बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६

हरवतो वर्तमान काळ

मौहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 
उपक्रम क्रमांक १६५१
दि२८\१०\२६
आपण कोणीच आजकाल आताच्या काळात जगू शकत नाही, भविष्याची चिंता किंवा किंवा स्वप्न व भूतकाळ त्या सावल्या यात वर्तमानाकाळ हरवून जातो.


भुतकाळ असे मार्गदर्शक 
प्रातकाळ करण्यात कष्ट 
उज्वल व्हावे भविष्य 
वर्तमानात रहातो व्यस्त 

कितीही जरी म्हटले, 
नको उद्याची चिंता,
मन बसत नाही स्वस्थ
करी उद्याची भ्रांता.

वय सरता येते अंगी
सहज वृत्ती समाधान 
ते तर  सर्वदा ठरते 
 देवाचे आपणास वरदान 

व्हायचे ते होणारच 
ज्ञात जरी असे जिवाला
काल पेक्षा आज उज्वल 
असते आशा मनाला 

जैसे ठेवले अनंते
पाळिता सदा कथन
रहाणे सदा सक्रिय
हेही असे जीवन।

    
वैशाली वर्तक 
अहमदाबाद

हरवतो वर्तमान काळ

मौहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  उपक्रम क्रमांक १६५१ दि२८\१०\२६ आपण कोणीच आजकाल आताच्या काळात जगू शकत नाही, भविष्याची चिंता किंवा किंवा स्व...