चित्र काव्य
अष्टाक्षरी
शीर्षक ... करु हितगुज
हात हातात घेतला
जाऊ समुद्र किनारी
मौज लाटांची पहात
बसु बाळुत शेजारी.
सूर्य आलाय अस्ताला
पीत वर्णी नभ झाले
दिशा सा-या धुंद कशा
जन फिरायला आले.
सांज असतेच अशी
ओढ लावते जिवाला
दोघे आपण असता
मिळे आनंद मनाला .
रंगवूया स्वप्ने मनी
सांग तू मनीचे गुज
नको ठेवू मनी किंतू
करू आज हितगुज
सूर्य पण पहातोय
पुन्हा पुन्हा वळुनिया
किती गोड हास्य तुझे
तोही थांबला पहाया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
