स्वप्न नव भारताचे
काल पाहिले सुंदर स्वप्न
मन माझे आनंदले
केले वंदन देवाला
अन् काव्यातून रेखाटले.
स्वप्नी होता सुंदर स्वच्छ भारत
विश्वात शोभणारा महान
समानतेचा नांदतोय भाव
नाही कोणीच उच्च वा लहान
नव्हते कोणीच उपाशी
सर्व जनांना आहे निवारा
समजून उमजून राही जन
घरांना कुलुपाचा न , पहारा
आत्मनिर्भर होऊनी सारे
वाढविण्या जगती देशाची शान
माणुसकी हाच धर्म खरा.
याची नागरिकात दिसली जाण.
कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होण्या मुलगी साक्षर
सावित्री रूपे देखणी.
रोज येती सांजवेळी
ऐकायला पसायदान
देई संदेश जगाला
विश्व शांती योग्य दान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा