शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६

गीत. देव नाही देवळात

 काव्य स्पंदन 02 राज्य स्तर 

काव्य प्रकार भावगीत
विषय -- नाही देव देवळात


आहे तोच  अंतरात, नाही देव  देवळात 
नका शोधू देवा-ह्यात  ,वसला चरा चरात

कळी पहा उमलली   सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना उषा हसत लाजली   
सारी देवाची  करणी  घडवितो दिनरात
 नका शोधू देवा-हात  वसला  चरा चरात        1

देता गरीबास अन्न , दोन आपुले कवळ   
तृप्त होऊनी हसला  आला असता जवळ
ओळखला नाही पण, तोची जेवला सुखात
नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात             2

पहा देवास कर्मात ,  कर्म  घडवी देवत्व
सदा करिता सत्कर्म, मिळे  आपणा महत्त्व 
 नको पूजा जप ताप ,देव वसे आपल्यात 
  नका शोधू देवा-हात  वसला चरा चरात          3

वैशाली वर्तक
अहमदाबाद







स्वप्न नव भारताचे



स्वप्न नव भारताचे     

काल पाहिले सुंदर स्वप्न  
मन माझे  आनंदले
केले वंदन देवाला 
अन् काव्यातून रेखाटले.

        
 स्वप्नी होता  सुंदर स्वच्छ भारत
 विश्वात शोभणारा महान 
 समानतेचा नांदतोय भाव
 नाही कोणीच  उच्च वा लहान
 
 
नव्हते कोणीच उपाशी
सर्व जनांना आहे निवारा
समजून  उमजून राही जन
घरांना कुलुपाचा न , पहारा

आत्मनिर्भर होऊनी सारे
वाढविण्या जगती देशाची शान 
माणुसकी हाच धर्म खरा.      
याची नागरिकात दिसली जाण.

कळ्यां कधी न खुडता
हाती तयांच्या लेखणी
होण्या  मुलगी  साक्षर
सावित्री  रूपे देखणी.


रोज येती सांजवेळी
ऐकायला  पसायदान
देई  संदेश जगाला
विश्व शांती  योग्य दान


वैशाली वर्तक
अहमदाबाद 
8141427430.


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
अष्टाक्षरी काव्यलेखन 
विषय    मृदगंध


किती  वसुने साहिल्या
तप्त  उन्हाच्या झळा 
 काया तिची भेगाळली
 भासे जणू अवकळा

झाली मृग बरसात
तृप्त अवनी जाहली
गंध मातीचा  पसरे  
काळी माती गंधाळली.

घेता शोषून जलाला
. वा-यासंगे वाहे गंध 
सारे आसमंती आता
 भरे एकच मृद्गंध 

  
अत्तराचा फिका वाटे
गंध आवडे जनाला
वारा  वाहे आसमंती
  देण्या आनंद क्षणाला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

राबत गेले \ गेलो

 मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित 

काव्यलेखन 

विषय. राबत  गेले


सध्याच्या जीवनशैलीशी

   तुलना  करिता मनात 

वाटते कधीतरी तेव्हा

 किती राबलो  बालपणात 


पायी चालणे  शाळेला

किती  जायचो सहज

कधी वाटली नाही तेव्हा

टोपी वा छत्रीची गरज


 तूप गुळ पोळी ,भाजी

 नाही केली हॉटेलची मौज 

जुनी पुस्तकं वापरून 

भागविली नवीनची हौस


उधळपटी केली नाही 

 जीवनात केली काटकसर

 आहे त्यात  गोड मानले

 म्हणून सुख मिळाले जीवनभर.


नोकर नव्हते  घरात

  घरकामात केली मदत

स्वतः चे काम केले स्वतः 

   आनंदे होतों राबत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२६

गीत. तुझी वाट पहाते रे

तुझी वाट  पहाते रे


कधी येशील.     गगनी अधीरता मनी दाटे.   
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते         


 आशा रुपी  कळ्यांची फुले  फुलती सकाळी.  
किलबील  ती खगांची  गोड भासते भुपाळी         
होता तुझेची आगमन  आनंद मनास वाटे 
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   

तुझ्या येण्याने वहाती,नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,   मंदावती नभी तारे        
मंद झुळुक वा-याची  मनास सुखावते                            
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       


तुज अर्ध्य देण्या उभे  जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल  सारे  नैराश्य मनीचे         
फाकलेल्या शलाकात प्रसन्नता लाभते
 तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पहाते   


स्वर्ण रंगात  येताची मिळे जीवन जनांना
 प्रफुल्लित मने जन वदे "प्रभात "त्या क्षणांना      
झाली उष:काल नव आशांची मनी भासते
तम निशेचा  सारण्या  तुझी वाट  मी पाहते       

वैशालीवर्तक

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२६

पक्ष्यांची भरली शाळा

शीर्षक...पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणणे त्याचे न कोणी ऐकी
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, ३१ जुलै, २०२६

सकाळ विषयक. हसरी सकाळ सहाक्षरी सोनेरी पहाट उध्दव वृत्त

विषय.  हसरी सकाळ 


ऐकू आली किलबिल
भासे झालीय सकाळ 
रवी राजे येता नभी
झाली पहा  उष:काळ

प्राची हळु उजळली
रवी   किरणे फाकली
सडे केशराचे नभी
उषा लाजत हासली.

 थंड मंद पवनाने 
दिशा जाहल्या गंधित 
फुले फुलली मोहक 
मन जाहले मोहित

 केली दूर मरगळ
उषा देते मना आशा 
उठ मानवा प्रभाती 
दूर सारूनी निराशा

मंद स्वर कानी आले
गोड ऐकता भुपाळी 
मंगल मय नाव मुखी
 भासे सुखद सकाळी 

रोज. येऊनी गगनी
दिनकर करी उषा
करी  हसरी प्रभात
उजळती दशदिशा

 वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


*षडाक्षरी काव्य लेखन*
विषय .. सोनेरी पहाट 


शशी मावळला
मंदावले तारे
थंड  ती लहर
झोंबे अंगा वारे


झाली झुंज मुंज 
 प्राची उजळली
रवीची किरणे 
नभी पसरली

केशराचे सडे
सोनेरी पहाट
पक्षी करितात
तो  किलबिलाट 


दरवळे गंध
सुमने फुलली
सोनेरी पहाट 
मंडळी जाहली.

वैशाली वर्तक 


वृत्तबद्ध उध्दव 
विषय... पहाट 

तम निशेचा पहा सरता
खग नभात उडती  सारी   
किलबिलाट भासे सुंदर 
उठ ,प्रातः झाली न्यारी

पूर्व दिशा पहा उजळली
शीत मंद वाहे वारा
सुमनांचा गंध दरवळे
शुभ भासे परिसर  सारा

घर रांगोळीने सजले
स्वर भुपाळीचे कानी
प्रातः वेळी ऐकू  येते.   
सुमधुर स्वरांची गाणी

आशा रुपी कळ्या फुलती
होता रवीचे आगमन
दूर दूर होई   मरगळ
मनाने आनंदती जन

क्षण आनंदाचे भासे
नव आशा येती ध्यानी 
रामाचा गजर अंतरी
 भजन धून येते कानी              

वैशाली वर्तक

बाप्पा आले धावून

साकव्य कथा स्पर्धा २ साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित सन्माननीय डॉ दाखवायची पंडित, विद्या प्रधान,परवीन कौसर आणि सन्मा. समूह सदस्य दत्...