अ भारतीय मराठी साहित्य परिषद 2
आयोजित उपक्रम क्रमांक 703
विषय.. स्वप्नातील जग
काल पाहिले स्वप्नात
मन माझे आनंदले
केले वंदन देवाला
काव्यातून रेखाटले.
माझे स्वप्नातील जग
मनोहर रमणीय
जन घेतात काळजी
राखण्यास लोभनीय
विश्व शांतीचा एकची
सर्व जगी नांदे भाव
जन गुण्या गोविंदाने
नसे कुणा दुःख ठाव
नाही कोणीच उपाशी
सर्व जनांना निवारा
समजून राही जन
कुलुपाचा न पहारा
जन जपतात नाती
विश्व बंधु भाव मनी
संस्कृती ची परंपरा
दिसे सदा क्षणोक्षणी
रोज येती सांजवेळी
ऐकायला पसायदान
देई संदेश जगाला
विश्व शांती योग्य दान
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा