मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित
उपक्रम
विषय एकटा
का ? शब्दची एकटा
वाटे नकोसा मनाला
खर पहाता आलोय
एकटेच ना! जन्माला
पण येताची जन्मास
सुरू होतो गोतावळा
माय -बाप भाऊ- बहिण
मिळता, हर्षाचा सोहळा
मानव सामाजिक प्राणी
एकमेका देत साथ
नावडे एकटे रहाणे
!सुख दुःखात मिळतो हात
सारे असता सभोवती
विरंगुळा वाटे मना
एकटेच असता मात्र
कसे जगावे वाटे क्षणा
तरी कधीतरी वाटते
बसावे जरा एकांती
शांत बसूनी रहावे
मिळवावी मना विश्रांती
वैशाली वर्तक
अहमदाबाद