बुधवार, १५ जुलै, २०२०

बाल कविता.. चल पावसात भिजू. . नदी

यारिया साहित्य  कला
अष्टाक्षरी बाल कविता
विषय- चल पावसात भिजू

शीर्षक- हौस भिजण्याची

चला पावसात भिजू
झेलू पावसाचे पाणी
भिजण्याची  मजा न्यारी
खेळू नाचू गाऊ गाणी

पावसात भिजण्याची
 पूरी करु आज हौस
सरीवर सरी येती
आला रे मोठा पाऊस

नभी गडगडे ढग
मधे वीज चमकते
नका घाबरु वीजेला
बघ म्हातारी दळते

फाडा वहीची ती पाने
करु कागदाच्या  होड्या
सोडू पाण्यात  तयांना
मस्ती करु ,थोड्या खोड्या

पहा पागोळ्या पडती
भरु    थेंब ओंजळीत
फेकू अंगावर  पाणी
मजा येते पावसात

वैशाली वर्तक


बाल कविता.  नदी

नादी

आनंददायी


किती  लांबून आलीस 

नाही का तू थकत

बस ना घटकाभर

कशी येते धावत


येता तुझ्या  जवळ

वाटे प्रसन्न  मनाला

किती डुंबतो पाण्यात

स्फूर्ती  देतेस तनाला


किती वेळ घालवावा

 येऊन तुझ्या  कुशीत

 समाधान  मिळवण्या

येती सारे जन   खुशीत


बदक मासे बगळे

सारे रमतात जलात

पाहून वाटे आनंद

आम्हा मुलांना मनात


येता पावसाळा

घेते तू रौद्र रूप

भासे जणु नागीण

भय वाटे तेव्हा खूप 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...