रचियता साहित्य मंच आयोजित
भव्य चौरंगी महा काव्य स्पर्धा 2020
स्पर्धेसाठी
विषय - विधिलिखित 13/7/2020
सामान्यतः असे वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न
व्हायचे ते होणार हे... खचित
कधी कोणास मिळते चिमूटभर
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ
म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही दुःखाच्या नशिबाची पाठ
नैसर्गिक आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा
घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी आपणावर
वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद
गुजरात स्टेट
8141427330
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा