गंध फुलांचा सांगून गेला*
अर्पण करण्या देवा चरणी
गंध गुलाबाचा सांगू पाहे
ऋतुची मला न गरज
अन् सौंदर्यात माझ्या ऐट आहे .
सदैव मी लावितो हजरी
रूप निहाळा विविध रंगात
लाल पित सफेद गुलाबी
मान राजाचा आहै फुलात
फुलला टपोरा मोगरा
दिसतोय किती छान
गंध दरवळे आसमंतात
हरपते सा-यांचे भान.
चाफ्याच्या सुगंधाने
प्रसन्न केले वातावरण
अलगद घेता हाती तयांना
गंधित झाले पर्यावरण .
रातराणीचा तो गंध
मंद हवेत दरवळत होता
आज विसावलो त्याच गंधात
गंध फुलांचा सांगत होता.
अशी सारीच सुमने
आली एकानंतर एक
वर्णिले आपापले महत्त्व
सा -या सृष्टीत फुले कित्येक






