मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

चित्र काव्य


 झटुनिया करू यत्न

टाकुया प्रगतीचे पाऊल

उजळवू ज्ञान ज्योती 

लागेल यशाची चाहुल


साथ देत एकमेकांस

चला जाऊया शिखरी 

ज्ञान दीप उजळविण्याची

आस हवीच अंतरी.


खचू नका ,भिऊ नका

असेच सदाची जायचे

शेताची कितीही संकटे

क्षणभर न डगमगायचे.


मनी करिता निश्चय 

यश मेरू येईल समीप

जुळता वात ज्ञानाची 

देईल प्रकाश ज्ञान दीप 



वैशाली वर्तक 

 अहमदाबाद

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

प्रतिनीधी चे विचार


आभाळाला स्पर्शताना

#################

असो आभाळ उत्तुंग
  मन देत असता उभारी.
आशा   मनात  यशाची.
घ्यावी बिनधास्त भरारी.

करा बळ एकवटून यत्न
असता आपण बलवंत
मनच देते वेळोवेळी  ग्वाही
होणार आपण यशवंत

होता अपेक्षा पूर्तता
आभाळाला स्पर्शण्याचा
होईल  मनी आभास
क्षण असेल आनंदाचा


काळाच्या पुढच पाऊल 

###################

घेणे उद्याचा अंदाज
असे गोष्ट योग्यच
जेणे करून जीवन
जगण्या होतो सुसज्ज

जग झालय प्रगतीशील
आयोजन चाले भविष्याचे
जगता वर्तमान  काळात
जेणे करुन जगणं होते आनंदाचे.

काळाच्या पुढच पाऊल
टाकावी लागतात सदा
तहान लागता विहीर खणणे
नसेची  योग्य  कदा

साधी मुंगी  किटक पहा
करत असते काम अविरत
पाऊस पडला तरी त्यांचे
कोठार भरलेलं सदोदित

वैशाली वर्तक


चित्र काव्य

 झटुनिया करू यत्न टाकुया प्रगतीचे पाऊल उजळवू ज्ञान ज्योती  लागेल यशाची चाहुल साथ देत एकमेकांस चला जाऊया शिखरी  ज्ञान दीप उजळविण्याची आस हवीच...