शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

गीत. देव नाही देवळात

 काव्य स्पंदन 02 राज्य स्तर 

काव्य प्रकार भावगीत
विषय -- नाही देव देवळात


आहे तोच  अंतरात, नाही देव  देवळात 
नका शोधू देवा-ह्यात  ,वसला चरा चरात

कळी पहा उमलली   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना उषा हसत लाजली   
सारी देवाची  करणी  घडवितो दिनरात
 नका शोधू देवा-हात  वसला  चरा चरात        1

देता गरीबास अन्न , दोन आपुले कवळ   
तृप्त होऊनी हसला  आला असता जवळ
ओळखला नाही पण, तोची जेवला सुखात
नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात             2

पहा देवास कर्मात ,  कर्म  घडवी देवत्व
सदा करिता सत्कर्म, मिळे  आपणा महत्त्व 
 नको पूजा जप ताप ,देव वसे आपल्यात 
  नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात          3

वैशाली वर्तक
अहमदाबाद







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...