यारिया साहित्य कला आयोजित
चित्र प्राणु चाराक्षरी
स्पर्धेसाठी
चित्र आधारित चाराक्षरी
मंत्र मुग्ध
झाले क्षण
एकरुपी
अंतर्मन..
एक चित्त
निरंतर
नसे जीवा
ते अंतर..
सात्विकता
मुखावर
पहा कशी
क्षणभर..
कृष्णा सवे
येता क्षणी
सुखावली
राधा मनी..
जीवा लागे
एक छंद
मिळे सदा
स्वर्गानंद..
मिटलेल्या
नयनात
कृष्ण छबी
अंतरात..
जळी स्थळी
तीज मात्र
दिसे कृष्ण
एकमात्र..
मन तिचे
सुखावले
पहा कसे
विसावले..
वैशाली वर्तक
चाराक्षरी
स्पर्धेसाठी
विषय- राधा कृष्ण
जळी स्थळी
तीज मात्र
दिसे कृष्ण
एकमात्र
जीवा लागे
एक छंद
तिला मिळे
स्वर्गानंद
कृष्णा सवे
येता क्षणी
सुखावते
राधामनी
त्या राधेच्या
चिंतनात
कृष्ण नाद
कंकणात
नको नेऊ
मथुरेस
तू आक्रुरा
श्रीकृष्णास
विनवते
ती राधिका
कोसताती
त्या गोपिका
कैसे कंठु
एक दिन
तुजवीण
जीव क्षीण
वेड लावे
तो मुरारी
राधा भोळी
ती बावरी
प्रेमभक्ती
चे प्रतिक
प्रेम त्यांचे
ते सात्त्विक
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुजरात
स्वप्न गंध साहित्य समुह
विषय..कृष्णाची विविध रुपे
शीर्षक.. कृष्ण लीला वरुन नावे
प्रकार चाराक्षरी
सोड वाट
"नंदलाला"
जाऊ दे ना
बाजाराला.
सोड "कृष्णा "
तू ओढणी
आल्या बघ
गवळणी
"बंसीधर"
वृंदावनी
वेणु वाजे
रानी वनी
नाव तुझे
रे "माधवा"
राही मुखी
तो गोडवा
यशोदेचा
"घननीळा"
वाटे तिला
लडिवाळा
वाजविता
वेणु "कान्हा"
गाईनांही
फुटे पान्हा
खेळ चाले
चेंडू फळी
"घनश्याम"
नील जळी
"राधेश्याम"
काढी खोडी
दुभत्याचे
माठ फोडी.
रास लीला
गोपी संग
रणछोड
त्यात दंग
विश्वरुप
पाही मैया
दाखविता
तो "कन्हैया"
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा