विषय. हसरी सकाळ
ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ
रवी राजे येता नभी
झाली पहा उष:काळ
प्राची हळु उजळली
रवी किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.
थंड मंद पवनाने
दिशा जाहल्या गंधित
फुले फुलली मोहक
मन जाहले मोहित
केली दूर मरगळ
उषा देते मना आशा
उठ मानवा प्रभाती
दूर सारूनी निराशा
मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी
मंगल मय नाव मुखी
भासे सुखद सकाळी
रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी हसरी प्रभात
उजळती दशदिशा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*षडाक्षरी काव्य लेखन*
विषय .. सोनेरी पहाट
शशी मावळला
मंदावले तारे
थंड ती लहर
झोंबे अंगा वारे
झाली झुंज मुंज
प्राची उजळली
रवीची किरणे
नभी पसरली
केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो किलबिलाट
दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट
मंडळी जाहली.
वैशाली वर्तक
वृत्तबद्ध उध्दव
विषय... पहाट
तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती सारी
किलबिलाट भासे सुंदर
उठ ,प्रातः झाली न्यारी
पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर सारा
घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू येते.
सुमधुर स्वरांची गाणी
आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई मरगळ
मनाने आनंदती जन
क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी
रामाचा गजर अंतरी
भजन धून येते कानी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा