मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

तो राजहंस एक

तो एक राजहंस

  जगी विहरती बरीच पाखरे
 काही असती रूपाली मोहक
  करी तयांचे सदाच कौतुक
  तर काही साधी, न चित्त वेधक
        पण प्रत्येकात असते एक
         काही तरी  विशेष चमक
         करुन जगा  दाखविण्याची
        सदैव   वसते अंगी धमक
असेच चालते जगी या
 न बाळगता कधी निराशा
पुढे आक्रमिता मार्ग
दिसे वेगळी यशाची दिशा
          असाच तो होता राजहांस
          न कळलेच त्याचे कुणाला
           घेता उंच  भरारी जीवनी
           यशाच्या शिखरी बसविले तयाला

वैशाली वर्तक

   
     

जगाचा विचार कशाला

जगाचा विचार कशाला
1
    देवाने बहाल केला मेंदू
    विचार शक्ती करायाला
     जगावे आपल्या  मताने
    जगाचा विचार  कशाला

2
         केले जे मनी रुचले
        विचारले  स्व मनाला
       विचार  स्वातंत्र्याने जगले
        जगाचा विचार  कशाला

3      जगावे आनंदाने सप्त सुरांत
        असावे जीवन  संगीत
        जगाचा विचार  कशाला
        मस्त  बनवा जीवन रंगीत

4
        व्यथा असो आनंद
        प्रकाश  असो तिमीर
        जगाचा विचार कशाला
        बिनधास्त जगावे बेफिकीर

      वैशाली वर्तक   7/1/2020
        

माती व (ओवी ) घर

माती  ( ओवी)
तूची देते माय माती
अन्न पाणी जगताला
तव कृपेने पोषिते
सर्व ची प्राणीमात्राला

तुज करितो नमन
पद स्पर्शण्या तुजला
अनंत ऋण हे तुझे
कर क्षमा तू मजला

माती नसे सदा काळी
असे ती विविध रंगात
परि गुण हा मायेचा
वसे तो अंतरंगात

  जन्मतो वाढतो आम्ही
  सदा  तुझ्याच कुशीत
   तुची भरवीशी प्रेमे
   घास कवेत खुशीत

जरी स्पर्शतो तिजला
नेमाने आपण नित्य
 असे अंत  या मातीत
हेच जीवनाचे सत्य

वैशाली वर्तक

आजचा उपक्रम
ओवी

घर सुखाचे आगर
वाहे आनंदी  घागर
भासे  सुखाचा सागर
माझे घरकुल ते

सदा दारी कौतुकाने
सर्वांना ते आदराने
करी प्रेमे स्वागताने
जन पाहुणचार

दारी मंगल रांगोळी
लावियल्या दीप ओळी
रेखियल्या शुभ ओळी
मुलांच्या भविष्याच्या

वैशाली वर्तक





सोमवार, १३ जानेवारी, २०२०

चित्र काव्य. नका खुडू कलिका


चित्र 
आजचा उपक्रम
चित्र काव्य

लागता चाहुल मुलीची
होऊ नकोस ग कष्टी
येऊ द्या मला जन्मास
बघायला ही जीवन सृष्टी 

काय दोष मुलींचा
असता आम्ही कलिका
जाण ठेवा अस्तित्वाची
कशी चालेल  समाज मालिका

जरी नसली वंश दिवा
शिकून दाखवीन मम कर्तृत्व 
तुझ्या  प्रेमाची ठेवून जाण
सदा पटवीन स्त्री चे महत्त्व 

नको घाबरु या जगाला
करा विचार पक्का मनी
येउ दे मला जन्माला 
राहीन मी सदा ऋणी

वैशाली वर्तक  13/1/2020



विषय..काय केला गुन्हा

*नका खुडून कलिका्*

लागता चाहुल मुलीची
होऊ नकोस ग कष्टी
येऊ द्या मला जन्मास
बघायला ही जीवन सृष्टी 


*काय माझा गुन्हा*
असता आपण कलिका
जाण ठेवा अस्तित्वाची
कशी चालेल समाज मालिका

विविध रुपात दिसते नारी
आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
 सदा वाहे ममता हृदयातूनी
 सर्वच रुपातील *ती* वाटे हवी हवीशी

जरी नसली मी वंश दिवा
शिकून दाखवीन मम कर्तृत्व 
तुझ्या प्रेमाची ठेवून जाण
सदा पटवीन स्त्री चे महत्त्व 

नको घाबरु या जगाला
कर विचार पक्का मनी
येउ दे मला जन्माला 
राहीन मी सदा ऋणी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



जेव्हा लेखणी बोलते

जेव्हा लेखणी बोलते    चारोळी

 1 लेखणी जेव्हा बोलते
     मनीचे गुज कळते
      शब्द न बोलता
      भाव अंतरीचे वदते

2 शब्दांना करिते बोलते
   भावना दाखविते सहज
    बोलता लेखणी तर
    उच्चाराची नसते गरज

3  लिखाणातून  जपते  संस्कृती
    घडविते  इतिहास  नवा
     लेखणी जेव्हा  बोलते
    लेखणीचा छंद सदा हवा

4   जेहा लेखणी बोलते
      वठविते दृश्य प्रसंग
     वाटे जणु आपणही
      आहोत तयांच्या संग

   वैशाली वर्तक 

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...