रचियता साहित्य मंचआयोजित
भव्य चौरंगी महा काव्य स्पर्धा - २०२०
स्पर्धेसाठी ११/७/२०२०
विषय- बीज अंकुरे अंकुरे
बरसता वर्षा धारा
रान झाल ओल चिंब
थेंब मुरता मातीत
ऊभारुन आले कोंब
कोंबातून डोकवती
ईवलीशी दोन पान
वा-यासंगे देती टाळी
गात समृध्दीचे गान
बीजे अंकुरे अंकुरे
छोटी झाली पहा रोप
नभाकडे पहाताती
देण्या शिवारा निरोप
शेते हिरवी दिसती
किती पहा ती रेखीव
जणु रेखाटल्या कोणी
ओळी हिरव्या आखीव
दिसे सर्वत्र हिरवे
जणु पाचू पसरले
बळी राजा सुखावला
मन प्रसन्न जाहले
वैशाली अविनाश वर्तक
वैशाली अविनाश वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद
गुजरात स्टेट
8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा