शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत 




माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान


भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक
नसे भेद- भाव जना ,असा देश जगी एक
काय असे किती वर्णू , भारताचे गुणगान 
प्राणाहून असे  प्रिय , तयाच्या  गौरवात शान


पहा किती एकात्मता, होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  ,अखंडित  झाली  एक
वल्लभभाईंच्या शब्दांचा,  दिधला जगी  मान
प्राणाहून असे  प्रिय  तयाच्या गौरवात शान


देश हा आत्म निर्भर, येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन, येता मदतीच्या हाका
विश्वात शोभून दिसता, उंचावते अभिमाने मान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

माझ्या भारत देशाचा मला  सदा अभिमान
प्राणाहून असे  प्रिय तयाच्या  गौरवात शान

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...