जंगल सफारीत जाऊ चला
कुतुहल मनी प्राण्यांचे तुला
समोर पहा हे वानर प्राणी
खात आहे सारे मानवा वाणी
देताच पोळी घेऊन पळाला
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला
हरीणाची जोडी आली धावत
बसले दोघे गवत चावत
भित्रट चपळ धावूनी गेला
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला
अक्राळ विक्राळ हा ऐटदार
सिंह गर्जना त्याची जोरदार
आली ती डरकाळी ऐकायला
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला
पक्षी सरपटणारे हे प्राणी
पहातच हिंडलो गात गाणी
गंमत वाटली, आनंद झाला
कुतूहल मनी प्राण्यांचे तुला
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा