सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणणे त्याचे न कोणी ऐकी
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा होता झुंजुमुंज पहा सुरु होतो किलबिलाट  कोण सांगते तयांना उठा झालीय  पहाट होते बसले अंगणी  लक्ष गेले झाडाकडे चि...