रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

वृत्त बद्ध मनोरमावृत. 2||(१)चाहुल गणेशाची. २ निरोप गणपतीला

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

आयोजित सराव लेखन 

वृत्त मनोरमा

लगावली.  गालगागा गालगागा 

चाहूल गणपती ची

###############


गणपती येणार वदता

खास यंदा गणपतीची 

कोणती आरास घ्यावी

 वेळ होते ठरविण्याचे


मोद वाटे सर्व लोकां

वाट पाही  आतुरीने.   

सामग्री ही आणलेली.   ,

नीट पाही जाणिवेने


होत आली वेळ आता

धीर माझा   राहवेना

वाट पाही लोचनेती

वेळ आता काढवेना


टाळ झांजा खास आहे

आरतीला वाजवूया

भक्ति भावे गात भजने

रात्र सारी जागवूया 


तूच येतो सर्व काळी 

संकटाशी झुंज द्याया

बोलताती दु:खहर्ता 

तूच माझा देव राया


भक्त येती दर्शनाला

सोहळा तो मोद कारी               

हर्ष भासे तूच येता

 भास तव हा हर्षभारी.                       


मोरयाचा नाद येतो

ऐकण्यासी तोच कानी

श्रीगणेशा पूजताना

गात राहू गोड गाणी

वैशाली वर्तक



मोहरली लेखणी साहित्य समूह 

विषय.      निरोप 

*********************

वृत्त मनोरमा

लगावली.  . गालगागा गालगागा 

 

रोज रात्री आरतीला

मोद वाटे सोहळ्याचा

टाळ झांजा घेत हाती 

घोष चाले गणपतीचा


आजच्या त्या आरतीला

आल पाणी  लोचनांना 

कंठ भारी दाटलेला

नाम त्याचे गर्जताना


ठेवताना ती शिदोरी

मोरयाचा नाद चाले              

आपुल्या सदनी निघाले

आज  ओठी. शब्द आले. 


मखर वाटे ते फिके हो

सदनही वाटे भकास

धूप दीपक मंद झाले

जन मनाने ती उदास 


नाव घेता गणपतीचे

दु:ख. क्षणी  दाटलेले

जड मनाने परतले जन

नयन ते पाणावलेले


  वैशाली वर्तक 

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...