सोमवार, १५ मार्च, २०२१

संस्कार तिचे संस्कार दशाक्षरी

शब्दसेतू साहित्य  मंच
रविवारीय  स्पर्धेसाठी
साहित्यप्रकार  -- दशाक्षरी  काव्य  लेखन

विषय -- तिचे संस्कार 


संस्कार 


असे मन  मातीचाच गोळा
 माता करीते  सदा चिंतन                    
जीव प्राण तिच्या उदरात
 मनी सद्विचारांचे मंथन


गर्भातून  करी ती संस्कार 
करी सदा सात्त्विक  विचार
जन्म  देऊनीया अर्भकास
माता होते त्याची शिल्पकार 


  संस्काराच्या बळावर पाल्य
    घडवी भवितव्य   उज्वल
मिळवितो किर्ती जीवनात      
   हेची  गुढ खरेची प्रांजल


  देई कुंभार  जसे मातीला
  प्रेमभावे देऊन आकार
देत असताना  मनाजोगा
घटास करितो तो साकार
 

 करीतात शाळेत शिक्षक 
 तीच संस्काराची उजळणी
सदा जीवनात उपयोगी 
राहती कायम आठवणी


मानवी जीवनी  आहे असे
संस्काराचे तयात महत्त्व 
होउनिया सदाची यशस्वी
मिळवितो जगी तो श्रेष्ठत्व


वैशाली वर्तक..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...