पोटाच्या  खळग्या साठी
दिवस रात्र  एक करुन

खरे पहाता जशी दिसे
उभी सुंदर  इमारत
करीती  वर्णन सौंदयाचे
गुणगान  गाण्यात नाही थकत

पण  पाया भरणी विट
दिसत नाही कुणाला
असे ती आधारभूत 
सर्व  वरच्या सौंदर्याला

करणारे कष्टकरी याची
सदा हवी मनी जाणीव
तेची  कामाची घेती दक्षता
ठेवता  न कशाची उणीव 

 एक दिवस  देऊन मान
 फेड होत नाही उपकाराची
मनी ठेवा मान कष्टाचे
जाणा खंत कामगारांची


द्यावा परिश्रमाचा मोबदला
जाणूनी कष्टाची खंत
नको व्हायला हयगय
द्यावी विश्रांतीसाठी उसंत

वैशाली वर्तक

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

पाऊलखुणा

असतात उपयोगी जीवनी
पाऊलखुणा प्रत्येकास फार
तिच्या मुळे  लागतो ठाव
भुतकाळाचा  वारंवार 

 चालताना वाटसरू 
टाकत असतो पाऊल
मागच्या  वाटसरूला मिळे.
सहज दिशेची चाहुल.

उगा का म्हणती जन सदा
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
पाऊल खुणांना  अनुसरता
न उरतो  चुकण्याचा बहाणा

पाऊलखुणा रचती ईतिहास   
राखता संग्रही अनुभव
भविष्यकाळ होतो सुकर
आठवणीत घेत स्वानुभव 

पाऊलखुणा असती ठसे
 वर्तमानाचे मार्ग दर्शक 
सहज येती कामास 
 पथिकास दिशा सूचक

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

अष्टाक्षरी. वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह 
उपक्रम 1391

दि 3/2/26
विषय. वही 

आनंदिले मनोमनी
वही पाहून  सुंदर 
गुज मनीचे सांगण्या 
मन धावे क्षणभर 

किती सुबक बांधणी
वही खुणावी मनाला 
घेऊनिया लेखणीला
मन सुरु  लिखाणाला.

 रेखांकित ओळीवर
 झरताची शब्द फुले 
पाने वहीची फुलली
आनंदाने मन डुले.

निळ्या शाईची अक्षरे
जणु मोतीयाच्या माळा
 करी  शोभित पानांना
मोद होतसे मनाला

झरझर उलटली
लेखणीने खूप पाने
 मन माझे  शांत झाले
 पूर्ण लिहीता गाणे,

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, ५ एप्रिल, २०२६

अक्षर रेषा करिती सुजाण

आला हाती कोरा कागद 
होतीच बाजूला  सखी लेखणी..
आले मनी विचार सहज 
उमटवली  अक्षरे  देखणी 

असतेच मैत्री दोघांत सदैव 
हृदयीचे भाव  कागद 
दावितो. खुलवून सदा
स्वतः च्या पटलावर अलगद

सखी लेखणी रेषांमधून
फुलवी अक्षरांचे मोती 
गुंफत जाते सुंदर माळ
वाचक वाचून सजाण होती

रेषांमधील मनीच्या भावना 
उमजता वाचकास
अक्षर शब्द वाक्ये बनून 
वाढे ज्ञानाचा हव्यास

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

पंख मिळाले शब्दांना

 काव्य निनाद राष्ट्रीय साहित्य मंच पुणे 
आयोजित उपक्रम क्रमांक 782
विषय ..पंख मिळाले शब्दांना 
शीर्षक..  मिळते उभारी लेखणीला 

 मनी  पिंगा घाली शब्द 
 मन गुंगे विचारात 
 माळ मनी विचारांची 
 साकारली लेखनात

 शब्द शब्दास जोडून 
 वाक्ये  अनेक गुंफली
कधी काव्यात गद्यात
शब्दे साहित्यी झरली. 

मन धावे सैरा वैरा
 मिळे गती विचारांना
अंतरात येता लाटा
पंख  फुटती शब्दांना

   खेळ चालतो शब्दांचा
  शब्द येतात धावून 
   यमकी अलंकारिक 
  उचित जागा पाहून 

पंख फुटता शब्दांना
 वेळ काळ प्रसंगात
सदा रमे सारस्वत 
शब्दांच्याची गाभाऱ्यात 


वैशाली वर्तक
 अहमदाबाद

बुधवार, १ एप्रिल, २०२६

वृत्तबध्द. वृत्त मालिनी

फक्त वृत्तबद्ध 
मालिनी वृत्त 

अक्षरे 15.  8अक्षरावर यती
 लललललल गागा. गालगागाल गागा

नमनकरित आली    कांक्षिणी  मंडपाशी
हळुहळु पद टाके ,   मोदवाटे उराशी                       

दिवस गणित होती ,आजच्या या क्षणाची
चपळपण मनाची, लाज वाटे जनांची

उपरति तिज ठायी, दाखवेना  कुणाला
 पण मन अविरामी,  गुंतले त्या  क्षणाला .
             
क्षणभर तिज आता,   कंठ दाटून आला.    
जिवलग जिव सारे, आठवे ती सुखाला

घडि घडि मन आता, राहवेना क्षणाने
सजल नयन ओले, आसवाने मनाने


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

गुरुवार, २६ मार्च, २०२६

चित्र काव्य


नसे चिंता उन पावसाची 
 मिळविण्या रोजची भाकरी
निघाली पहा ललना
नाही करित कोणाची चाकरी

नवीन घेऊनी भांडी
सांभाळीत डोईवर भार
तान्हास बांथून कडेवर
कष्ट करायला तयार

जुने घेऊनिया कपडे 
 मुखाने भांड्यांची आरोळी
देते नव नवी भांडी
वणवण फिरे घरांच्या ओळी .

 ताई माई ऐकता तिची हाक
   बोलावी तिजला त्वरित 
वाट बोहारणीची पाहून 
वस्तू विनीयम करित

असा रोजचा शिरस्ता 
 नाही वाटे कधीच शीण
रोज वेगवेगळ्या पेठेत 
 फिरता होत नाही क्षीण

शुक्रवार, २० मार्च, २०२६

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान

पिवळे पान ,पांढरे केस
असती दोन्हीही समान. एकसमान 
ऊन पावसाळे साहिलेले
जयांना मिळे सदा मान

  जैसे पर्णांचे  पिकणे
  नियमच असे सृष्टीचा
बाल्य ,तारुण्य , वृध्दत्व
हाची क्रम आयुष्याचा

किती सहजतेने पर्ण
येते गिरक्या घेत भूवरी
घेते विसावा खत म्हणूनी
पुन्हा  फुलवण्या धरेवरी

वृध्दांच्या जीवनातील
मिळालेले अनुभवाचे बोल
नव पीढिला ठरे मार्गदर्शक 
 जाणावे सदा त्याचे मोल

पिकल्या पानांनी पण
गाऊ नये सदा इतिहास
सद्य काळ तितकाच कौतुकाचा
 पहातआनंदे वाढवा त्यांचा उल्हास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १६ मार्च, २०२६

वृत्तबध्द . वृत्त हरिभगिनी 8.8.8.6. कविता देऊळ

हरिभगिनी ८-८-८-६

देऊळ
         



बालपणीच्या आठवणीचे  मंदिर होते   रघुपतिचे
संथ  वाहत्या   नदी किनारी  भासे मज मंगलतेचे 

देऊळाच्या मागे होती आम्रतरू अन् वनराई
सारवलेल्या अंगणातुनी  झाडलोट ही नित होई

 मंगलकारी  लयेतसुस्वर   विठ्ठल गीते  जन  गाती.      
भक्तजनांचा मेळा भजनी  भक्ती मयी   होत जाती 

कधी  पथिकही  क्षणिक येउनी विसावताती खांबाशी
कधी मनोगत  कोणी  सांगे  विठुराया-रखु माईशी 
                              
आज  न तेथे राहिले जुने देऊळ काय मंदिरते  
एका   धनिके देवालयची  केले रुपे  दिसण्याते                
        
जुने खांबची  जाता तेथे रत्नजडित ते खांब .दिसे
जणु मिणमिणत्या  दिव्याठिकाणी लखलखित दीपमाळ वसे      

गोपुरी नक्षी  अन  कळसावर भव्यदिव्य ध्वजा आहे  ,
राऊळाची शान पाहुनी, क्षणभरी मनी,  मोद वाहे.       

पण एक खंत मनात राहे , तीरावरचे, का अवचित                          
ते न' जाणता रघुपति नावे, धनिका नामे ते प्रचलित.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

गझल. ... आनंद कंद

 झरणी अशी फुलावी   माझ्यात जाण आली

 स्मरता गुरू विजोंना, काव्यात जाण आली


देऊन बोध मजला, केले अता  लिहीते

घेताच कष्ट थोडे, तंत्रात जाण आली.


रागे भरे न होता, केले मला शहाणे

आता करीन लेखन,  तर्कात जाण आली.


घेऊन रोज शाळा, होतील गझलकारा

आहेच नाव त्यांचे, हर्षात जाण आली


वंदून शारदेला,  नमितेय मी  सरांना

मदतीस हात लाभो ,    गझलेत    जाण आली. 


वैशाली वर्तक

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

आजही आठवतो एकेक शब्द

 आजही आठवतो एकेक शब्द



दिले संस्कार  आईबाबांनी.           दिले   संस्कार   गुरू जनांनी.       ८_८

आपणास  जे बालपणी.               आपणास बालपणी.  ६_६

अजूनी आठवितात  शब्द-शब्द.     अजून आहे स्मरणी शब्द. ८_८

  ध्यानी रहाते शिकवण मनी.         स्मृत़ीच्या.   जडावणी.  ६-६

                                               

माती सम गोळ्याला जयांनी.    गोळा होता जणु मातीचा. 8-8

बनूनी उत्तम  शिल्पकार.           होत तुम्ही शिल्पकार  6-6

घडविले सर्वोत्तम  शिल्प.        सर्वोत्तमी. शिल्प घडविले ८-८

ध्यानी  तयांचे उपकार.          मनी सदा राही उपकार 


 दिली  घेतलेली  वचन

घेऊनी हात हाती विश्वासाने

शब्द न् शब्द अजूनी स्मरते

पूर्ण  केलीत दोघांनी सहर्षाने


 शब्द मातेचा ठेविला जपूनी

 करिता गृहप्रवेश सासरी

लाभले सुखद सहजीवन

भरल्या प्रेमाच्या घागरी



वैशाली वर्तक 


बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

वृत्तबध्द वृत्त..चंद्रकांत\ पतितपावन कविता( २) मनीषा,बचत ८-८-८-२

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रमा साठी 
आशय ओळी विजोंच्या

वृत्त चंद्रकांत/पतितपावन ट
8-8-8-2
शीर्षक. ...मंनिषा


अशी दिवाळी, एके वेळीं,    व्हायची साजरी
पोरे जाता, परदेशाला,  खेद दाटे उरी

चार दिवस घर, गजबजलेले, गप्पात रंगती
काका काकू, आत्या मामा, आप्त जन जमती

रोजच नवीन  मिरवित कपडे  पहा कसे नटती
आनंदाला उत्साहाला  सदैवची भरती

पोरे रमली, देश सोडला, घर ओके  पडले
ज्येष्ठच आता एक एकटे , घरोघरी उरले.

आता उरल्या  गत काळाच्या आठवणी मनी
परत फिरावे मायभुमीला आशा मनोमनी

वैशाली वर्तक
********************************************* 
अहमदाबादचंद्रकात \  पतितपावन
मात्रा ८-८-८-२
*बचत*
 
  थेंबेथेंबे ,तळे साचते   आहे ना ध्यानी                                               
  रोज रूपया,  बचत करावा, जाणीती  ज्ञानी
                                         
  बालपणीला अंगिकारली संचय करण्याची 
  कामी येते  बचत उद्याच्या भविष्यकाळाची

 अशाने पहा, लागते सवय, अपव्यय टाळणे
 भविष्यातल्या, व्ययाची सहज तरतूद पाहणे
                              
  बचत  ती पहा   येता कामा ,  वाटले हायसे 
  फायदेशीर ठरतेय बचत खाते अनायसे

  छोट्या  मुंग्या , कशा पहा ना, अन्न  करी गोळा
 पावसाळ्यात  सर्वत्र पाणी,भुगर्भी सोहळा       

वैशाली वर्तक

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बचत seveing

शब्दरजनी साहित्य समूह 
आयोजित चित्र काव्य 
विषय .. चित्र काव्य 
शीर्षक...आजची बचत


थेंबे थेंबे तळे साचे 
ठेवा सदा ध्यानात 
रोज  रूपया बचत करिता 
मोठी रक्कम होईल भविष्यात.


लहानपणीच अंगिकारावी 
बचतीची  सवय नित्य
 भविष्यात मोठ्या खर्चासाठी 
कामास येते , हेच सत्य 

अशीच लागते सवय
फालतु खर्च टाळणे
उद्याच्या खर्चाची  सहज
 बचतीने तरतूद करणे .

बचत येता कामास 
किती वाटते हायसे
आजची केलेली बचत
 खर्च-रक्कम काढते अनायसे.

 मुंग्या पहा ना कशा 
अन्न कण करतात गोळा
पावसाळ्यात पाणी सर्वत्र 
अन्न कोठारात करीती सोहळा

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद
२\८\२५

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

वृत्तबद्ध. . वृत लवंगलता गझल ८-८-८-४

गझल कार्यशाळा उपक्रम क्रमांक 4
वृत्त लवंगलता
मात्रा 8-8-8-4=28
रदीफ.. बाकी काही नाही 
अलामत --आ

 वृत्त ..लवंगलता 
8-8-8-4

 गुरू जनांच्या आधाराने बाकी काही नाही         
प्रयत्न केले आनंदाने  बाकी काही नाही. 

काय मिळाले  काय गमविले  हिशोब याचा बघता.
 सदैव जगलो व्यवहाराने बाकी काही नाही. 

मार्ग न दिसता निराश होणे माहित नाही मजला.
 मेहनतीच्या. (आत्मबळाच्या)  कर्तृत्वाने  बाकी काही नाही  

केंव्हा केले सत्कार्य कोणा माहित नाही 
जगा सांगतो अभिमानाने बाकी काही नाही 

गळता पाने बघवत नाही उजाड राने सारी
 आता नटली वैविध्याने बाकी काही नाही   

बोलआठवा गुरू जनांचे येतात सदा कामी
होते प्रगती संस्काराने बाकी काही नाही.


वैशाली वर्तक

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

गझल.....मंजुघोषावृत गझल (२)

मंजुधोषा वृत्त 
गालगागा गालगागा गालगागा


केवढा तो  कहर केला  भूल आहे 
आज माझी बोलण्याची  चूक  आहे 

मान्य करते कोण तेव्हा .आत आले
कोण होता  सांग मजला ठावूक आहे 


फार काही  छान घडले का कळेना
मी उगाची   का अशी   भावूक आहे 

गाव सारा झोपलेला गाढ रात्री 
मंद दीवा (दीपक )तेवता अंधूक आहे

कोण मागे मध्यरात्री खावयाला 
जाग येता बाळ बोले भूक आहे



मंजूघोषा वृत्त  सायबर क्राईम पेपरात ३\३\२६


वेळ माझ्या  जीवनाचा वाचते  मी   
हेच माझे सांगण्याला जागते मी

सोबतीने चालण्याची हौस माझी 
खूप आशा  बांधलेल्या  तोडते मी

अंतरीला लागलेले  शब्द सारे 
वेदनांना *काळजातच*  दाटते मी. 

  *खेळ मांडू* जीवनाचा सोबतीने. 
हेच माझे शब्द तुजला बोलते मी

चांदराती चालण्याची मौज वाटे  
चंद्र तारे यात नाते जोडते मी

वैशाली वर्तक


######################
 

 वृत मंजुघोषा

सांजवेळ 


नाम घ्यावे राघवाचे लाभ दायी
आत्मशांती  लाभणारे . सांजवेळी 

रोज लावू  सांजवाती मोद भारी वाटे
 हर्षदायी भासणारे  सांजवेळी 

 मंद समई  तेवणारी पाहताना 
 भाव सारे हर्षणारे सांजवेळी 

कष्ट सारे दूर होती ज्योत बघता
दीप ज्योती लावणारे सांजवेळी.      

राघवाचे गीत गाता वेळ झाली 
अंतरीचे भाव आले सांजवेळी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

जीवनातला सुखद क्षण

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित 
उपक्रम 
विषय. आयुष्यातला एक सुखद आठवण

एक सुखद आठवण
शोधणे काम कठीण 
मनाने आहे समाधानी 
सा-या  जीवनी दु:खच क्षीण

तरी आठवण करिता 
 मन धावले भुतकाळात
पहिले  राज्य तरणपदक
मिळविलेला क्षण आठवात 

पुढे क्षण सहजीवनाचे
जात आहेत सुखद
मनाजोगत्या सुखी जीवनी
उपभोगले आजी पद

सुखद क्षण दिले लेखणीने
आमंत्रित करून अ.भा सा संमेलनात 
लेखणी होता देखणी
निवृत्त काळ जातोय हर्षात.

तरी बृहन्महाराष्ट्र संमेलनात 
झालेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 
जीवनातला सुखद क्षण
करितो जीवन सदा हर्ष साकार

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

वृत्तबद्ध ... पादाकुलक वृत्त. 8). 1पहिली वही. पहिली कविता) 2क्षणाक्षणा3..4..पानगळ.

 
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प
आयोजित दोन दिवसीय उपक्रम 
9/2/26

(1)

विषय ...पहिली वही
पादाकुलक वृतांत


सहज काढला ,आवरायला
निवांतात खण ,फडताळाचा
हाती आली, रोज टिप्पणी 
हर्ष मिळाला, गतकाळाचा

उचलुनी वही, घेता हाती
भरभर टिपली , सारी पाने
दिसली मजला, माझी कविता 
वाचन केले, आनंदाने 

जागी झाली, जुनी आठवण
पहिली वाचक , होती आई
तिने  तोंड भर कौतुक केले 
तिला दावण्या माझी घाई.

  हसू  वाचुनी आता येते
लिहिली कैसी , मला कळेना
भाव मनीचे, कसे उतरले
अजून मजला, ते उमजेना 

नीट लावले  कपाट सारे
पण दिन सरला, आनंदाने 
 ताज्या झाल्या  आठवणी त्या 
उजळा दिधला् आवरण्याने..

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

(2 )

२९\१\२६
वृत्त..पादाकुलक
    क्षणा क्षणाने

 काळ पुरुष तर, चाले अविरत 
उषा आजची न येते परत

दिवस आजचा,संपेल क्षणी.     
गत काळाची, सय नको मनी

क्षण न पाहतो, रंक व राजा
कधीच न करी , गाजावाजा ,

सुखी क्षणांना , झणी लुटूया,
क्षण जो आला ,मौज करूया. 
 
 क्षण सरताची,उल्हासाचा 
तोची पुन्हा.  न परतण्याचा 

                  
निसटे वाळू,  . हातामधुनी
क्षणही सरतो  जीवनातुनी.               

दिवस आजचा,हा सोन्याचा 
विचारच नको,काल उद्याचा    


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


(3)

पादाकुलक

नाही भरवसा क्षणाचा      


 आहे अगदी खरेची कथन

 नसे भरवसा कधी क्षणाचा

 निसटते जशी  रेत   हातची

वेळ हा सरे आयुष्याचा


  येईल खचित  उद्या  दिवाकर

  शुभची सकाळ  करण्या  मंगल

   तोच आजचा सुख शांतीचा

आला क्षणची करण्या चंगळ


   दिन तर सरती   क्षणा क्षणाला 

   नको रहाया मनात आशा 

   नसे भरवसा कधी क्षणाचा

   नकोच पदरी उगी निराशा

  

देवे दिधला. जन्म  मानवी

विचार करण्या असेची मती

 बहाल करिता  मेंदू त्याने

वाढव आता कामात गती


   काळ हातचा क्षण भाग्याचा

 नको पहाणे वाट उद्याची

 गवसत नाही दुसरी संधी

ही खरी असे  रीत यशाची. 

वैशाली वर्तक


( 4..)

वृत्त पादाकुलक

(पद्मावर्तनी समजाति)

मात्रा८-८=१६


  शीर्षक.माझे मला कळेना



समोर दिसता  रोज टिप्पणी     

मनात आले विचार काही 

करून वंदन  सरस्वतीला

लिखाणास मन उत्सुक राही


 शब्द मनीचे  झरू लागले

 ओवत गेले  मी शब्दांना 

 सहज जाहली तयार कविता 

झरू लागता शब्द फुलांना.           


मलाच माझे नाही कळले

कशी प्रसवली मजला कविता 

पठण करूनी पुन्हा पाहिली 

जना भावली माझी रचिता 


देत चालना कल्पकतेला  

 नेहमी स्फुरे  पहा लेखणी.

छंदच जडला आता मजला

झरणी माझी  दिसे देखणी


विचार येता शब्द गुंफता

शब्दकार मी कशी जाहले

नित्य लिहीणे सराव घडिता.

मलाच माझे नाही कळले


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

 (5.)   शिव शंकरा


पादाकुलक

    शीर्षक.    शिव शंकरा

आज शंकरा ,  तव नामाचा
महिमा   गर्जे ,  मुखी निरंतर 
करूनी तुला   वंदन सारे
तुझिया नामें चालला गजर.     1

कैलासीचा,  असशी  राणा
जटेत गंगा , तूची धारी 
उमा पती तू ,त्रिनेत्र देवा
भव भय व ताप , दुःखे हारी.   2

भक्ती भावे, करण्या पूजन
देऊळी जन, झाले गोळा,
वाहण्यास तुज, त्रिदली पाने
अपूर्व भासे. आज सोहळा.        3. 

आला धावत उदधि मंथनी
तूची देवा , विष प्राशियले 
कंठ जाहला  , रंगे नीळा
नीळकंठची ,नाम जाहले.         4 

आवड तुजला, . नृत्य कलेची
तांडव नृत्यी , त्रिशूळ धारक.
संकट येता ,  तव भक्तावर
तूची त्यांचा होशी तारक.           5


वैशाली वर्तक 
अहमदाबा
 6.   पानगळ     पादाकुलक ८-८

ऐकू आली  सहजच कानी
 पानोपानी  हलके सळसळ
 शोभा गेली तरूलतांची
सुरु होताची पहा पानगळ

होता पाने   रंगे पिवळी
जागा देती हिरव्या पाना
नियमच असतो या सृष्टीचा 
होतच नाही   खेदची  मना.   


 घेता घेता गिरक्या पाने   
 पडती खाली जमीनीवरी
 मिळून जाती  मातीमध्ये 
 खत होवूनी  मग काम करी


शरदात पहा  दिसे  पानगळ
मरगळ भासे  तरू लतावरी
पाचोळ्याचा   पिवळा पिवळा
रंग सांडला  जणु भुमीवरी


ऋतुराज पहा वसंत येता.      
  सरली आता   सारी मरगळ 
   बहरती तरू परत नव्याने  
   विसरुन जाती   तरू पानगळ   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


****************************************
 ७). विषय कुटुंब 
कुटुंब माझा आधार 


कुटुंब नसते    चार जणांचे 
सहवासाने   लागतो लळा. 
स्नेहाचा अन,  प्रेमळतेचा
जीवलगांचा , गळ्याशी गळा                   

वळण शिस्त ती माय पित्याची
बाबा असती आधार खरा
भाऊ भगिनी   प्रेमळ नाते
ताई  वाटे  .प्रेम रुप झरा 

 खंबीर  सदा असती  भिंती 
स्नेह तर वसे , ठायीं ठायी    
साथ   देतसे  परस्परांना 
कुटुंब नांदे सुख सुख दायी

 नाती गोती कुटुंब  जपते
कुटुंब ताठा  तर  मनोमनी
हर्ष सदोदित तेची देते.         
मान वाढवी लोकात क्षणी

राहती सदा  एकजूटीने
विचार स्वार्थी  नसे कदापी 
 सुखीच राहो सर्व कुटुंबी
आळविती  जन ही आलापी


8) श्रावण मास 

श्रावण मास 
पादाकुलक वृत 
मात्रा 8-8


आला महिना नाचत गाजत
उधाण *आले* उत्साहाला 
असे सणांचा श्रावण महिना 
*उरे न* सीमा आनंदाला 

सण तो पहिला  *अवस दिव्याची*
पूजन  करूया  दिव्यादिव्याचे 
*तमा सारुनी प्रदीप्त  करिते*
भाव दाविण्या *कृतकृत्याचे*

नागपंचमी कृष्ण सोहळा 
सारे येती श्रावणमासी 
श्रावण महिना भावे सर्वां 
*असे* सणांचा *मास विलासी*
                             
*सखा भेटता राजा वरूण* 
हिरवाई ने वसुधा सजली
शेला हिरवा पांघरलेली 
हर्ष भरे  जणु नवरी नटली

गरजत बरसत या मेघानो 
नकोच नुसती गर्दी गगनी 
गडगड करिता बरसा सारे
वेळ शिवारी *देते धरणी*

काळे काळे ढग आकाशी 
कृष्ण मेघ ते करित गर्जना
झाली घाई तया बरसण्या 
रेघ दामिनी असे दर्शना






Count बरोबर आहे, गेयता वाढण्यासाठी, आणि एक काळ maintain करण्यासाठी...काही शब्द बदलले

वृत्तबध्द 
वृत्त : पादाकुलक
मात्रा : 8-8
शीर्षक :  शिव शंकरा

रोज शंकरा, तव नामाचा
महिमा गर्जे, मुखी निरंतर 
*करून तुजला* ,वंदन सारे
*जय जय शंकर, करीती  गजर*    1

कैलासीचा, एक तू  राणा
जटेत गंगे, *चा नजराणा* 
उमा पती तू ,त्रिनेत्र देवा
*दुःख हारितो, हा तव बाणा*   2

भक्ती भावे, करण्या पूजन
*जन देऊळी*,होती गोळा,
तुला वाहुनी, त्रिदली पाने
अपूर्व भासे, *पूज्य सोहळा*.        3. 

*तत्क्षण धावत* उदधि मंथनी
तूची देवा , *गरळ प्राशले*
कंठ जाहला, *रंगून नीळा*
नीळकंठची ,नाम जाहले.         4 

आवड तुजला,  नृत्य कलेची
*तांडव रचितो* , त्रिशूळ धारक.
संकट येता, तव भक्तावर
तूच तयांचा, होतो तारक.           5


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भग्नावशेष आठोळी रचना

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत 
आंबोळी साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी 
दि ८\२\२६

विषय .. भग्नावशेष 
शीर्षक..जपणुक संस्कृती 

उत्खलनात  मिळतात 
भग्नावशेष अनेक मूर्ती 
ज्यामुळे  सहज कळते
त्याकाळची संस्कृती 

पुरातन वस्तू संशोधन 
यांचा असतो हाच ध्यास 
करिते नेमकं हेच काम 
  शोधून काढणे  जुना इतिहास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

वृत्तबध्द. वृत्त आनंद कंद देव पाहिला (कविता )

देवास पाहण्याची ,होती मनात इच्छा 
 बाल्यास हासताना , पाहून पूर्ण मनीच्छा

देता भुखी जनाला, खाण्यास अन्न पाणी 
हासून पाहिलेला   होताच चक्रपाणी .

 येता नभी दिवाकर , होते नवीच ऊषा
घडते दर्शन त्याचे, देतो नव्याच आशा


फुलती कळी पहाता, गंधाळली क्षणाते.    
भरिला  सुगंध पुष्पें,  किमया दिसे मनाते


तोची असे  सुरेश,  सृष्टीत भेट घडते
सारीच जादु त्याची, दिनरात  नित्य करते.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

मी कोण कविता

मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय...मी कोण 

मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा

आहेत साहित्य समूह अनेक 
जतन करण्या मायबोली 
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी 

होते खरी तरणपटू, बेंकर 
निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा


अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 
 भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २५ जानेवारी, २०२६

लेख. स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

विषय---  स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

अगदी बरोबर कथन आहे . जो पर्यंत  आपण आपले विचार मांडत नाही तोवर समोरच्यास कळणार कसे. ? आपल्या मनात काय विचार  आहेत ते. विचार  सांगणे ..बोलणे ..नीट सविस्तर  सांगणे गरजेचेच असते .सगळेच काही मन कवडे नसतात की आपल्या मनातील शब्द न् शब्द जाणून घेतील.
       घरात ठीक आहे .आपले भाव, जाणतील....भावना जाणतील . ...आपला जोडीदार  सहवासाने  आपली मते  मनाचे विचार  जाणेल .पण ते काही हद्दे पर्यंत.  मग तर शब्दांची ..वाच्यतेची गरज ही कुठेही .कुठल्या ही क्षेत्रात  असतेच.
       आपण व्यक्त झालो तरच आपला विषय ..आपली मते..आपले मार्गदर्शन 
व्यक्त होऊनच सांगू  शकतो. आपली मते पटविण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे ठरते. 
हो! व्यक्तता वाचाळ ,.बडबड नसावी की ज्यामुळे समोरच्याला ऐकण्यात रस च रहाणार नाही. मुद्दे सुद व्यक्त  झाले पाहिजे. 
        यथा योग्य व्यक्त होणे.. वाच्यता करणे महत्वाचे आहे. नाहीतर वेळ टळून जाता मग बोलणे कवडी मोलाचे ठरते. आणि मग आपल्यावर रडण्याची म्हणजे,
अरे ! हे तर मला माहित  होते, पण.......  माझे बोलणे व्यक्त होणे राहिले. असे होता कामा नाही. 
         वकील डाॕक्टर यांच्या समोर तर व्यक्त होणे अत्यंत गरजेचे. न व्यक्त  होता त्यांना आजार कसा कळणार . म्हणून तर लहान बालक आजारी होतात त्यांचे डाॕ.
वेगळे असतात. कारण बालक बाळ व्यक्त होऊ शकत नाही . आणि म्हणून तर म्हणतात  की, डॉक्टर व वकील यांच्या शी नीट खरे खरे व्यक्त व्हा.  
         व्यक्त नुसते बोलूनच नाही तर सारे आपण सारस्वत  आपल्या लेखणीतून व्यक्त होतो. आपले मनीचे गुज लिखाणातून मांडतो.व आम जनते समोर व्यक्त होतो. या व्यक्ततेचे  म्हणजे स्वतः ची मते प्रदर्शित करणे आहे. याचा समाजास पण फायदा होतो. आता नाही का !कोरोना  काळात  लाॕकडाऊन काळात लिखाणातून बरेच संदेश देऊन व्यक्त झालोत. जन जागृती केली . पोलीस  संरक्षक तसेच 
परिचारिका,  डाॕक्टर,  सफाई कामगारांची स्तुती सुमने शब्दातून  उधळून लेखणी व्दारे व्यक्त झालो त.    तर व्यक्त होणे स्वतःचे  व्यक्तव्य करणे  फायदेशीर असतेच. 
    तसेच स्वतः व्यक्त झाल्याने शरीरास पण फायदेशीर  असते. मनातल्या मनात  विचाराने कुढत बसणे ..दुस-यास न सांगता गप्प रहाणे याचा मनावर पण परिणाम होतो .स्वभावावर परिणाम होतो. मनावर ताण येऊन शरीरास हानी पोहचू शकते. 
स्वातंत्र्य वीर व्यक्त झाले नसते तर स्वातंत्र्य  कसे प्राप्त झाले असते. संतांनी व्यक्त होऊन आपल्यास सुखी जीवनाची अध्यात्मक वाटचाल कशी करवली असती.
    जीवनाचे सार  गीतेचा   बोध.. जो  कृष्णाकडून  मिळाला .. तो व्यक्तच झाला नसता तर  कसा जगताला मिळाला असता. 

.....वैशाली वर्तक

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

नजर

सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली    लाडिक बट 
भावली तुझी अदा क्षणात

लागले   जीवास वेड   
सतत तुजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे

 असे. नजर कटाक्ष 
प्रेमाची एक ती भाषा
भाव मनीचे उमजण्या
वसे मनात   आशा

करी नजरेने घायाळ 
खेळ चालता प्रेम रंगी
उमलती भावना हृदयी
प्रेमिकांच्या अंतरंगी

 पहाता सकाळी हरीच्या 
नजरेतले प्रेमळ भाव
 जातो दिवस सुखाचा 
कसा गेला नसे ठाव

वैशाली वर्तक 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

ती न संपणारी कविता

शब्द रजनी साहित्य समूह 
विषय ..ती एक न संपणारी कविता 
21/1/26

आहे खरच तू अशी
सदा  चाले अविरत 
नसे ठावुक थांबणे 
धावे सदा अखंडित 

 शांत बसता उपवनी 
 पाहूनी पर्णे डोलती 
 भासती जणु मनात 
हर्षे टाळ्या वाजवती.

सवय जडली अंतरंगी 
 करु सदा शब्दाविष्कार
हर क्षणी देती उपमा
भाषेतील शब्दालंकार


 विषयाची नुरते गरज
 वेळ प्रसंग देती विषय
शब्दांना गुंफता काव्यात 
लक्षात घेतेच आशय


नाते जडले लेखणीशी 
झालेय जीवन कविता 
 करण्या तिज अजून देखणी 
राहो ती सदा प्रवाहिता

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
21/1/26

रविवार, १८ जानेवारी, २०२६

खेळ

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

17/1/26

विषय.. खेळ

   


खेळ म्हणता आठवे

दिन ते बालपणीचे 

कधी सांजवेळ होता  

घरी जाणे नावडीचे


किती ते खेळ असती

 खोखो कबड्डी  लंगडी

शारीरिक ऊर्जा देई 

एकत्र होता सवंगडी


 होते शरीर सौष्ठव 

शिकवण देती खेळ

द्यावी साथ एकमेका

जमवाया हवा मेळ


पत्ते सापशिडी गोटया

असती बैठकी   खेळ 

सारे खेळ खेळण्यात

मजेत जातो ची वेळ 


जीवनात  महत्त्वाचे

स्थान असे खरोखर 

खेळ खेळत जगावे

मोद मिळे निरंतर 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

विविधा वर्धापन दिनानिमित्त

 चिरंतर राहो विविधा 


दिन असे आनंदाचा

करु साजरा मिळूनी

देउ  विविधेस शुभेच्छा

आनंदाने  काव्यातूनी



विविधा आलीय यौवनात 

भासे जणु  नव तरूणी 

नाव तिचं घेता ओठी

 शोधण्या नसे कुठेच उणी



तिचाच समूह  तो *सांगते ऐका*

व्यक्त होतात  सख्या बोलून

कल्पना शक्तीला मिळे चालना

वकृत्व गुणास  देतो उजळून 


*अभिव्यक्ती* दुजा आणिक

जिथे होते  गुणांचे दर्शन

गायन, वाचन ,संस्कृती जतन

विविध रंगी कला प्रदर्शन 


*Only विविधा मिटींग* समूह 

पहा    ते शिस्तबद्ध आयोजन 

 देतो कार्यक्रमाच्या सूचना 

 गुणगान गातात *विविधाचे* जन

 


आज  तिच्या वर्धापन दिनी 

किती गाऊ गुण गान

झालीय विख्यात अहमदाबादमधे

वैविध्यपूर्णतेत तिजला मान




वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

3/1/26


मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...