शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

मी देव पाहिला

अभा म सा प डोंबिंवली समुह 02
उपक्रम 
विषय -- मी देव पाहीला

मी देव पाहिला


 हास्य  बाल्याचे निरागस 
 किती खळाळून हसे 
वाहे जसा झरा झुळुझुळु
वेगळे देवरुप काय असे

नित नियमित येता रवी
सुनील सुंदर  नभात
देव रुपाची देतो  सय
होते  रोजच प्रभात

सदा करावे सत्कर्म
देव वसतो कर्मात
तेथे पहिला देव मी
देव नसे देव्हा-यात


देता गरीबास अन्न ,
 दोन आपुलेच कवळ   
 हसताना पाहिला हसला 
 आला असता जवळ 

कळी पहा उमलली
   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना 
उषा हसत लाजली   


सारी देवाची  करणी  
घडवितो दिनरात
देव पहाते मी फुलात
शोधा तया निसर्गात 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विचारांचे झाड

 भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जळगाव

आयोजित उपक्रम

२५\१\२३

विषय ..विचारांचे झाड



अंकुरावे  विचारांचे

झाड मम अंगणात

किती  होईल चांगलं

उपयोगी लिखणात


झाडांची तोडातो फुले

 तसे खुडेल मी विचार 

देता विषय समूही

क्षणात मम कविता तयार



मुलांना हवे झाड खाऊचे 

हवा तो खाऊ मिळण्या आशेवर

तसे नको कष्ट विचारांचे

विचार दिसतील झाडावर


असे गंमतीचे विचार

आले माझिया मनात

पण रचली  ना कविता

काही तरी विचारात


वैशाली वर्तक

 अहमदाबाद

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

पंचाक्षरी शब्द ... शब्दाविष्कार



शब्द

पंचाक्षरी


शब्दा वाचुनी

साहित्य  नसे 

मनोरंजन

होणार कसे          1


शब्द गुंफता

होते कविता

सदा वहावी

शब्द सरिता         2


जपा शब्दांना

नको ते व्यर्थ 

उचित हवे

तयांचे अर्थ         3


झरता शब्द

मिळते ज्ञान

दूर सारिते

सदा अज्ञान         4

     


स्तुती  करण्या

शब्दची कामी

काम साधण्या 

युक्ती  ती नामी       5


 न लागे पैका 

 गोड शब्दाला

 नका कंजुस

 त्या वचनाला         6


कटु शब्दांनी

मन दुःखते

गोड वाणीने

ते सुखावते               7


उमजे भाव

शब्दांनी असे

नसता शब्द

संवाद कसे             8


वैशाली वर्तक










आजचा शब्द

साहित्यात एकंदर

खेळ असे तो शब्दांचा

पूर येतो कल्पनेला

पसारा तो विचारांचा


शब्द भंडार हवाच

रचताना  काव्यओळी

छंद वृत्त यमक ही

हवे मनी सदाकाळी


गद्य पद्य वांडमयाचे

असं किती ते प्रकार

कोटी करिता शब्दांची

होई साहित्य साकार


जुळवूनी शब्द शब्द

होते तयार लिखाण

असो मग ते गद्य पद्य 

शब्दांचीच असे खाण


मुल्य सर्वदा शब्दांचे

जाणे शब्द शिल्पकार

शब्द ओविता उचित

करी तो शब्दाविष्कार


भाषा नटविण्या हवे

शब्दांवर ते प्रभुत्व

खेळ शब्दांचा मांडता

कळे शब्दांचे महत्व






करु वर्षाव शुभेच्छांचा

वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई, आयोजित शिवशक्ती काव्यलेखन स्पर्धा
स्पर्धेसाठी
प्रथम वर्धापन दिनानिमित्त
विषय ...आज फुलला सोहळा
शीर्षक,....  *करु शुभेच्छांचा वर्षाव*


रोजच असे जीवनी सोहळा
तयात आज दिन  वर्धापन 
वर्ल्ड व्हिजन समूहाचे
झाले आनंदाने पुलकित  मन

न भेटता कोणी प्रत्यक्षात
लेखणीच्या साहाय्याने सारे
सहज सांगती, विचार मनीचे. 
जुळले नाते साहित्याचे न्यारे 

नवनवीन विषय मिळता
देवी सरस्वतीला स्मरती 
घेत तिचे आशीर्वाद सदा
माय मराठीची सेवा करती

गद्य ,पद्य, ललित लेखन
साहित्याची  उघडतात  दालन
स्फुर्ती मिळते सारस्वतांना
*वर्ल्ड व्हिजन समूह*  ठरे कारण

लेखणी सखी व शब्द सख्याने
आज समूहात फुलला सोहळा
शुभेच्छांचा करण्या वर्षाव
सारस्वत होणारच  ना गोळा?


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
३०\८\२३

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...