साकव्यकाव्य स्पर्धा 97
*स्पर्धेसाठी*
१] किलबिल बालमनाची
स्पर्धेसाठी....
जागतिक साकव्य विकास मंच
आयोजित
सन्माननीय समूह सदस्या प्रेमा दळवी, सदस्य अरविन्द गणपुले व समूह अध्यक्ष पांडूरंग कुलकर्णी यांचा 'नातू...श्रीमान कुलकर्णी" यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्य लेखन स्पर्धा..
स्पर्धा क्र. ९७
दिनांक --२६ ते ३० सप्टेंबर २०२६
विषय :-उंदीरमामा वर बड़बड़ गीते
शीर्षक ..मनोरथ उंदीराचे
आला उंदीर धावत
येता भाद्रपद मास
मनी रचे आराखडे
दिन आनंदाचे खास
रोज मिळेल मोदक.
लागेल गंध धूप दीप
मान *श्रीं**च्या वहानाचा
बसेन मी ऐटीत समीप.
नाही आता मज भय
मनी माऊ आली तरी.
प्रत्यक्ष गणराया असता
नुसती पाहून जाते घरी.
गणेशाच्या जोडीने मला
पांघरले पहा वस्त्र सुरेख
किती तलम गर्भ रेशमी
पहाती मजला प्रत्येक
दहा दिवसांची मजा
दर्शनाला येती जन
कोणी न हटके मला
भरले माझे आनंदे मन
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430