प्रेमाची अक्षरे
महास्पर्धे साठी
अभंग
विषय- भाव भोळा हरी
राजा पंढरीचा ।
भक्त गणा साठी ।
उभा सदा पाठी । :
पांडुरंग ।। 1
भावाचा भुकेला ।
भाव भोळा हरी ।
धावे भक्ता घरी ।
सदाकाळ ।। 2
नको त्यासी धन ।
हवा भक्ती भाव
घेई त्याचा ठाव ।
भक्तालागी ।। 3
भोळ्या श्रीहरीने ।
दळण दळिले ।
अभंग तारिले ।
भक्तांचेते ।। 4
सावळ्या विठ्ठला ।
ऐक आराधना ।
करिते अर्चना ।
भक्तीभावे ।। 5
चला दर्शनाला ।
आपुल्या अंतरी ।
आली ही पंढरी ।
भक्ताघरी ।। 6
पहा विठु उभा ।
आपुल्या शेजारी ।
सेवाव्रत धारी ।
पांडुरंग ।। 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
महास्पर्धे साठी
अभंग
विषय- भाव भोळा हरी
राजा पंढरीचा ।
भक्त गणा साठी ।
उभा सदा पाठी । :
पांडुरंग ।। 1
भावाचा भुकेला ।
भाव भोळा हरी ।
धावे भक्ता घरी ।
सदाकाळ ।। 2
नको त्यासी धन ।
हवा भक्ती भाव
घेई त्याचा ठाव ।
भक्तालागी ।। 3
भोळ्या श्रीहरीने ।
दळण दळिले ।
अभंग तारिले ।
भक्तांचेते ।। 4
सावळ्या विठ्ठला ।
ऐक आराधना ।
करिते अर्चना ।
भक्तीभावे ।। 5
चला दर्शनाला ।
आपुल्या अंतरी ।
आली ही पंढरी ।
भक्ताघरी ।। 6
पहा विठु उभा ।
आपुल्या शेजारी ।
सेवाव्रत धारी ।
पांडुरंग ।। 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा