बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

विश्व लेखकांचे. . पत्र लेखन

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित उपक्रम                                                                         
पत्र लेखन 

                                                                                ‌‌.   दि 17/10/49

प्रिय सखी
 रोज रोज साहित्यिक समूहावर लिहीता लिहीता आपली ओळख झाली. तू व मी
आपण दोघी नियमित लेखन करता करता....  आधी तू कुठली...अर्थात आपल्या नावाखाली शहराचे ठिकाण लिहीलेले असायचेच त्यामुळे कुठल्या गावची हा प्रश्न नसायचा.  पण समूहावर घेतलेल्या स्पर्धेत नंबर आल्यावर एकमेकींना अभिनंदन 
आधी समूहावर मग व्यक्तीगत सुरू झाले.
      असे करत आपले व्यक्तिगत बोलणे वाढत गेले. एकमेकांनी काय नवीन लिहीले याची विचारणा सुरू झाली.  तसेच समूहावर दिलेल्या विषयावर विचार 
करणे. विषया लगत बोलणे सुरू झाले. लेखनाच्या कोणत्या प्रकारात  विशेष आवडी व त्यावर   सहज विचार  आपण देवाण घेवाण करु लागल़ो.
     तसेच कौटुंबिक पण विचारणा सुरु झाली. तुझ्या घरी कोण कोण असते. मुले किती ,  हो आपला काळ त्यामुळे ( 2/3 मुले सहज )नातवंडे कोण कोण वगैरे ची विचारपूस होऊ लागली. असे करता करता एकमेकांना कौंटुबिक माहिती पण झाली. . लेखना शिवाय इतर आवडीची  सहजच विचारणा पेक्षा  वैचारिक देवाणघेवाण होऊ लागली व सम वयस्क तसेच आवडी निवडी यांच्यामुळे मग तुम्ही चे तू,.. तुझेत  कधी परिवर्तन झाले कळलेच नाही, आता दोन देखण्या लेखण्या ..कधी जीवलग  सख्या झाल्या  आहोत.
         साहित्य संमेलनात नित्य नेमाने आपण भेटतो. मी जरा महाराष्ट्रा बाहेर रहात असल्याने प्रत्येक वेळी संमेलनात येणे होतैच असे नाही . पण होईल तितके मी येण्याचा प्रयत्न करते. 
          एकमेकांना मधूनमधून वेळात वेळ काढून भेटण्यास आतुर असतो. अशी आपली लेखणी मैत्री मात्र  लेखणी द्वारा चालूच रहाते.
          समूहावर  नवीन  काव्य प्रकार  शिकविता तू पण तितकाच उत्साह  दाखविते व लगेच प्रयत्न करते.आपली हीच आवड आपली मैत्री घट्ट करण्यात
कारणीभूत ठरते. 
          बाकी काय सांगू तुला. मी  सध्या सिंगापूर मधे पण आपण दोघींनी शब्द साजच्या कविसंमेलनात नाव दिली होती. व त्या संमेलनात आपण दोघींनी सहभागी होऊन आपापल्या रचना सुंदर रित्या सादर केल्या व या वैज्ञानिक टेक्नॉलॉजी ने पुन्हा एकमेकांना भेटून आपापल्या व सहज इतरांच्या काव्य रचनेचा आस्वाद घेतला. खरच छान वाटले.
   असो तुझ्या सासू व सासरे यांना सआदर नमस्कार 
व    तुझ्या अहोंना पण सविनय प्रणाम व छोट्या कंपनीनं ना अनेक आशीर्वाद.
तूझी प्रिय सखी

वैशाली वर्तक

विश्व लेखकांचे. . पत्र लेखन

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित उपक्रम                                                                          पत्र लेखन                 ...