शब्दसेतू साहित्य मंच
*आनंदाच्या गावा जाऊ*
वसलेले एक गाव
जाऊ मिळूनिया सारे
आहे गाव मनोहर
चमकते पहा तारे
कशी कालची कलिका
उमलली हळुवार
केला परिसर सारा
सुगंधित अलवार
झाली गंधित पहाट
वारा लागे कुजबुजू
पाखरांची किलबिल
झाल बघा झुंजूमुंजू
कशी उडती रांगेत
आभाळात दिसे नक्षी
जणु माळ ओवियली
मनोहर दिसे पक्षी
शोधा मोद दडलेला
आहे तो चरा चरात
फुले पाहताच वाटे
सदा आनंद मनात
कसे निरागस हास्य
दिसे बाळ मुखावरी
हासे हात पसरुनी
किती गोड पहातरी
हीच आनंदाची सारी
गावे आहे सभोवती
चला जाऊयाआपण
घेता समजूनी महती
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा