शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

काळाच्या पुढच पाऊल

घेणे उद्याचा अंदाज
असे गोष्ट योग्यच
जेणे करून जीवन
जगण्या होतो सुसज्ज

जग झालय प्रगतीशील
आयोजन चाले भविष्याचे
जगता वर्तमान  काळात
जेणे करुन जगणं होते आनंदाचे.

काळाच्या पुढच पाऊल
टाकावी लागतात सदा
तहान लागता विहीर खणणे
नसेची  योग्य  कदा

साधी मुंगी  किटक पहा
करत असते काम अविरत
पाऊस पडला तरी त्यांचे
कोठार भरलेलं सदोदित

वैशाली वर्तक


बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

आशेचा किरण

सिद्ध साहित्य‌‌‌क समूह आयोजित 
उपक्रम 
विषय ..आशेचा किरण 


 कधी मनी नकोची  खंत
संभ्रम मनात अपयशाचा
असावे सदैव आशावादी 
 किरण आशेचा दावी पथ यशाचा.

असावे विचार सकारात्मक 
  सदा हवाआत्मविश्वास
घेतले काम होणारच पूर्ण 
आशेचे किरण करी पूर्ण आस.

नको मनी थारा निराशेला
नका करू मन विचलित 
मनी विश्वास असता यशाचा
आशेचे किरण करी मन प्रफुल्लित.

निशे नंतर ऊषा उजळते
आणिते ती नव आशा
सारून मरगळ तनमनाची 
दाविते यशरूपी नव्या दिशा
 


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

मोरपीस


मोरपीस 
मन माझे आनंदले
किती पहा आकर्षक 
पीस सुंदर मोराचे
भासे चित्ताला वेधक.

सप्त रंगातील ऱंग
हिरवाई नील पीत
भरलीत विधात्याने
सुंदर करण्या नीत.

मेघ जमता अंबरी
पुरविता पिसारा भार
पडलेले जल पिसावर
चमकता  दिसे शानदार 

मोरपीस स्पर्श अलवार
सुखावितो तन मनाला 
विधात्याने सौंदर्य सारे
अर्पिले जणु मयूराला.

पाहताच मयूर पीस
आठवे कृष्णाची मूर्ती 
शोभिवंत दिसे शिरी
मनी मिळे सदा स्फुर्ती

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 

वृत्त बध्द जलौघवेगा. प्रवास

जलौघवेगा -  लगा लगागा लगा लगागा          प्रवास  बराच झाला ,प्रवास आता कधी नव्हती ,मनात चिंता   नकोच आता ,कुठे भ्रमंती  शरीर मागे ,जरा विश्र...