सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

आनंद कंद. वृत्त विषय कविता

वर्ल्ड व्हिजन टाईम्स मध्ये 


वृत्त बध्द काव्यलेखन 
वृत्त  आनंद कंद 
लगावली गागाल गालगागा गागाल गालगागा
   विषय ...कविता 
  शीर्षक. प्रेम कवितेशी

दैनंदिनी पहाता,आले विचार ओठी.  
ओवीत शब्द माळा, कविता तयार मोठी.   

झरतात शब्द जेव्हा,वाहे अखंड सरिता.
माझ्या कवी मनाची, भावे जनास कविता.

बेधुंद होत मन हे, येताच  शब्द हाती
सुचता विचार धारा,  ओंजळ  भरुन जाती.

पाहून डोलणारी ,वा-या सवे  फुले ती,
रेखाटता सहजची , आनंदली मुले ती.

देते कधी सुवचने, सारून ती निराशा.
संबोधते./ जनांना , उजळेल आज आशा

दावीतसे अबोला ,का तू कधी रुसूनी 
यमके न साथ देती ,बसतेस तू फुगूनी,

माझे मला कळाले, करिताच नित्य   वाचन   
स्फूरेल काव्य मजला, नियमित करीन  लेखन


वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...